महाकालेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Mahakaleshwar Temple Information In Marathi

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Mahakaleshwar Temple Information In Marathi

'mahakaleshwar temple information in marathi'
'mahakaleshwar temple information in marathi'

     आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग असून या बाराही ठिकाणी भगवान शिव शंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते. शिव स्पर्शाने पावन झालेली हि ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात.'mahakaleshwar temple information in marathi'  या लेखात आज आपण भारत देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असणारे "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" मंदिराची सखोल माहिती पाहणार आहोत. 

       "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" हे ठिकाण भारत देशातील मध्यप्रदेश या राज्यात "उज्जैन'(ujjain) या शहरात स्थित आहे. मोठ्या शहरांपैकी एक असणारे "उज्जैन" हे शहर "क्षिप्रा" नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. "उज्जैन" हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. "कुंभमेळा" याच शहरात भरतो. सर्व वाचकांना आवडेल असा महाकालेश्वर मंदिरांचा संपूर्ण इतिहास (history of mahakaleshwar temple) या लेखात लिहला असून सर्वांनी हा लेख अवश्य वाचावा. तसेच महाकालेश्वर मंदिराचे महत्त्व जाणून घ्यावे ही नम्र विनंती.


हे सुध्दा वाचा 👇

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण इतिहास


महाकालेश्वर मंदिराचा इतिहास - History Of Mahakaleshwar Temple

'mahakaleshwar temple information in marathi'
"Mahakaleshwar Temple photos"

   या "महाकालेश्वर"(Mahakaleshwar) मंदिराची पार्श्वभूमी पाहता हे मंदिर अत्यंत प्राचीन काळातील असून या मंदिराची रचना अप्रतिम आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रापैकी एक म्हणून देशभरात परिचित असणारे "महाकालेश्वर" हे मंदिर "उज्जैन"(ujjain) जिल्ह्यातील "क्षिप्रा" या नदीच्या तीरावर विराजमान आहे.'mahakaleshwar temple information in marathi'  तसेच महाकालेश्वर(Mahakaleshwar) मंदिराच्या बाजूला "रुद्र सागर"(rudra sagar) नावाचा तलाव आहे. हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशवाई काळात बांधले गेलेले आहे.

       पूर्वीचे मंदीर इ. स. 1235 दरम्यान इल्तू मिष या दिल्लीच्या मुस्लिम हुकूम शहाने हे मंदिर पूर्णतः उध्वस्त केले होते. यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इ. स. 1734 ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला. जवळपास 8 व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले. उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता. नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्या वरती सोपवला. राणोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेणवी हे त्यांचे दिवाण होते. ते खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च केली. त्यामुळे अठराव्या शतकाच्या सुमारास "महाकालेश्वर मंदिर" अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले. काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या राणोजी रावांचे चिरंजीव "महादाजी शिंदे" यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे.


• हे वाचा 👇


श्री शैलम मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती

    "महाकालेश्वर मंदीर (mahakaleshwar temple)" हे अत्यंत सुंदर असून, या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे तसेच मंदिरा भोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे. या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिव शंकराची पिंड दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास "दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग" म्हणून ओळखले जाते. (Mahakaleshwar Jyotirlinga) या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश, माता पार्वती व कार्तिकी यांच्या प्रतिमा आहेत. तसेच मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे. मंदीर हे पाच मजली असून पहिला मजला जमिनीखाली आहे. या मंदिरावर नक्षीदार कोरीव "शिल्प काम" करण्यात आले असून, तिसऱ्या मजल्यावर "नाग चांद्रेश्वराची" (nagchandreshwar) मूर्ती आहे. पण ही मूर्ती नेहमी दर्शनास उपलब्ध नसते. या मूर्तीचे दर्शन फक्त नागपंचमीच्या पावन मुहूर्तावर होते. या मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व बाजूंनी दिव्यांचा प्रकाश असतो.

'mahakaleshwar temple information in marathi'
'Mahakaleshwar Temple'

 
     महाकालेश्वर (mahakaleshwar)  या मंदीराची महानता एकूण इथे दर्शनासाठी संपूर्ण भारतातील अनेक राज्यातून भाविक येत असतात. महाशिवरात्रीच्या (mahashivratri) पर्वकाळात या ठिकाणी अत्यंत गर्दी असते. आणखी एक विशेष उज्जैन(ujjain) येथे कुंभमेळा भरतो. त्या काळात सुद्धा अनेक भाविक भक्त उज्जैन येथे येत असतात, दर आठवड्यातील सोमवार, श्रावण महिना तसेच भाद्रपद महिन्याच्या काळात या ठिकाणी भाविकांची अचाट गर्दी होत असते. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी महाकालेश्वर येथे दिव्य पालखी सोहळा असतो. शाही सावरी नामक पालखीतून भगवान "महाकाल" यांची मिरवणूक काढण्यात येते, या उत्सवात देखील अनेक भाविक सहभागी होतात.


