सोमनाथ मंदिराची संपूर्ण माहिती | Somnath Temple Information In Marathi
आपल्या संपूर्ण भारत देशात भगवान शिव शंकराच्या स्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे "सोमनाथ मंदिर"(somnath temple) होय. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून या सोमनाथ मंदिरास प्रथम ज्योतिर्लिंगाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात "सोमनाथ"(somnath) मंदिराचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात इथूनच केली जाते.'somnath temple information in marathi' आपण आजच्या या लेखात देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असणाऱ्या सोमनाथ मंदीराची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्व वाचकांना विनंती आहे की, हा लेख संपूर्ण वाचून भगवान शिव शंकराच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या सोमनाथ मंदिराचा इतिहास जाणून घ्यावा.
सोमनाथ ज्योतिर्लिंग कथा | Story Of Somnath Jyotirlinga
प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचा विवाह सोमदेव (चंद्र) यांच्याशी लावून दिला. परंतू 27 जनी सोबत संसार करत असताना सोमदेव यांना फक्त त्यामधील "रोहिणी" नावाची पत्नी अधीक प्रिय असल्याने, सोमदेव फक्त तिचेच लाड पुरवत होते. हे सर्व प्रकार पाहून इतर 26 बायकांनी चंद्र देवाची तक्रार त्यांच्या वडीलांकडे केली. तेंव्हा आपल्या जावयास समजून सांगण्याचा प्रयत्न करताना प्रजापती दक्ष सोम देवास म्हणाले की, कोणत्याही पतीला त्याच्या सर्व पत्न्या सम प्रमाणात प्रिय असाव्या. त्यामुळे तुम्ही माझी लेक रोहिणी प्रमाणे इतर मुलींना सारखे प्रेम देण्याचा प्रयत्न करा. हे सासऱ्याचे बोलणे सोम देवाने एकूण न एकल्या सारखे करत आपल्या वागण्यात काहीचं बद्दल केला नाही. तेंव्हा प्रजापती दक्ष यांना सोम देवाचा अत्यंत राग आला व त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या स्वतःच्या जावयास शाप दिला. त्या शापात त्यांनी सांगीतले की तू माझ्या विनंतीस मान न देता, असं वागलास त्यामुळे तुझ्यात असणारे तेज कमी होउन तुझा तेजेस्वी पणा क्षय होत जाईल.
हे कठोर शाप वचन ऐकताच सोम राजा अत्यंत चिंतेत पडला. त्याला काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा त्याने सर्व देवतांची प्रार्थना केली. त्यावेळेस सर्व देवतांनी सोमदेव यांना भेट देऊन सांगितले की, तुम्ही समुद्र तटावर जाऊन श्री भगवान शिव शंकराची प्रार्थना करा. ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. हे वचन एकूण सोमदेव लगेच समुद्राच्या काठावर जाऊन महादेवाची घोर तपश्चर्या करू लागले. 'somnath temple information in marathi' त्यांची कठोर तपश्चर्या पाहून काही कालांतराने शिवास दया आली महादेवांनी प्रसन्न होऊन सोम देवाची अडचण काय आहे ? त्यांच्याकडून जाणून घेतली. सोम देवाची अडचण लक्षात आल्यावर महादेवांनी त्या अडचणीचे निवारण करून, प्रजापती दक्ष यांनी दिलेल्या शापाची तीव्रता कमी केली. ते सोम देवाला म्हणाले तुझे तेज हे कायम राहिलं. परंतू एक मासातील दोन पक्षात ते विभाजित असेल. कृष्ण पक्षात अमावस्या पर्यंत तुझे तेज कमी होत जाईल, परंतू शुक्ल पक्षात मात्र पौर्णिमा पर्यंत तुझें तेज संबंध विश्वास झळकू लागेल.
हा शिव शंकराने कमी केलेला शापाचा प्रभाव पाहून सोम देवाला आनंद झाला. व ते महादेवाला या समुद्र किनारी कायम स्वरुपी वास्तव्य करा, असं म्हणुन विनवू लागले. तेंव्हा चंद्राच्या विनंतीस मान देउन भगवान शिव शंकर आपली अर्धांगिनी पार्वती माता यांच्या समवेत त्या स्थानी वास्तव्यास राहिले. पुढे इथेच सोम देवाने समुद्र तटावर शिव पार्वतीचे मंदीर सुवर्ण धातूने बांधले. हे मंदिर म्हणजे अताचे प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे "सोमनाथ"(somnath) होय. याच मंदिरच्या काही अंतरावर पांडवांनी एका गुहेत अज्ञातवासात वास्तव्य केल्याचं पुराणात सांगीतले जाते, तसेच याच परीसरात भगवान श्री कृष्णाने आपण धारण केलेल्या मनुष्य देहाचा त्याग केला आणि ईथल्या भूमिवरचा आपला प्रवास थांबवला.
