सिंधूताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती | Sindhutai Sapkal Information in Marathi
![]() |
'sindhutai sapkal information in marathi' |
"अनाथ" हा शब्द कानावर जरी आला की सिंधूताई सपकाळ यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य गरजू व अनाथांची काळजी घेण्यात वाहिलं. ज्यांना अख्खा महाराष्ट्र "अनाथांची आई" म्हणून आजही ओळखतो अशा महान माई सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 ला वर्धा जिल्ह्यातील प्रिंप्री मेघे या गावात झाला.'sindhutai sapkal information in marathi'
सिंधूताई सपकाळ यांचे बालपण - Childhood of Sindhutai Sapkal
सिंधूताई सपकाळ यांचा जन्म एका सर्वसामान्य गुराख्याच्या घरी झाला त्यांच्या वडिलांचे नाव अभिमन्यू साठे असं होतं. अभिमन्यू साठे हे पेशाने गुराखी असल्याने ते रोज गुर , ढोर चारण्यासाठी नेत असत. ते निरक्षर असूनही त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. आपल्या मुलीने चांगलं शिकावं आणि मोठं व्हावं असं त्यांना नेहमी वाटत असे. परंतू सिंधूताई सपकाळ यांच्या आईचा त्यांच्या शिक्षणास विरोध होता. त्याचे कारण असे की अगोदरच परिस्थिती बेताची त्यात मुलीचं शिक्षण म्हणजे खर्च वाढणारच म्हणून त्या सिंधू ताईंना शाळेत जाऊ देत नसत. परंतु त्यांचे वडिल सिंधूताई यांना आपल्या मदतीला म्हणुन न्यायचे आणि त्यांना गुपचूप शाळेत पाठवायचे. असं रडत - पडत का होईना त्या इयत्ता चौथी पर्यंत शिकल्या.'sindhutai sapkal information in marathi'
परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना अंगात घालायला बालपणी नीटसे कपडे देखिल नव्हते. फाटक्या कपड्यांच्या चींध्यानी शिवलेले कपडे त्या घालत असत. त्यामुळे सर्व लोक सिंधू ताईंना "चिंधी" म्हणून चिडवत असतं. पूढे "चिंधी" हेच त्यांचं टोपणनाव पडलं. शिक्षण बंद झाल्यावर घरची सर्व कामे त्या करु लागल्या. त्याकाळी लहान वयातच मुलींचे लग्न करण्याची रीत होती.'sindhutai sapkal information in marathi' त्यामुळे सिंधूताई सपकाळ यांचा विवाह देखिल वयाच्या अगदी 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल 26 वर्षाने मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ याच्याशी झाला.
सिंधुताई सपकाळ यांचे वैवाहिक जीवन -Married Life of Sindhutai Sapkal
सिंधूताई सपकाळ यांचं वैवाहिक आयुष्य म्हणजे त्यांच्यासाठी सर्वात मोठा संघर्ष म्हणावा लागेल. त्यांचे लग्न झाल्यावर त्यांना शिक्षण घेता आलं नाही. त्यांना वाचण्याची आवड होती. म्हणुन त्या रानात गोवऱ्या वेचताना सापडलेली कागदाची तुकडे त्या घरी आणून लपून ठेवत. आणि वेळ भेटला की अभ्यास करत, वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माईंची जवळपास तीन बाळंतपण झाली. माईंच्या आयुष्यात त्यांना प्रचंड सासुरवास सहन करावा लागला. राब - राब राबून सुद्धा पदरी काहीचं पडलं नाही. त्यांचं लग्न हे फार काळ टिकलं नाही वयाच्या 20 व्या वर्षी त्यांना श्रीहरि सपकाळ यांनी टाकून दिलं. 'sindhutai sapkal information in marathi'