     तांत्रिक विद्या मंत्रणेसाठी हे मंदिर महत्त्वपूर्ण मानले जाते. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या या विशेष आशा "महाकालेश्वर"(mahakaleshwar) मंदिराचे वैभव अत्यंत महान आहे. या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केलेले आहे. श्री व्यास ऋषी पासून तर कवी कालिदास, राजा भोज तसेच बनभट्ट यांसारख्या महान विभूतीनी मंदीराचे महत्व आपल्या लेखणीतून वर्णिले आहे.

  "महाकालेश्वर" हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, हे एक ज्योतिर्लिंग (mahakaleshwar jyotirlinga) व "शक्तीपीठ" म्हणून सुद्धा ओळखले जाते. देशातील 18 महाशक्ती पीठांपैकी एक असा या मंदिराचा उल्लेख केला जातो. जेव्हा भगवान शिव शंकराने आपल्या "सती" नामक पत्नीचे प्रेत घेऊन रागाच्या भरात प्रचंड मोठा तांडव केला. तेव्हा त्यांच्या पत्नीच्या शरीराचे 51 तुकडे या पृथ्वीवर पडले. या सती मातेच्या शरीराच्या तुकड्यापैकी त्यांचे ओठ या ठिकाणी पडल्यावर त्या ओठांच्या तुकड्यात माता भगवती यांनी स्वतः प्रवेश केला. तेंव्हापासून येथे "महाकाली"(mahakali) हे शक्तिपीठ उदयास आले.

'mahakaleshwar temple information in marathi'
"Mahakaleshwar jyotirlinga photos"


महाराष्ट्रतील प्रसिध्द साडेतीन शक्तिपीठे 👇


1. आई तुळजाभवानी मातेचा संपूर्ण इतिहास
2. माहूरच्या रेणुका मातेचा संपूर्ण इतिहास
3. सप्तश्रृंगी मातेचा संपुर्ण इतिहास


महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कथा - Story Of Mahakaleshwar Jyotirlinga

'mahakaleshwar temple information in marathi'
"Mahakaleshwar Jyotirlinga" 

    शिव पुराणात या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वर्णन आले असून, याबद्दलची कथा देखील सांगितलेली आहे. या कथे नुसार एकदा श्रीविष्णू, भगवान शंकर, तसेच सृष्टी निर्माते ब्रह्मदेव हे तिघे एकत्रित गप्पा मारत बसले असता, महादेवाच्या मनात एक विचार आला त्यांनी श्री विष्णू व ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. या कारणास्तव शंकरांनी त्या दोघांना सृष्टीतील प्रकाशाचा एक स्तंभ देऊन प्रकाशाचे अंतिम टोक कुठे आहे ? असा प्रश्न विचारला.

     हे अंतिम टोक शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांना या टोकाचा काही शोध लागला नाही. त्यामुळे त्या दोघांपैकी शेवटी थकून श्री विष्णू देवाने महादेवा पूढे आपली हार मानून ते शांत बसले. परंतु मला या प्रकाशाचे अंतिम टोक सापडले, असा खोटा दावा ब्रम्ह देवांनी केला. हे ब्रम्ह देवाचे खोटे उत्तर एकूण भगवान शंकराचा राग अनावर झाला, व त्यांनी ब्रह्म देवास शाप दिला. 

ते ब्रम्ह देवास म्हणाले की तूम्ही जरी या सृष्टीचे निर्माते असला, तरी सुद्धा आजपासून या पृथ्वीतलावर तुमची पूजा कोणीही करणार नाही. या जगतात फक्त श्री विष्णूची पूजा केली जाईल. हा शाप एकूण ब्रम्ह देवांनी शिव शंकर यांना माफी मागितली. आणि ते म्हणाले माझी चूक झाली त्यामुळे मला या शापातून मुक्त करा. ही ब्रह्म देवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रगटले. पुढे याच स्तंभाचे शिवलिंग निर्माण होऊन तेच आज "महाकालेश्वर ज्योतिर्लिंग" म्हणून उदयास आले. याच महाकालेश्वर शंकरास "महाकाल" म्हणून ओळखले जाते. हेच महाकाल "उज्जैन" नगरीचा राजा या नावाने प्रचलित आहे.


महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्ये-          महाकालेश्वर मंदीराचे अनेक वैशिष्ट्य असून, त्यातील काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत..


• महाकालेश्वर येथील भस्म आरतीचे महत्व ?

      महाकालेश्वर मंदिरात "महाकाल" यांची पूजा करून भस्म आरती केली जाते. इथल्या भस्म आरती साठी महाकालेश्वर हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. ही आरती पहाटे चारच्या दरम्यान केली जाते. या आरतीचा कालावधी सूर्योदयाच्या पूर्वी असतो. या भस्म आरतीच्या प्रकारात महाकाल यांच्यावर पवित्र राखीचा(भस्माचा) वर्षाव केला जातो. हा प्रसंग चालू असताना प्रत्यक्ष "महाकाल" आपल्यासमोर उभे असल्याची प्रचिती भाविकांना जाणवते. 

