काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती | Kashi Vishwanath Temple Information In Marathi
नमस्कार मित्र - मैत्रिणींनो आज आपण या लेखात बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रसिद्ध असणारे सातव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वनाथ(kashi vishwanath) या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत.'kashi vishwanath temple information in marathi' सोरठी सोमनाथ, श्रीशैलम मल्लिकार्जून, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, परळी वैजनाथ व भीमाशंकर या मागील सहा ज्योतिर्लिंगाची माहिती हवी असेल, तर आमच्या ब्लॉक साइटच्या मेनू बार मधील "तीर्थक्षेत्र" या पेजला अवश्य भेट द्या.
काशी विश्वनाथ(kashi vishwanath) हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या जिल्ह्यात वसलेले आहे. हे मंदीर स्वयंभू प्रकारातील असून प्रमुख तीर्थक्षेत्रात गणले जाते. या काशी विश्वनाथ(kashi vishwanath) मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा ही नम्र विनंती.
काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास | Kashi Vishwanath Temple History In Marathi
"काशी विश्वनाथ मंदीर"(kashi vishwanath temple) अत्यंत पौराणिक असून महाभारताच्या काळात निर्माण केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर "गंगा" या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर विराजमान असून, या मंदीराची रचना अत्यंत सुंदर आहे. संपूर्ण विश्वाचे मालक अशी ज्यांची ख्याती त्या भगवान शिव शंकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली हि भूमी अत्यंत पवित्र "तीर्थक्षेत्र" म्हणून ओळखली जाते. 'kashi vishwanath temple information in marathi' काही वृद्ध भाविक आपल्या आयुष्याचा शेवट "काशी विश्वनाथ"(kashi vishwanath) येथे व्हावा यासाठी इथे येत असतात. आशा या महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या "काशी विश्वनाथ"(kashi vishwanath) या मंदिराचा इतिहास देखील अवर्णनीय आहे.
पुरातन इतिहास पाहायला गेलं तर हे मंदिर कुणी बांधले याबद्दल काही जास्त महिती उपलब्ध नाही. परंतू इतिहासातील माहितीच्या आधारावर इ.स. पूर्व 11 व्या शतकात या मंदीराचे नव्याने बांधकाम महान प्रशासक राजा "हरिश्चंद्र" यांनी केले होते. राजा विक्रमादित्य यांनी काही काळानंतर या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
काशी विश्वनाथ मंदीर (kashi vishwanath) हे अनेकदा उध्वस्त केले गेले तरी आजही ते दिमाखात उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते. काशी विश्वनाथ मंदीर(kashi vishwanath temple) सर्व प्रथम इ. स. 1194 मध्ये महंमद घोरीने लुटले व पाडून नष्ट केले. परंतू काही काळानंतर ते पुन्हा बांधण्यात आले, तरीही इ. स. 1447 मध्ये मुहम्मद शहाने मंदिरास पुन्हा नष्ट केले. यानंतर हे मंदिर इ. स. 1585 ला तोडरमल राजाने बांधले. इ. स 1632 ला शहाजहान ने ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याने काशीतील इतर काही मंदिरं देखील त्या काळात उध्वस्त केली.
काशी विश्वनाथ(kashi vishwanath) हे मंदिर इ. स. 1669 ला औरंगजेबाने देखिल उध्वस्त केले होते. पुढे अनेक वर्ष या मंदीराची अवस्था विकट होती. परंतू ई. स. 1780 च्या सुमारास या मंदिराचा जिर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकरांनी केला. या मंदीराचे सुशोभीकरण करण्यासाठी इ. स. 1853 ला "राजा रणजित सिंह" यांनी 1000 किलो सुवर्ण या मंदिरास दान केले, याच सोन्याचा उपयोग करून मंदीराचे शिखर सजवले आहे. याच शिखरातील काही सोने त्या काळात चोरीला देखील गेले असल्याची माहिती आढळते. मंदिराची शेवटची पुनर्बांधणी इ. स 1905 ला झाल्याची नोंद आहे.