वयाच्या अगदी कमी वयात त्यांना अनेक संघर्ष करावे लागले. त्यातला पहिला संघर्ष असा "माई" जेव्हां चौथ्या वेळेस गर्भवती होत्या. तेंव्हा गुऱ्हे वळणे त्यांचें शेन काढणे अशी कामे त्यांना करावी लागतं. हजारो जनावर सांभाळून त्यांच शेन काढून महिलांचे कंबरडे मोडले तरीही त्यांना एक रुपयाही मजुरी मिळत नसे. त्याकाळात त्या सेणाचा लिलाव तिथले वनरक्षक अधिकारी करत असतं. या जाचाला कंटाळून अखेर सिंधू ताईंनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले. नंतर त्यांना या लढ्यात त्यांना यश आले. परंतू या बंडाची प्रचंड मोठी किंमत त्यांना पूढे चुकवावी लागली. सिंधूताई सपकाळ यांना यातून अल्पासा मोबदला मिळायचा त्यामुळे तिथल्या एका जमीनदाराची वन अधिकाऱ्याकडून येणारी रक्कम बंद झाली.'sindhutai sapkal information in marathi'
याचं जमीन दाराने सिंधूताई सपकाळ यांच्या पोटातील मुलं माझं आहे, असा अपप्रचार केला. याचं खोट्या माहितीवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत माईंच्या नवऱ्याने त्यांना मारहाण करुन बाहेर हाकलून दिले. जनावरांच्या तुडव्याने त्या मरून जाव्या म्हणून त्यांना गोठ्यात डांबलं. सिंधू ताईंचे दिवस भरत आले होते. म्हणुन त्यांनी गोठ्यातच आपल्या मुलीला जन्म दिला. नंतर मुलीचं संगोपन अशा अवस्थेत कसं करावं म्हणुन त्या माहेरी गेल्या. परंतू त्यांच्या आईनेही तिथे राहण्यास त्यांना नकार दिला. गावकऱ्यांनी देखिल त्यांना मारहाण करुन गावा बाहेर हाकलून दिले.
असा कठिण प्रसंग आयुष्यात आल्याने काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. अशा या अवगडलेल्या अवस्थेत काम कसं करावं म्हणुन त्या परभणी - मनमाड रेल्वे स्टेशनवर वर भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. कुणी भाकर तुकडा दिला तोच खायचा. रेल्वे स्टेशनवर एखाद अर्ध फळं कुणी फेकून दिलं तर तेचं खायचं अशा या जीवनाला कंटाळून शेवटी मरावं असं त्यांना वाटू लागलं. एकदा त्यांनी जळगाव येथिल पिंप्राळा रेल्वे स्टेशनवर रेल्वे खाली जाऊन जीव देण्याचा प्रयत्न देखिल केला. परंतू लहानग्या मुलीचा विचार करून त्या पुन्हा सावरल्या. त्यांचा पुन्हा तोच दिनक्रम सुरू झाला. त्यांनी मागितलेली भीक देखिल त्या सर्व भिकारी लोकांना द्यायच्या. सर्वांना जवळ घेऊन एकत्र काला करुन त्या खात असतं. पूढे कधी - कधी दोन - तीन दिवस सुद्धा काहीचं मिळत नसे. म्हणुन इथे रेल्वे स्टेशनवर आपला निभाव लागणार नाही. असं म्हणुन सिंधूताई सपकाळ यांनी शेवटी स्मशान भुमिकडे वाटचाल केली आणि तिथे काही दिवस काढले.'sindhutai sapkal information in marathi'
सिंधूताई सपकाळ यांचे सामाजिक कार्य - Social work of Sindhutai Sapkal
माईंच्या आयुष्यात त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागला. खरतर अशा अवस्थेत जिवन जगणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. त्यांचा दृष्टिकोन हा सर्व अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा होता. आपल्या होत आलेल्या हाल अपेष्टा पाहून आपल्या मुलीच्या वाटेला ते येऊ नये म्हणुन त्यांनी आपली मुलगी ममता ला दगडुशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी पाठवले. सर्व अनाथ मुलांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी इ. स. 1994 ला पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात "कुंभार वळण" या गावात 'ममता बाल सदन' या नावाने संस्था सुरू केली. या संस्थे मार्फत अनाथ मुलांना योग्य शिक्षण, राहण्याची सोय, जेवणाची सोय, शालेय साहित्य ई. देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केलं जातं. नंतर नोकरी मिळाल्यावर योग्य जोडीदार शोधून त्यांचें लग्न व्यवस्थित रित्या पार पाडायची जीमेदारी देखिल संस्था पार पाडते. या संस्थेत जवळपास 1000 पेक्षा अधिक अनाथ मुलांना आजवर शिक्षण मिळालं असून त्यांच्या आयुष्याला इथूनच एक नवीन दिशा मिळाली.
