माहूर गडाची संपूर्ण माहिती | Mahurgad Information In Marathi | रेणुका माता इतिहास | History of Renuka Mata
संपूर्ण भारतात पाहायला गेले तर एकूण 51 शक्तीपीठ असल्याचे पुराणात सांगितले जाते. त्यापैकी प्रमुख असणारे साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात विराजमान आहेत. त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी माता, माहूर गडावरील रेणुका माता, तुळजापूरची आई तुळजाभवानी, तसेच अर्धपीठ म्हणून प्रसिद्ध असणारी सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता. या 'mahurgad information in marathi' लेखात आपण या साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असणाऱ्या माहूर गडावरील रेणुका मातेचा इतिहास पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा लेख सविस्तर वाचून माहुर गडाचा इतिहास जाणून घ्यावा ही विनंती.
हे सुद्धा वाचा 👇
1) तुळजा भवानी मातेचा संपूर्ण इतिहास
2) आई सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती
माहूर गडाचा इतिहास - History Of Mahurgad

यादवकालीन किल्ला "रामगड"

नांदेड जिल्ह्यात सौंदर्याने नटलेल हिरव्यागार डोंगरात वसलेलं "माहूरगड" (mahurgad ) हे ठिकाण अत्यंत शोभिवंत आहे. माहूर गडावर "रामगड"(ramgad) हा किल्ला वसलेला आहे. तो सुमारे समुद्रसपाटीपासून सुमारे 26 फूट उंचीवर असून या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत जुने आहे. या किल्ल्याला "गिरीदुर्ग" (giridurg) या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा किल्ला यादवकालीन असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात. या किल्ल्याला दोन तट आहेत. या किल्ल्याबद्दल असे सांगितले जाते, की या किल्ल्याचा एक तट राष्ट्रकूट घराण्यातील राजाने बांधला तर दुसरा तट व इतर बांधकाम देवगिरी येथील यादव कुळातील राजा "रामदेवराय" यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो. या किल्ल्याचा एकूण विस्तार जवळपास 9 किलोमीटर असून हा किल्ला काही दिवस गौड राजाच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे या किल्ल्याला "गौड किल्ला" म्हणूनही ओळखले जाते. नंतर तो बहामनी सुलतान आदमशहा याने जिंकून आपल्या ताब्यात घेतला. "रामगड" हा किल्ला मोगल, निजाम यांच्या देखील अधिपत्याखाली काही दिवस राहिला. 'mahurgad information in marathi' शेवटी या किल्ल्यावर मराठा साम्राज्याचे देखील अधिपत्य असल्याची नोंद सर्वत्र इतिहासात आढळते.
![]() |
रामगड किल्ल्या भोवतीचा निसर्ग |
• हे सुद्धा वाचा - 👇
गड जेजुरी संपूर्ण इतिहास
तीर्थक्षेत्र माहूर- Renuka Devi Temple
साडेतीन शक्ती पीठांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे, तसेच रेणुका मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेली माहूरगड(mahur fort) हे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील कीन वट तालुक्यापासून सुमारे 48 किमी अंतरावर आहे. रेणुका मातेचे मंदिर अवतीभवती असणाऱ्या हिरव्यागार डोंगरांनी व्यापलेले असून सभोवताली घनदाट जंगल आहे. चैत्र महिन्यात तसेच नवरात्र उत्सवात गडावर भक्तांची प्रचंड गर्दी असते.'mahurgad information in marathi' याच रेणुका मातेस परशुरामाची माता म्हणून देखील ओळखले जाते. हे शक्तिपीठ अत्यंत जागृत असून भक्तांच्या मनोकामना पूर्णत्वास नेते, हा सर्व भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. रेणुका मातेचे मंदिर (renuka temple) जवळपास 13 व्या शतकात बांधले गेल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम "देवगिरी" (devgiri) येथील यादवकालीन राजाने केले असल्याचा इतिहासात संदर्भ आहे.
श्री क्षेत्र माहूर गडावर अनेक देवदेवतांची मंदिरे असून श्री दत्तगुरु यांचा जन्म याच गडावर झाल्याचे सांगितले आहे. या गडावर श्री दत्तगुरु, अनुसया माता, रेणुका देवी (renuka devi) , जमतग्नी ऋषी, श्री परशुराम व आत्री ऋषी या सर्व देवतांचा वास असतो. सुरुवातीला माहूर उल्लेख "मातापुर" असा केला जायचा. या माहूर (mahur) क्षेत्राची निर्मिती कशी झाली, या संदर्भात पुराणात एक कथा आहे. या समस्त प्रकृतीची रचना करताना ब्रह्म देवास सोपे जावे यासाठी भगवान श्री विष्णू यांनी स्वतः या स्थळाची निर्मिती केली होती.