![]() |
"kashi vishwanath temple information in marathi" |
"दक्षिणेचे कैलास" म्हणून ओळखले जाणारे 'श्री शैलम मल्लिकार्जुन' ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कथा | Story Of Kashi Vishwanath Jyotirlinga

"Kashi Vishwanath Jyotirlinga"

जेंव्हा पार्वती मातेचा विवाह भगवान शिव शंकर यांच्याशी झाला, तेंव्हां ते दोघे कैलास पर्वतावर वास्तव्य करीत होते. परंतू पार्वती मातेस त्या नविन असल्याने कैलास पर्वतात त्यांचे मन रमत नव्हते. शिव शंकर अंगाला भस्म चर्चित असल्याने सर्व जण त्यांची टिंगल करत असत. पार्वती मातेस सुद्धा ते चिडवत असतं. त्यामुळे पार्वती मातेने आपल्या पती शंकरास एखाद्या दुसऱ्या निवांत ठिकाणी जाण्याची विनंती केली.
पार्वती मातेची ईच्छा पुरविण्यासाठी शिव शंकर पार्वती मातेस सोबतीला घेऊन काशी येथे राहावयास आले. त्यांनी या ठिकाणी दीर्घकाळ आपले वास्तव्य केले.'kashi vishwanath temple information in marathi' यातूनच पुढे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग उदयास आले. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कुणाच्या तपश्चर्या ने प्रगट झालेले नसून ते प्रत्यक्ष शिव निर्मित आहे. या परिसरात अन्य देवी - देवतांची भरपूर पुरातन मंदिर आहेत.
• काशी विश्वनाथ आरती -
"काशी विश्वनाथ"(kashi vishwanath) मंदीर जसे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते अगदी तसेच महत्व इथल्या नित्य आरतीला दीले जाते. काशी विश्वनाथ महादेवाची आरती ही संपूर्ण देशात प्रख्यात आहे. या मंदिरात पहाटेच्या ब्रम्ह मुहूर्तावर मंगळा आरती केली जाते. हिचं आरती दिवसभरातून चार वेळा केली जाते. मंदीराची दरवाजे पहाटे 2.30 नंतर उघडतात. तेंव्हापासून विश्वनाथ महादेवाची आरती 5 वेळा केली जाते.
विश्वनाथ मंदिरात पहाटे 4 नंतर भाविकांना दर्शनास प्रवेश दिला जातो,'kashi vishwanath temple information in marathi' सकाळी सुमारे 11 वाजेपर्यंत दर्शन रांग चालूच असते. त्यानंतर 11 ते 12 च्या सुमारास पूजा व आरती केली जाते. त्यानंतर तीर्थप्रसाद दिला जातो, या एक तासाच्या वेळेत दर्शन बंद असून लगेच दुपारी 12 च्या नंतर दर्शन रांग पुन्हा सुरू होऊन रात्री 11 पर्यंत दर्शन चालू असतात. मधल्या काळात सायंकाळी 7 वा. सप्तऋषी आरती मोठ्या उत्साहात केली जाते. या आरतीला अनेक भाविक गर्दी करतात. त्यानंतर सुमारे 9 वां. भोग आरती केली जाते , भोग आरती समाप्त झाल्यावर रात्री 10.30 ला शयन आरती होते. आणि ठीक 11.00 वा. मंदिराचे दरवाजे बंद होतात.
"ओम" आकारात विराजमान असणाऱ्या "ओंकारेश्वर" ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण रहस्य तसेच संपूर्ण इतिहास
• काशी येथील इतर प्रसिध्द स्थळे -
![]() |
"kashi vishwanath temple information in marathi" |
पवित्र शहरांपैकी एक म्हणून काशीची ओळख सर्वत्र आहे. याच पवित्र भुमिस महादेवाची नगरी म्हणून ओळखले जाते, असं म्हणतात की "काशी विश्वनाथ" हे तिर्थक्षेत्र भगवान शिव शंकराच्या त्रिशूळावर विराजित आहे. याच पवित्र भूमीत शांती ब्रम्ह श्री संत एकनाथ महाराजांनी "श्री एकनाथी भागवत" हा महान ग्रंथ लिहिला.