सिंधूताई सपकाळ यांनी अन्य काही संस्था स्थापन केल्या. त्यात सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह (चिखलदरा), गोपिका गाई रक्षण केंद्र (वर्धा), अभिमान बाल भवन (वर्धा) , ममता बाल सदन, (सासवड), सप्तसिंधू महीला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था (पुणे), बाल निकेतन हडपसर (पुणे). इ. या सर्व संस्था सुरळीत चालत रहाव्या म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले.'sindhutai sapkal information in marathi' संस्थेच्या कामकाजासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणुन त्यांनी अनेक प्रदेश दौरे केले. अंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या वकृत्वाने त्यांनी समाजाला प्रभावित केले. परदेशातून सुद्धा संस्थेसाठी अनुदान उपलब्ध व्हावे म्हणून सिंधू ताईंनी " मदर ग्लोबल फाऊंडेशन " या संस्थेची स्थापना केली.
![]() |
'sindhutai sapkal information in marathi' |
सिंधूताई सपकाळ यांचा सन्मान - Honoring of Sindhutai Sapkal
सिंधू ताईंच्या महान कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. माईंच्या आयुष्याच्या कारकिर्दीत 750 पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
त्यांना मिळाले काही निवडक पुरस्कार -
• पद्मश्री पुरस्कार (2021)
• महाराष्ट्र शासन अंतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
• महाराष्ट्र शासन अंतर्गत देण्यात येणारा "अहिल्याबाई होळकर पुरस्कार" (2010)
• शिवलीला महीला गौरव पुरस्कार
• मूर्तिमंत आईसाठी चा पुरस्कार (2013)
सिंधूताई सपकाळ यांचा मृत्यू - Death of Sindhutai Sapkal
सिंधूताई सपकाळ यांनी त्यांचं अख्खं आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत घालवलं. त्यांना आजही " अनाथांची माय "म्हणून ओळखलं जातं. आशा या माईंच्या आयुष्यातला शेवटचा दिवस दिनांक 4 जानेवारी 2022 हा ठरला. या दिवशी गलॅक्सी हॉस्पिटल पुणे येथे हृदय विकाराने त्यांचा मृत्यू झाला. त्या आधी एक महिन्यापूर्वी त्यांचें हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. गेली 5 वर्षापासून जडलेल्या आजाराने त्यांचें डाव्या बाजूचे फुफ्फुस सुरळीत चालत नव्हते. सर्जरी नंतर त्यांची तब्येत बरी झाली होती. परत काही दिवसांत फुफ्फुसाचे संतुलन बिघडले आणि त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मावळली.
त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह असल्याने त्यांना भूमि डाग देण्यात आला. अशा या महान सिंधू ताईंनी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होताना वाचवले. दीन दुबळ्या लोकांना मदत केली. अनाथांना सहारा देऊन त्यांना मोठं केलं. त्यांनी शिकवलेली अनेक अनाथ मुलं आज मोठं मोठया पदावर कार्यरत असून अनेकांनी आपला संसार देखिल थाटला आहे. खरतर आताच्या या युगात अशा महान व्यक्ती जन्माला येणं हि गोष्ट फार दुर्मिळ म्हणावी लागेल. सिंधूताई सपकाळ यांचं कार्य अत्यंत महान असून त्यांच्यावर लिहायला गेलं तर शब्द कमी पडतील. तरीसुद्धा जेवढी महिती माझ्याकडे उपलब्ध झाली. तेवढी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जर सिंधूताई सपकाळ यांच्या बद्दल आपल्याकडे अजून काही महिती असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. ती योग्य असेल तर आम्ही या लेखात अपडेट करू. हा लेख आवडला तर शेअर करायला विसरू नका. तसेच विविध विषयावरील सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग साईट वर भेट द्या.'sindhutai sapkal information in marathi'
हे सुध्दा अवश्य वाचा 👇
1) अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र
2) महाराणा प्रताप यांचे जीवनचरित्र
3) संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र
4) संत जनाबाई यांचे जीवनचरित्र
FAQ
1. सिंधूताई सपकाळ यांचा जन्म कधी झाला ?
- 14 नोव्हेंबर 1948
2. सिंधूताई सपकाळ यांचा मृत्यू कधी झाला ?
- 4 जानेवारी 2022
0 Comments