![]() |
'somnath temple information in marathi' |
सोमनाथ मंदिराचा इतिहास -History Of Somnath Temple
संपूर्ण देशात प्रख्यात असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम क्रमांकाच्या स्थानावर असलेले "सोमनाथ"(somnath) हे 'somnath temple information in marathi' ज्योतिर्लिंग हे गुजरात राज्यातील सौराष्ट्र येथील "वेरावळ" या बंदरापासून जवळच प्रभास पटण या ठिकाणी आहे. "सोमनाथ" हे ज्योतिर्लिंग स्वयंभू प्रकारातील असून, त्यास जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्व दीले जाते. श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊनच ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात केली जाते. हे मंदीर चार टप्प्यात बांधल्याचे पुराणात सांगीतले जाते हे मंदिर सुरवातीला सोम देवाने सुवर्णात बांधले, रावणाने चांदित, कृष्णाने चंदनाच्या लाकडात तर भीम राजाने दगडाने बांधले.
या मंदिरावर अनेक वेळा आक्रमण झाले. हे मंदिर तब्बल 17 वेळा उध्वस्त होऊनही आज मोठया थाटात उभे आहे. या मंदिराचा इतिहास पाहता या मंदिराच्या जवळ असणाऱ्या "वेरावळ" या बंदरावर अनेक विदेशी व्यापारी येत-जात असतं. त्यातला एक अरब व्यापारी "बरूनिन" याने या "सोमनाथ" मंदिराची विशेष माहिती आपल्या वृत्तपत्रात संपादित केली होती. या वृत्तपत्राच्या माहिती आधारे महमूद गजनविने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करुन तिथल्या हजारो भाविक भक्तांचा जीव घेतला. व संपूर्ण मंदिर उध्वस्त केले व तिथली संपूर्ण धन - संपत्ती लुटून नेल्याची इतिहासात आजही नोंद आहे.
सोमनाथ मंदिर अनेकदा उद्ध्वस्त कोणी केले ?
इ.स. 649 मध्ये दुसऱ्यांदा शिव मंदीराची निर्मिती वल्लभी येथील यादवांनी केली. 'somnath temple information in marathi' या मंदिरास सुद्धा सिंध प्रांतातील गव्हर्नर अल जूनैद याने उध्वस्त केले. काही काळानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मंदिर उभं करण्याचे काम इ. स 815 मध्ये गुजर प्रतीहार वंशाचा राजा दुसरा नागभट्ट याने केले. मंदिरांची रचना करताना नाग भट्टाने लाल बलुआ प्रकारातील दगड मंदीर बांधणी करीता वापरला होता. तो दगड अत्यंत टिकाऊ असून शोभिमान होता. काही वर्षांनंतर या मंदिराची रचना पुन्हा करण्यात आली. यावेळी इ. स. 997 ला चालुक्य काळातील सम्राट मुल राजाने या मंदिराची पुनर्बांधणी केली. हेच मंदिर पुन्हा इ. स. 1024 दरम्यान हे मंदिर मुहमद गजनवी ने पूर्णतः उध्वस्त केले. मंदिराच्या रक्षणासाठी धावून आलेल्या 50000 पेक्षा अधिक निष्पाप लोकांना त्याने मारून टाकले व मंदिरातील मौल्यवान वस्तूंची लूट-माप केली.
यानंतर इ.स.1169 दरम्यान गुजरात येथील कुमार पाल राजाने पुन्हा एकदा हे मंदिर बांधुन काढले. परंतू अल्लाउद्दीन खिलजी ने इ. स. 1299 ला गुजरात लढाई दरम्यान हे मंदिर काबीज करुन उध्वस्त केले. त्यानंतर इ. स.1308 ला अत्यंत सुंदर पद्धतीने या मंदिराची पुनर्निर्मिती महिपाल राजाने केली. परंतू यानंतरही जफर खान या गुजरातच्या गव्हर्नरने या मंदिराची पुन्हा एकदा प्रचंड नासधूस केली.
सोमनाथ मंदिर हे अनेकदा नष्ट केले गेले. परंतू तितक्याच प्रमाणात ते अनेक वेळा बांधले सुद्धा गेले. हे सत्र बराच काळ चालू असताना पुन्हा एकदा इ. स. 1665 दरम्यान मुघल बादशहा औरंगजेबाने तर या मंदिरास अशा पद्धतीने उधवस्त केले, की या मंदिराची पुनर्निर्मिती कुणालाही करता येणार नाही. त्याने मंदिरास संपूर्ण नष्ट करुन त्या जागेत इ. स 1706 रोजी मशीद बांधली. आशा प्रकारे 17 वेळा मंदिरास उध्वस्त करुनही "सोमनाथ" मंदीर तितक्याच डौलात आजही उभे आहे.
