परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Parali Vaijnath Temple Information in Marathi

परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Parali Vaijnath Temple Information in Marathi 

'parli vaijnath temple information in marathi'
'parli vaijnath temple information in marathi'


    नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो 'parli vaijnath temple information in marathi' या लेखात आज आपण भारत देशातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग अशी ओळख असणारे "परळी वैजनाथ"(parli vaijnath temple) या ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. या 5 ज्योतिर्लिंगापैकी प्रथम क्रमांकावर असणारे ज्योतिर्लिंग म्हणजे "परळी वैजनाथ"(parli vaijnath) होय. 

  "परळी वैजनाथ"(parli vaijnath) हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात स्थित असून दक्षिण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. श्रावण महिना, शिवरात्री पर्वकाळ व प्रत्येक सोमवारी या मंदिरात प्रचंड गर्दी असते. देशभरातून अनेक शिवभक्त "परळी वैजनाथ"(parli vaijnath jyotirlinga) येथे दर्शनासाठी येत असतात. अशा महान ज्योतिर्लिंगाचा इतिहास अत्यंत पुराणिक असून,"परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदिरांचा इतिहास आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तरी कृपया सर्व वाचक मंडळींनी "परळी वैजनाथ" ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती या लेखात अनुभवावी.

हे सुध्दा वाचा 👇



परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग माहिती | Parli Vaijnath Jyotirlinga Information In Marathi 


'parli vaijnath temple information in marathi'
"मंदिर शिखर"


   "परळी वैजनाथ" (parli vaijnath) ज्योतिर्लिंग हे ठिकाण महाराष्ट्रतील बीड जिल्ह्यात असून, या मंदीराचे बांधकाम हे अत्यंत प्राचिन काळापासून म्हणजेच जवळपास 2000 पेक्षा अधिक वर्षांपूर्वीचे मानले जाते. "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदिरांचा इतिहास पाहता हे मंदीर "देवगिरी" येथील यादवांच्या काळात बांधले गेल्याचा इतिहास आढळतो. यादवकालीन प्रधान "श्री करणाधिप हेमाद्री" याच्या हातावर "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदीराचे बांधकाम पुर्ण झाले.'parli vaijnath temple information in marathi'  त्यानंतर कालांतराने जुन्या मंदीराची पडझड होऊन त्यामधील पुरातन वास्तू पैकी शिव शंकराचे वाहन "नंदी"  तेवढे शिल्लक राहिले. 

    "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदिरांची त्या काळची अवस्था पाहता, इ.स.1783 च्या सुमारास राजमाता अहिल्याबाई होळकरांनी "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदीर सद्य स्थितीत एका टेकडीवर वसलेले असून, हे मंदीर टिकाऊ दगडात बांधले गेले आहे. तसेच मंदीराचे बांधकाम भक्कम असून या मंदिरच्या भिंती चिरेबंदी स्वरूपातील आहेत. "परळी वैजनाथ" (parli vaijnath) या मंदीरात जाताना काही दगडी पायऱ्या चढून जावे लागते. या पायऱ्या अत्यंत लांब व रूंद असल्याने एकाच वेळी अनेक भाविक भक्तांना दर्शनासाठी "परळी वैजनाथ"(parli vaijnath) यांच्या दर्शनास जाता येते.
'parli vaijnath temple information in marathi'
अहिल्याबाई होळकर 



हे वाचा - 👇


     "परळी वैजनाथ" (parli vaijnath Jyotirlinga) या मंदीरात प्रवेश करताच मंदिरांचा गाभारा अत्यंत सुंदर असून भव्य दिव्य सभामंडप आहे. सभामंडप आणि मंदिरांचा परीसर एकत्र आहे. सभामंडपात प्रवेश केला की सहज "परळी वैजनाथ"(parli vaijnath) ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना प्रत्यक्ष शिव लिंगास स्पर्श करून घेऊ दीले जाते, ही "परळी वैजनाथ"(parali vaijnath) या मंदिराची विशेष गोष्ट आहे. मंदिराच्या परिसरात अन्य काही महत्वाची तीर्थ आहेत, त्यामध्ये झुरळ्या गोपीनाथाची मंदिरं, संत जगतमित्रा यांची समाधी तसेच मार्कंडेय, नारायण, हरिहर, शैनेश्वर ई.'parli vaijnath temple information in marathi' 

