अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र | Annabhau Sathe Information In Marathi
लोकशाहीर म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला "अण्णाभाऊ साठे" यांचे नाव आठवल्या शिवाय राहत नाही,ज्यांनी आपल्या महान लेखणीतून देशभर क्रांतीचे बीजं रोवली अशा या महान साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
अण्णाभाऊ साठे प्रारंभिक जिवन - Early life of Annabhau Sathe
"जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव" हे क्रांतीचे विचार ज्यांनी जनसामान्य लोकांपर्यंत पोचवले. अशे महान क्रांतिकारक "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा जन्म ई. स. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणाऱ्या "वाटेगाव" या गावी एका मागासवर्गीय मांग कुटुंबात झाला. त्यांचे वडील अत्यंत गरीब असल्याने मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते. त्यांची आई दोर ओळण्याच्या कामाला जात असे.
त्याकाळात जातीभेद, अस्पृश्यता जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यांचा शाळेशी जास्त काळ संबंध आला नाही. कारण ते फक्त दिड दिवसच शाळेत गेले. नंतर तिथे जाती, पातीवरून होणारा भेदभाव त्यांच्या मनाशी काही रुचला नाही आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी शाळा व शिक्षणाचा त्याग केला. त्यांचे वडील भाऊराव साठे मुंबई येथे काम करण्यासाठी गेले होते. गावाकडे अण्णाभाऊ त्यांची आई व भावंडे राहत असत. मुंबई मध्ये शिक्षण घेणारी मुलं पाहिली की भाऊराव यांना वाटे की आपल्या मुलाने शिकावं मोठं व्हावं. त्यामुळे परत एकदा त्यांनी अण्णाभाऊंना शाळेत पाठवलं.'annabhau sathe information in marathi' परंतू तिथल्या शिक्षकाने परत उच्च - नीच करून त्यांना मारहाण करुन घरी परत पाठवले. तेंव्हापासून पुन्हा त्यांचा आणि शाळेचा प्रवास संपला.
काही दिवसांनंतर ते सर्व कुटुंबाच्या सोबत मुंबई ला आले. एका छोट्याशा चाळीत ते खोली करुण राहु लागले. काही तरी काम करावं म्हणुन ते कामाच्या शोधात फिरू लागले. तेंव्हा त्यांना अनेक माणसे भेटत गेली. खरतर इथूनच त्यांची वैचारिक यात्रा सुरू झाली. काही दिवसातच त्यांना एका कपडे विक्रत्या कडे काम मिळाले. मग ते गल्ली बोळात फिरून कपडे विकत असतं. हे काम करतानाच त्यांची भेट ज्ञानदेव नावाच्या नातेवाईकांशी झाली. काही दिवसांनंतर त्यांच्या दोघात जवळीकता निर्माण झाली. ज्ञानदेव हे कलावंत असल्याने त्यांना अनेक ग्रंथाचे ज्ञान होते. त्यांनी हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ अण्णाभाऊंना अर्थासाहित सांगितली. त्यांनीही ती आवडीने पाठ केली. तिथून पुढे पुन्हा एकदा शिकण्याची इच्छा निर्माण होउन अण्णाभाऊ साठे यांनी शिकण्याचा ध्यास घेतला. 'annabhau sathe information in marathi'
👉 अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र
अण्णाभाऊ साठे यांचे राजकीय जीवन -Political life of Annabhau Sathe
काही दिवसातच शिकण्याचा ध्यास घेतलेले अण्णाभाऊ साठे यांना हळू - हळू अक्षर ओळख व्हायला लागली. त्या काळात ब्रिटिश सरकार ला हाकलून देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष व संघटना तयार झाल्या होत्या. 'annabhau sathe information in marathi' परंतू वेगवेगळ्या पक्षांची विचारसरणी वेगळी होती. अण्णाभाऊ यांच्यावर देखील त्या काळात कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव पडला होता. त्यामुळे ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. त्यांच्याकडे असलेली गायनाची कला व लिखाणाची आवड यामुळे ते सर्व लोकांचे प्रिय होत गेले. त्यांनी गायलेले पोवाडे, लोकं गीतं त्याकाळात सुप्रसिद्ध झाली. त्यांचा स्वभाव अत्यंत मायाळू आणि मोकळा असल्याने सर्व लोक त्यांच्याशी मिळून मिसळून राहायला लागले.
आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो, या भूमीचे ऋण आपण फेडायला हवे याकरिता त्यांनी अनेक क्रांत्या करून बदल घडवण्याचा प्रयत्न केला. इथल्या समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसावी या करीता त्यांनी अनेक आंदोलनं केली. सामाजिक कार्य करत - करत त्यांनी आपला मोर्चा राजकीय मार्गाने वळवला. अण्णाभाऊ साठे हे सुरवाती पासूनच आदरणीय श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणी ने प्रभावित झाले होते. काही दिवसांनंतर त्यांनी सहकारी शाहीर मित्रांना सोबतीला घेऊन ई. स.1944 ला " लालबावटा कला पथकाची " स्थापना केली. हे पथक स्थापन करताना अण्णाभाऊ साठे यांना दत्ता गवाणकर तसेच अमर शेख या दोन शाहीर मित्रांची साथ लाभली. त्यांनी पथकाच्या मार्फत अनेक जाचक सरकारी निर्णयांना त्यांनी विरोध केला.