अहिल्याबाई होळकर यांचे योगदान ?
मधल्या काळात जेंव्हा सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. तेंव्हा इंदूर येथील राजमाता अहिल्याबाई होळकरांनी इ. स. 1783 दरम्यान पुण्याच्या पेशव्यांना मदतीला घेऊन या मंदिराच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचा गाभारा अत्यंत मजबूत बांधल्याचे इतिहासात नोंद आहे.'somnath temple information in marathi' सध्या या मंदिरास जुनं सोमनाथ मंदिर किंवा अहिल्याबाई होळकर यांचे मंदीर म्हणून ओळखले जाते.
![]() |
"अहिल्याबाई यांचे सोमनाथ येथील मंदिर" |
हे सुध्दा वाचा 👇
- अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र
आताचे सोमनाथ मंदिर कुणी बांधले?
आता असलेल्या सोमनाथ मंदिरांची पुनर्निर्मिती भारत स्वतंत्र झाल्यावर, लोह पुरुष म्हणून संबंध भारतात ओळखले जाणारे सरदार वल्लभ भाई पटेल यांनी इ .स. 1951 दरम्यान केलेली आहे. त्या वेळी ते भारत देशाच्या गृहमंत्री पदावर विराजमान होते. परंतू काही काही वर्षानंतर त्यांचे निधन झाले. तेंव्हा मंदीर बांधणीचे उर्वरित काम त्यावेळी अन्न पुरवठा मंत्री म्हणून कार्यरत असलेले एम मुंशी यांच्या नेतृत्वात केले. या मंदिराची रचना महामेरू प्रसाद शैली नुसार असून चालुक्य काळातील पुरातन वास्तू सारखी करण्यात आली आहे. प्रभा शंकर सोम पूरा यांच्या हातावर या मंदिराची रचना करण्यात आली असून, सोमनाथ हे मंदिर त्यांनी स्वतः डिझाईन केले आहे. त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर प्रभा शंकर सोम पुरा हे पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने सन्मानित असून ते एक महान आर्किटेक्ट आहेत. अयोध्येतील राम मंदिराची डीझाईन त्यांचे नातू चंद्रकांत भाई सोम पुरा यांनी केलेली आहे. भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देखील 'somnath temple information in marathi' सोमनाथ(somnath) या मंदिराच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला असून ते सध्याच्या स्थितीत या सोमनाथ मंदिराच्या ट्रस्ट अंतर्गत अध्यक्षपदी विराजमान आहेत.
हे वाचा - हेमाडपंथी मंदिर म्हणजे काय ?
सोमनाथ मंदिराच्या परिसरात काय आहे?
![]() |
'somnath temple information in marathi' |
समस्त हिंदू धर्मातील लोकांची श्रद्धा असणाऱ्या या सोमनाथ मंदिराची रचना मन प्रसन्न करणारी आहे. हे मंदीर समुद्र किनारी असल्याने विदेशातून देखील इथे पर्यटक भेट देत असतात. या मंदिराच्या आवारात "गौरि कुंड" हे तळे असून श्री गणेशाचे सुंदर मंदीर, तसेच महाकाली व अहिल्याबाई होळकर यांचे देखील सुसज्ज मंदीर "सोमनाथ" मंदिर परिसरात बांधलेले आहे. या मंदिराचा संपूर्ण परीसर मोठा असून या मंदिराचा विस्तार सुमारे 10 किमी पेक्षा अधिक आहे. संपूर्ण सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे चित्रण या परिसरात नाईट म्युझिक शो च्या माध्यमातून हजारो भाविकांना रोज दाखवले जाते. या नाईट म्युझिक शोची वेळ रात्री 7.30 ते 8.30 दरम्यान असते.'somnath temple information in marathi'
काही अंतरावरच त्रिवेणी संगम असून या घाटावर हिरण्या, कपिला व सरस्वती या तिन नद्यांचा एकत्रित संगम आहे. सोमनाथ मंदिराच्या परिसरात सुमारे 40 पेक्षा अधिक मंदिर पहायला मिळतात. त्यामध्ये द्वारकाधीश श्री कृष्णाचे देखील मंदिर आहे. आंतरराष्ट्रीय गणले जाणारे तसेच सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले "गिर अभयारण्य" इथून कमी अंतरावर आहे. हे गिर अभयारण्य अंत्यंत मोठे असून यात सर्वात जास्त सिंहाचे प्रमाण आहे. हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण असून पुराणात ज्याचा अनेकदा उल्लेख आढळतो तो "गिरीनार" पर्वत देखिल याच परिसरात आहे.