श्री क्षेत्र माहूर गडाच्या तिन्ही बाजूंनी "पैनगंगा" नावाची नदी वाहते. या नदीचा देखील पुराणात संदर्भ सापडतो. तो सांगायचा झाला तर श्री क्षेत्र लोणार (lonar) येथे श्री विष्णू देवांनी लवणासुर दैत्याचा वध केला. त्यामुळे आनंदित होऊन प्रत्यक्ष ब्रह्म देवांनी विष्णुंचे चरण कमल आपल्या स्वतःच्या हातांनी धुतले. 'mahurgad information in marathi' त्यावेळी त्या पाण्याचा प्रवाह तयार झाला, तो पुढे एका नदीत रूपांतरित झाला. श्री विष्णू देवांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या प्रवाहास "पैनगंगा" हे नाव दिले गेले. याच नदीला "प्राणहिता" म्हणून देखील ओळखले जाते. रेणुका मातेच्या मंदिरापासून काही अंतर गेलं की "दत्त शिखर" व "अनुसया शिखर" हे प्रसिद्ध दोन शिखर आपल्याला पाहायला मिळतात.
• दत्त शिखर(datta shikhar)
दत्त शिखराच्या पायथ्याशी घनदाट झाडी असून हे ठिकाण अत्यंत उंच आहे. या शिखरावर अनेक देवदेवतांच्या मुर्त्या तसेच साधू महंत व गोसावी महात्म्यांच्या समाधी आहेत. तिथे श्री दत्त गुरूंची धूनी असणारे मंदिर आहे. या धूनीचा भस्म अनेक भाविक आपल्या घरी प्रसाद रूपाने घेऊन जातात. मंदिराच्या अवती भवती मोकळा परिसर आहे. 'mahurgad information in marathi' या दत्त मंदिराच्या शिवारात श्री दत्त गुरूंचे नियमित रूपाने वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. शिखरावरील मूळ दत्त गुरूंचे मंदिर लहान स्वरूपाचे असून त्या मंदिराची बांधणी इ.स.1297 मध्ये थोर महात्मे "मुकुंद भारती" यांनी केली. या दत्त शिखरावर अनेक गोसावी साधूंचे येणे - जाणे चालू राहते.
• अनुसया शिखर (anusaya shikhar)
दत्त शिखराच्या जवळचं काही अंतरावर "अनुसया शिखर" आहे. इथे सुद्धा अनुसया मातेची मूर्ती असून, जवळच "अत्री ऋषींचा" आश्रम सुद्धा आहे. या आश्रमात अत्री ऋषींच्या पादुका ठेवलेल्या आहेत.'mahurgad information in marathi' याच ठिकाणी अत्री ऋषींच्या तपश्चर्या ची त्यांना फलप्राप्ती झाली. म्हणजे अनुसया मातेच्या घरी ब्रह्म, विष्णू, महेश यांनी एकत्रित अवतार घेतला, व दत्तगुरु यांच्या रुपाने त्यांना पूत्र लाभ झाला. दत्त गुरू हे नियमित रूपाने पांचालेश्वर येथे स्नान करून श्री क्षेत्र कोल्हापूर येथे भिक्षा मागतात. व रात्रीचा मुक्काम ते न चुकता आपल्या माय माऊलीच्या सानिध्यात येऊन "माहूरगड" येथे करतात याचा पुराणात आजही उल्लेख आढळतो.
रेणुका मातेचा इतिहास- History Of Renuka Mata

"रेणुका माता"

माता रेणुका देवी बद्दल पुराणात एक आख्यायिका आहे, ती पुढीप्रमाणे- त्या काळात कुब्ज नगराचा राजा "प्रसेनजित" याला अनेक व्रत, वैकल्ये केल्यानंतर खूप दिवसांनी त्याच्या पोटी आदिशक्ती पार्वती मातेने स्वतः जन्म घेतला. त्या राजाने आपल्या कन्येचे नाव "रेणुका"असे ठेवले. पुढे काही वर्षा नंतर रेणुका उपवर झाली. तेंव्हा राजाने तिचे लग्न शिव शंकराचे अवतार असणारे "जमदग्नी ऋषी" 'mahurgad information in marathi' यांच्या सोबत लावून दिले. जमदग्नी हे अत्यंत ज्ञानी मुनी असल्याने त्यांच्याकडे विद्या ग्रहण करण्यासाठी परिसरातील अनेक शिष्य मंडळी येत असे. त्यांच्या आश्रमात एक विशेष गोष्ट म्हणजे "कामधेनू" गाय होती. तिच्यासमोर प्रगट केलेली इच्छा ती काही क्षणात पूर्ण करत असे, त्यामुळे त्या कामधेनू गाईची कीर्ती सर्व दूर पसरली होती.
या कामधेनु गाईची माहिती त्या नगरातील राजा सहस्त्रार्जुन पर्यंत सुद्धा पोचली होती. या आगळ्या वेगळ्या कामधेनु गायीची ख्याती एकूण राजा सहस्त्रार्जुन याला तिच्या बद्दल मोह उत्पन्न झाला. अगदी कुठलाच विलंब न करता तो राजा आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. तो ऋषींना कामधेनु गाईची मागणी करू लागला. तेव्हा या मागणीस जमदग्नी ऋषींनी नकार दिला. तेव्हा मात्र जमदग्नी ऋषींनी दिलेला नकार राजाला रुचला नाही. त्याला ऋषींचा प्रचंड राग आला व त्याने ऋषींच्या आश्रमावर तातडीने हल्ला करण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. आपल्या राजाच्या आदेशामुळे सर्व सैन्याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमाची संपूर्ण नास धूस केली. तसेच राजाने जमदग्नी ऋषिंचा जीव घेतला व आपल्या सोबत कामधेनु ला घेऊन गेला.