वैचारिक पातळीवर सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्य करण्याचा मानस उरात बाळगून तो अमलात आणला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देखील ईथल्या उच्च वर्णीय लोकांचे शासन राज्यात कायम होते. हे जाचक शासन निर्णय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अमान्य होतें. त्यामुळे त्यांनी स्वांत्रदिनाच्या दुसऱ्याचं दिवशी दिनांक: 16 ऑगस्ट 1947 ला सुमारे 20 हजार लोकांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रचंड मोठा मोर्चा काढला. "ये आझादी झूठी है, देश की जनता भुकी है " हे मोर्चाचे प्रमुख घोष वाक्य होते. त्यांनी केलेली अनेक आंदोलन हि वंचितांच्या विकासाचे कारण ठरली.'annabhau sathe information in marathi'
नियमित रुपाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मार्ग त्यांनी निवडला. त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करत राज्यांतील दलीत तसेच कामगार लोकांसाठी ते अहोरात्र झटत राहिले. ते बॉम्बे येथील पहिल्या दलीत साहित्य संमेलनात बोलताना ते म्हणाले होते, की "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरीब व कष्टकरी लोकांच्या तळहातावर तरलेली आहे." त्यांची अनेक भाषण हि दलीत व कामगार लोकांच्या प्रश्नांवर आधारित असतं. कारण त्याकाळात दलीत लोकांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. अंधश्रध्देच्या अंधकरात बुडालेल्या अनेक तरुण लोकांना त्यांनी ज्ञानमय प्रवाहात आणून सोडलं.'annabhau sathe information in marathi'
👉 महाराणा प्रताप यांचा संपूर्ण इतिहास
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य -Literature of Annabhau Sathe
अण्णाभाऊ साठे यांनी अनेक सामाजिक कार्य करतांना आपल्या लेखणीला सुद्धा परिवर्तनाची धार दिली. त्यांनी अनेक क्षेत्रातील साहित्य व पुस्तकं लिहीली. अण्णाभाऊंच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 35 कादंबऱ्या लिहिल्या. राज्य सरकार तर्फे दिल्या जाणारा उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार त्यांच्या "फकिरा" नावाने प्रसिद्ध असलेल्या कादंबरीला इ. स 1961 ला देण्यात आला. फकिरा हि कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली होती. या कादंबरीत अण्णाभाऊंनी आपल्या कामगार चळवळीतील समूहाला भूक मारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण भागातील रूढी परंपरा आणि इंग्रजांच्या विरोधात बंड करणाऱ्या फकिरा नावाच्या नायकाचे चित्रीकरण केले आहे. या बंडाला मोडीत काढून त्या विद्रोही समूहाला इंग्रज अधिकाऱ्याने कशा प्रकारे मार - हान व त्यांचा छळ करुण त्यांना अटक केले व तुरुंगात डांबले. आणि शेवटी फकिरा नावाच्या नायकाला फाशीची शिक्षा कशी सुनावली यावर उत्कृष्ठ लिखाण केले आहे.
अण्णाभाऊंनी अनेक पटकथा, लघुकथा, नाटक, पोवाडे, स्वरचित गाणी तसेच "रशियातील भ्रमंती" आशा अनेक कथा त्यांनी आपल्या लेखणीतून लिहल्या. त्यांनी रचलेली अनेक पोवाडे आणि लावण्या जन समुदायात नावा रूपाला आल्या. त्या काळात एक शाहीर म्हणून ते अत्यंत लोकप्रिय ठरले. ते एक उत्कृष्ठ कवी होते. त्यामुळे त्यांना बालपणी पासूनच कविता लिहिण्याची आवड होती. त्यांच्या काव्य संग्रहातील काविता आजही गायल्या जातात. त्यांच्या अनेक कविता सुप्रसिद्ध आहेत. 'annabhau sathe information in marathi'
👉 स्वामी विवेकानंदांचे चरीत्र
• प्रसिद्ध कविता पैकी एक -
"माझी मैना गावावर राहिली"
माझी मैना गावावर राहिली|
माझ्या जीवाची होतीया काहीली ||
ओतीव बांधा, रंग गव्हाला|
कोर चंद्राची, उदात्त गुणांची||
मोठया मनाची| सिता ती माझी रामाची|
हसून बोलायची | मंद चालायची |
सुगंध केतकी | सतेज कांती ||
घडीव पुतली सोन्याची| नव्या नवतीची|
काडी दवन्याची | रेखीव भुवया||
कमान जणू इंद्रधनुची | हिरकणी हिरयाची|
काठी अंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|