![]() |
"गीर अभयारण्य" |
सोमनाथ मंदिर एवढे प्रसिध्द का ?
सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रथम जरी असले, तरी सुद्धा या मंदिराचे आणखी विशेष महत्व सांगीतले जाते. या मंदीरात 200 मण वजनाचा सुवर्ण घंटा असून. तो जर मनोभावे भक्तांनी वाजवला तर त्यातुन "ओम नमः शिवाय" असा आवाज निघतो. एवढेच नाही तर या मंदिराच्या तटाच्या पायऱ्यांवर येऊन आदळणाऱ्या समुद्र लाटेतून देखील "जय भोलेनाथ" आसा मंजुळ ध्वनी कानात एकू येतो. सोमनाथ (somnath) या मंदिराचे महत्व वेद, पुराण, श्रीमद भागवत, शिव पुराण, तसेच स्कंद पुराणात सांगितले आहे. सोमनाथ यांच्या दर्शनाने अनेकांचे गंभीर आजार तसेच दुःख दुर होतात. तसेच अनेक भाविकांच्या इच्छा पुर्ण करणारे तीर्थक्षेत्र अशी या सोमनाथ मंदिराची ओळख आहे. हे मंदीर सौराष्ट्रात स्थित असल्याने "सोरटी सोमनाथ"(sorati somnath) या नावाने ओळखले जाते.
• महाराष्ट्रतील प्रसिध्द साडेतीन पीठांपैकी 👇
हे वाचा -
1. तुळजा भवानी मातेचा संपूर्ण इतिहास (तुळजापुर)
2. रेणूका मातेचा संपूर्ण इतिहास (माहूरगड)
3. सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती (नाशिक)
सोमनाथ येथे कसे पोहचाल ?
सोम नाथाच्या दर्शनासाठी देशातील अनेक भागातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. प्रत्येक भागातून या ठिकाणी येण्यासाठी विविध प्रकारच्या वाहतूक सुविधा असून, त्यामध्ये विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा तसेच इतर खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
• विमान सेवा - या मंदिरापासून 55 किमी अंतरावर "केशोद" नावाचे विमानतळ असून अनेक राज्यांतील भाविकांना हवाई मार्गाने इथे येता येते. मुंबई येथून केशोद ला येण्यासाठी फ्लाईट उपलब्ध आहे. या विमानतळावरून सोमनाथ मंदिरापर्यंत बस सुविधा तसेच खाजगी वाहने आहेत.
• रेल्वे सेवा - सोमनाथ येथे रेल्वेने सुद्धा जाणे सोपे आहे. कारण तिथूनच 7 किमी अंतरावर "वेरावळ" येथे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणाहून गुजरात येथील महत्वाचे असणारे "अहमदाबाद" या ठिकाणीं रेल्वेने जाता येथे. नंतर अहमदाबाद वरून इतर राज्यात जायला रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.'somnath temple information in marathi'
- अहमदाबाद ते सोमनाथ अंतर (ahmedabad to somnath distance)
410 km
- द्वारका ते सोमनाथ अंतर (dwarka to somnath distance)
234 km
सोमनाथ येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी -
इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना राहण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी मंदिराच्या ट्रस्ट अंतर्गत काही रूम भाडे तत्वावर दिल्या जातात. तसेच यात्रेच्या काळात त्या परिसरातील लोकं आपल्या खाजगी रूम भाविकांना राहण्यासाठी भाड्याने देतात. इथे इतर गरजेच्या सुविधा उपलब्ध आहेत.
हा लेख संपूर्ण वाचून नक्कीचं आपल्याला या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे वैभव महिती झाले असेल,भविष्यात योग आला तर नक्की सोमनाथ मंदिरास (somnath temple) अवश्य भेट द्यावी. मी या लेखात अधोरेखित केलेली माहिती काही प्रमाणात चुकुही शकते. हि संपूर्ण माहिती सर्वस्वी बरोबरच आहे, असा माझा बिलकुल दावा नाही. परंतु हि माहिती योग्य रीतीने मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.हि माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
हे वाचा -गड जेजुरी इतिहास
FAQ
1. सोमनाथ मंदिर कुठे आहे ?
- गुजरात
2. सोमनाथ हे कितव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे ?
- प्रथम
0 Comments