"काशी विश्वनाथ" मंदिराच्या परिसरात एकूण 1654 मंदिरे असून त्यापैकी काही मंदिरं प्रसिद्ध सुद्धा आहेत, सर्वाधिक मंदिरं असलेल्याला या शहरास "मंदिराचे शहर" म्हणून ओळखले जाते. काशी विश्वनाथ मंदिरास प्रचंड महत्व असून,'kashi vishwanath temple information in marathi' या मंदिरात दर्शनास जाण्यापूर्वी "धुंडीराज विनायकाचे" दर्शन घ्यावे लागते.
याच मंदिराच्या भोवताली आपल्याला अष्ट विनायकाचे दर्शन होते, त्यांच वास्तव्य आठही दिषेश असून पश्चिमेस साक्षी विनायक , उत्तरेस देहली विनायक, दक्षिणेस पापशार्थी विनायक, नैऋत्येस दुर्गा विनायक, वायव्येस भिमचंद्र विनायक, ईशान्य दिशेला उदंड आणि आग्नेयेस सर्व विनायक, ई. मंदिरे आहेत.
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना 3 पुष्प हार विकत घेण्याची इथली पद्घत आहे. यातील एक हार महादेवाला तर दुसरा हार माता पार्वतीस अर्पण करून तिसरा हार पुजारी मंत्र उपचार करून त्या भाविक भक्ताच्या गळ्यात घालतो.
रावण निर्मित प्रसिध्द ज्योतिर्लिंग "परळी वैजनाथ" मंदिराचा इतिहास नक्की वाचा
• काशी विश्वनाथ येथे कशे जाल ?
उत्तर प्रदेशातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणारे गंगा घाटात दिमाखात वसलेले काशी विश्वनाथ हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. या जिवनात मुक्ती मिळवण्यासाठी अनेक भविक या पुण्य भूमीत विश्वनाथ महादेवाच्या दर्शनास येत असतात. काशी येथे येण्यासाठी विविध प्रकारातील वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
काशी येथे यायचं असेल तर अगोदर वाराणशी येथे जावे लागते. वाराणशी येथे येण्यासाठी हवाई मार्ग, महामार्ग, रेल्वे महामार्ग ई. सुविधा उपलब्ध आहेत.
विमान सेवा - काशी विश्वनाथ येथे येण्यासाठी विमानसेवा उपलब्ध असून, लाल बहादूर शास्त्री हे विमानतळ वाराणशी पासून फक्त 18 किमी अंतरावर आहे. या विमान तळाशी अनेजणांनी राज्यातील प्रमुख विमानतळ जोडली गेलेली आहेत.
रेल्वे सेवा - उत्तर भारतातील प्रमुख रेल्वे स्टेशन पैकी एक असणारे वाराणशी हे रेल्वे स्टेशन भारतातील बहुतांश रेल्वे स्टेशन ला जोडले गेले आहे, त्यामुळे या काशी विश्वनाथ येथे येण्यासाठी रेल्वेचा प्रवास भाविकांना अत्यंत सुखकर आहे.
काशी विश्वनाथ येथे येण्यासाठी अनेक भागातून बस सुविधा उपलब्ध असून, अनेक खाजगी वाहतूक सुविधा सुद्धा आहेत. त्यामुळे वेळात वेळ काढून अवश्य या पवित्र ठिकाणास भेट द्या.'kashi vishwanath temple information in marathi' या लेखातून मी काशी विश्वनाथ या मंदिरा बद्दल बरीच माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण माहिती अगदी अचूकचं आहे, असा माझा बिलकुल दावा नाही. त्यामुळे हि आपणास आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
0 Comments