मैना रत्नाची खाण | माझा जीव की प्राण||
नवे सुखाला वान | तिच्या गुणांची छक्कड मी गायिली ||
माझ्या जीवाची होतीया कहीली||
• अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या -
1. फकिरा
2. आवडी
3. गुलाम
4. चंदन
5. चिखलातील कमळ
6. चित्रा
7. पाझर
8. मथुरा
9. रत्ना
10. रूपा
11. रानगंगा
12. वारणेचा वाघ
13. वैजेयंता
14. वैर
15. आग
16. आघात
17. अहंकार
18. अग्निदिव्य
19. कुरूप
20. फुलपाखरू
21. वारणेच्या खोऱ्यात
22. रणबोका
23. तास
24. संघर्ष
25. गुलाम
26. डोळे मोडीत राधा चाले
27. ठासलेल्या बंदुका
28. चंदन
29. मूर्ती
30. मंगला
31. मास्तर
32. अलगुज
33. माकाडीचा माळ
34. कवड्याचे कणीस
35. धुंद रानफुलांचा
• अण्णाभाऊ साठे लिखित कथासंग्रह -
1. आबी
2. कृष्णकाठच्या कथा
3. खुळवांडा
4. गजाआड
5. चिरानगरची भुतं
6. नवती
7. निखारा
8. जिवंत काडतुस
9. पिसाळलेला माणूस
10. फरारी
11. बरबाद्या कंजारी
• अण्णाभाऊ साठे लिखित इतर पुस्तके -
~ अकलेची गोष्ट
~ अमृत
~ गुऱ्हाळ
~ तारा
~ सुगंधा
~ देशभक्त घोटाळे (लोकनाट्य)
~ पुढारी मिळाला (लोकनाट्य)
~ इनामदार (नाटक)
~ सुलतान (नाटक)
~ कापऱ्या चोर (लोकनाट्य)
~ बेकायदेशीर (लोकनाट्य)
~ माझी मुंबई (लोकनाट्य)
~ मूक मिरवणूक (लोकनाट्य)
~ शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य)
अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू - Death of Annabhau Sathe
तसं पाहायला गेलं तर त्यांनी दोन वेळा विवाह केला. त्यांच्या प्रथम पत्नीचे नाव कोंडाबाई साठे तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता साठे असे होते. त्यांना 2 मुली व 1 मुलगा अशी एकुण 3 अपत्य झाली. मुलाचे नाव मधुकर तर मुलींचे नाव शांता आणि शकुंतला असे होते. अण्णाभाऊ यांचे वडील वारले तेंव्हां त्यांनी कोंडाबाई या निरक्षर महिलेशी विवाह केला. परंतू मुंबई येथे गेल्यावर स्वातंत्र्य चळवळी व राजकारण यामुळे ते संसारात अस्थिर होते. पक्षाच्या कामकाजात गुंतल्या मुळे त्यांना अजीबात वेळ नसायचा.
असच एकदा पक्षाच्या कामा निम्मित फिरत असताना त्यांची ओळख जयवांता बाई या विवाहित महिलेसोबत झाली. ती बाई काही कारणाने आपल्या पतीसोबत राहत नसे. पूढे काही दिवसांत अण्णाभाऊंनी जयवंता बाईशी विवाह केला. जयवंता बाईशी संसार करताना अण्णाभाऊ यांना त्यांची बरीच मदत झाली. त्यांच्या कला गुणांना वाव मिळायला लागला. हे सर्व चांगल चालू असताना कुणा दुसऱ्याची नजर लागावी अशा प्रकारे काही दिवसातच त्यांच्या नवरा बायकोच्या नात्यात दरी निर्माण झाली. जयवंता बाई आपल्या मुली कडे राहायला गेल्या. तेंव्हापासून अण्णाभाऊ यांच्या सांसारिक जीवनाला उतरती कळा लागली. ते ज्या पक्षात काम करायचे त्या पक्षांतील सहकाऱ्यांनी देखील त्यांच्या सोबत विश्वासघात केला. कोणत्याही शाळेत शिक्षण न घेता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा कलाकार मात्र तिथून पुढे खचत गेला. आणि आयुष्याची राखरांगोळी होत गेली. स्वतःची प्रकृति बिघडत गेली. शेवटीं तर अन्न सुद्धा मिळत नव्हते. त्या काळात मात्र राज्य सरकारने त्यांना भरपूर मदत केली. परंतु पदोपदी झालेला विश्वासघात व दुःख यातून ते अधिकच खचत गेले. आशा या थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्याची कारकीर्द संपवत ई स. दिनांक 18 जुलै 1969 ला या जगाचा निरोप घेतला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर लिहावे तेवढे शब्द अपुरे पडतील अशी त्यांची ख्याती. अशा या महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित संपूर्ण माहिती मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या लेखात दिलेली सर्वच महिती अचूक आहे आसा माझा बिलकुल दावा नाही. परंतू बहुतांश प्रमाणात अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती आवडली तर नक्की शेअर करा धन्यवाद🙏
आमचे हे लेख सुद्धा अवश्य वाचा 👇
2) संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र
0 Comments