काही वेळानंतर जमदग्नी पुत्र "परशुराम" आश्रमात आले. तेव्हा बघतात तर आश्रम संपूर्ण नष्ट झाला होता. तसेच वडील जमदग्नी मृत अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. परशुराम व रेणुका माता यांना जमदग्नी ऋषींच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले. तिथे घडलेल्या प्रसंगाची चौकशी केल्यावर परशुरामाला राजा सहस्त्रार्जुन याचा भयंकर राग आला व त्यांनी संपूर्ण क्षेत्रिय लोकांचा नाश करण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा आपल्या वडिलांचे अंत्य संस्कार करण्याकरिता परशुराम कोरी जागा शोधत होते. त्यांनी एक कावड करून एका पारड्यात माता रेणुका व दुसऱ्या पारड्यात आपल्या वडिलांचा मृतदेह ठेवला आणि ते कोरी जागा शोधत फिरू लागले. तेव्हा काही दूर चालत गेल्यावर ते दोघे माहुर गडावर पोहोचले. तेव्हा थकलेल्या परशुरामाला पाहून श्री दत्तगुरु यांनी त्या दोघा माय लेकराला प्रत्यक्ष प्रगट होउन भेट दिली. एक कोरी जागा दाखवून जमदग्नी ऋषींच्या मृत देहावर अंत्यसंस्कार करण्याची आज्ञा परशुरामाला दिली. परशुरामाने श्री दत्त गुरूंची आज्ञा पाळून आपला धनुष्यबाण काढला. व आपल्या एका बाणाने तिथेच अनेक तीर्थ निर्माण केली. व तिथल्या तीर्थाच्या पाण्याने आपल्या वडिलांना स्नान घालून त्यांची पूजा करून त्यांचा अंत्यविधी पार पाडला.
आपले पती जमदग्नी ऋषींच्या निधनाने अत्यंत दुःखी झालेली रेणुका माता आपल्या पतीसोबत सती गेली. त्यामुळे आपल्या आईच्या अचानक सोडून जाण्याने परशुरामाला अत्यंत दुःख झाले. त्यांना आपल्या मातेची क्षणोक्षणी आठवण येत होती. त्यामुळे ते त्या जागेवर रडत बसले. हा सर्व प्रकार घडताना श्री दत्तगुरु तिथेच उभे होते. काही क्षणात जेव्हा परशुराम वापस जाण्यास निघाले, त्यावेळी आकाशवाणी झाली. "हे परशुराम तुझी माता तुला पुन्हा जिवंत होऊन दर्शन देईल" फक्त तू मागे वळून पाहू नकोस. परंतु त्यावेळी परशुरामाची मनस्थिती अस्थिर असल्याने त्यांनी न राहून मागे वळून पाहिले, तर रेणुका माता जमिनीतून वर येत होती. परंतू परशुरामांनी वळुन पाहिल्याने जमिनीतून रेणूका मातेचे फक्तं मुखं बाहेर आले. यामुळे आजही या तांदळा रूपातील रेणूका मातेच्या मुखाची माहुर गडावर नियमित रूपाने पूजा केली जाते.
माहूर गडावर कसे जाल ?
माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक भक्त येत असतात.'mahurgad information in marathi' माहूर गडाच्या दर्शनाला येण्यासाठी संपूर्ण देश भरातुन भरपूर प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुद्धा बस सुविधा तसेच रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत. नांदेड पर्यंत येण्यासाठी रेल्वे, बस व विमान या सर्व वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. दक्षिण मध्ये रेल्वेचे ठिकाण असणाऱ्या नांदेडला अनेक जिल्ह्यातून रेल्वेने येता येते. नांदेड वरून माहूरगड पर्यंत जाण्यासाठी महामंडळाच्या बस तसेच खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
• नांदेड ते माहूर अंतर | nanded to mahur distance
- 126 Km
• कीन - वट ते माहूर अंतर | kinwat to mahur distance
- 48 Km
• नागपूर ते माहूर अंतर | nagpur to mahur distance
- 232 Km
'mahurgad information in marathi' माहूर गडावर आधारित हा लेख आपल्याला नक्की आवडेल. या लेखात मी माहूर गडाची सविस्तर माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सुद्धा माहूर गडाची अजून माहिती आपल्या कडे असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा तसेच हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरु नका.
हे लेख सुध्दा जरूर वाचा 👇
1. संत सावता महाराज यांचे जीवनचरित्र
2. शाहू महाराज यांचे जीवनचरित्र
FAQ
1.माहूर गडावरील किल्ल्याचे नाव काय ?
- रामगड
2.रेणुका देवी मंदिरास किती पायऱ्या आहेत?
- 240
0 Comments