     धार्मिक दृष्टिकोनातून "महाकाल" यांना मृत्यूची देवता म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण असे दक्षिण दिशेला ते प्रकट झाले, त्यामुळे त्यांचे इथले वास्तव्य दक्षिण दिशेस आहे. दक्षिण ही मृत्यूची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जन्म-मृत्यू वर ज्याची सत्ता अशी भगवान शिवशंकर यांची ख्याती असल्याने त्यांची "भस्म आरती" केली जाते.'mahakaleshwar temple information in marathi' 


• महाकालेश्वर महाकाल का म्हणतात ?


      एकेकाळी आताचे "उज्जैन" शहर हे पुर्वी "अवंतिका नगरी" या नावाने प्रचलित होते. या नगरीत "चंद्रसेन" नावाचा राजा राज्य करीत होता. तो महादेवाचा प्रचंड मोठा भक्त असून नियमित रूपाने महादेवाची पूजा आराधना करायचा. असा एकही दिवस जात नसे, की ज्या दिवशी राजाने महादेवाची पूजा केली नाही. आशा या शिवभक्त "चंद्रसेन" राजाच्या अवंतिका नगरीवर इतर राज्यांतील राजांचे आक्रमण झाले.

     तेव्हा चंद्रसेन राजाचा राजवाडा शत्रूंनी संपूर्ण नष्ट केला. यावेळी या संकटातून वाचवण्यासाठी राजाने महादेवाची प्रार्थना मनापासून केल्याने महादेव प्रत्यक्ष प्रकट झाले व त्यांनी चंद्रसेन राजाच्या संपूर्ण शत्रूचा वध केला. या संकटातून त्यांनी चंद्रसेन राजाला वाचवले. ज्यावेळी महादेवांनी चंद्रसेन राजाच्या सर्व शत्रूचा वध केला. तसेच क्रोधित होऊन त्या सर्वांच्या मृतदेहांची राख आपल्या शरीराला फासून त्यांनी क्रोध शांत केला.

'mahakaleshwar temple information in marathi'   तेव्हापासून "महाकालेश्वर" महादेवाला "महाकाल" या नावाने ओळखले जाते. या घटने पासूनच महाकाल यांची "भस्म आरती" केली जाते. आजही कुठलेही शुभ कार्य करायचे असेल तर या भागातील सर्व लोक अगोदर महाकाल यांचा आशीर्वाद घेतात.


• महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे कसे जावे ?


         सर्व शिव भक्तांना "उज्जैन" येथील महाकालेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी सर्व प्रकारातील वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा तसेच इतर खाजगी वाहतूक सुविधा देखील अनेक भागातून उपलब्ध आहेत.'mahakaleshwar temple information in marathi' 


विमान सेवा - महाकालेश्वर येथे हवाई मार्गाने यायचं झाल तर, उज्जैन येथून 54 किमी अंतरावर "इंदोर" इथे विमानतळ आहे.

      इंदोर येथील हवाई मार्ग भारतातील अनेक राज्याशी जोडला गेला आहे. इंदोर इथे पोचल्यावर उज्जैन कडे रवाना होण्यासाठी अनेक खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध असून अवघ्या 1 तासाभरात तुम्ही उज्जैन येथे पोहचाल.


 रेल्वे सेवा-  "उज्जैन" शहर हेच एक मोठे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळें भारतातील अनेक शहरातून रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणीं यायला सोपे आहे. त्यामुळे "महाकाल" महादेवाच्या दर्शनास यायचं असेल, तर रेल्वे सेवा एक उत्तम पर्याय आहे.


बस सेवा -   "मध्य प्रदेश" राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातून उज्जैन ला येण्यासाठी भरपूर बस सुविधा उपलब्ध आहेत. जर काही भाविकांना बसचा प्रवास नको असेल, तर त्यांच्यासाठी खाजगी वाहनांच्या सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.


• महाकालेश्वर ते ओंकारेश्वर अंतर | mahakaleshwar to omkareshwar distance - 112 Km

 

• उज्जैन ते महाकालेश्वर अंतर | ujjain to mahakaleshwar distance - 2.7 km


• उज्जैन रेल्वे स्टेशन ते महाकालेश्वर आंतर  | ujjain relway station to mahakaleshwar distance - 1.4 Km


        या लेखात "महाकालेश्वर" मंदीराची संपूर्ण माहिती मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कधी योग आला तर नक्की "महाकाल" (mahakal) महादेवाच्या दर्शनास अवश्य जा,  तसेच या लेखातील महत्वपूर्ण माहिती आपणास आवडली असेल, तर आपल्या मित्रांना शेअर करायला अजीबात विसरू नका.


आमचे हे लेख सुद्धा वाचा 👇


• गाथा मंदिर देहू संपूर्ण इतिहास
• आषाढी एकादशी व्रत इतिहास

FAQ 

1. कुंभमेळा भारतात कुठे कुठे भरतो ?

     - उज्जैन, प्रयाग राज, नाशिक, हरिद्वार 



Post a Comment

0 Comments