     "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदीर परीसरात नंदीच्या तीन मुर्त्या असून, त्यामध्ये एक पितळाची तर बाकी दोन पाषण्युक्त आहेत. तसेच मंदीरात पितळयुक्त वीरभद्राची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात 12  ज्योतिर्लिंगाचे छोटे - छोटे मंदिरे उभारलेली आहेत. मंदीरात येण्यासाठी तीन प्रवेश द्वार असून फक्त पश्चिम दिशेला प्रवेश द्वार नाही. या मंदिरातील सभामंडपाचे बांधकाम 'रामराव देशपांडे' या दानशूर व्यक्तींनी इ. स. 1904 मध्ये पूर्ण केले. मंदिर परिसरात तीन पुरातन कुंड असून, मंदिरापासून 3 किमी अंतरावर "सोमेश्वर" महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर जमिनीपासून 300 फूट उंचावर असून "ब्रम्ह" नदीच्या किनाऱ्यावर जिरेवाडी या परिसरात वसलेले आहे. "सोमेश्वर" मंदिर हे आकर्षक असून मंदिराच्या सभोतालचा परीसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे.


परळी वैजनाथ मंदिराचा इतिहास -  History Of Parli Vaijnath Temple 

'parli vaijnath temple information in marathi'
मंदिराचे प्राचीन काळातील बांधकाम


     "परळी वैजनाथ"(parli vaijnath temple) या मंदीराचे बांधकाम जरी यादवकालीन असले, तरी या मंदिराचा इतिहास फार पुराणिक आहे. आता आपण "परळी वैजनाथ"(parli vaijnath temple) हे ज्योतिर्लिंग कशे निर्माण झाले ? याबद्दलची कथा पाहुयात, एकदा दैत्याचा राजा "रावण" याने भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तो ज्या पर्वतात तप करत बसला तिथे त्याने अन्न, पाण्याचा त्याग केला. तसेच ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीच पर्वा न करता तो शिव आराधना करू लागला. हे सर्व करूनही महादेव आपल्याला प्रसन्न होत नाहित. हे लक्षात आल्यावर रावणाने आपले एक - एक मस्तक तो कापून महादेवाच्या चरणी अर्पण करु लागला. असं करतांना रावणाने आपले नऊ मस्तक कापून महादेवासमोर ठेवली,  हि अत्यंत कठोर तपश्चर्या पाहून भोळे शंकर रावणाला प्रसन्न झाले. व काय वरदान मागायचे ते माग असं रावणास म्हणू लागले.

       या संधीचा फायदा घेत रावणाने महादेवाला तुमचं आत्मलिंग मला प्रदान करा व त्या शिव लिंगात प्रकट होऊन माझ्या सोबत लंकेत चला अशी विनंती केली. हे वरदान एकूण क्षणभर महादेव गोंधळून गेले परंतु आपल्या भक्तास त्यांनी नाराज न करता आत्मलिंग दान केले. पण ते एका अटीवर की लंकेत जाईपर्यंत वाटेत जर हे शिवलिंग जमिनीवर ठेवलं, तर परत उचलता येणार नाही. याची सूचना रावणास दिली. त्यावर भोळ्या शंकरास होकार देत रावण आत्मलिंग घेऊन लंकेत निघाला. परंतू ते चित्र पाहून सर्व देवांना एकच काळजी वाटायला लागली की प्रत्यक्ष महादेव जर लंकेत राहायला गेले, तर रावण अजिंक्य होईल. त्याला कुणाचेही भय राहणार नाही, याची चिंता समस्त देवांना वाटायला लागली. हे पाहून सर्व देव ब्रम्ह आणि विष्णू देवाकडे गेले पण रावणाला कसे रोकावे हे त्यांनाही उमजत नव्हते. मग त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी महादेवाचे पुत्र श्री गणेश यांची मदत घ्यायचे ठरवले.'parli vaijnath temple information in marathi' 

      सर्व देवता मिळून गणपतीची विनंती करायला लागले. तेंव्हा गणपती बाप्पा ने सर्वांच्या विनंतीस मान देउन या कार्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रावण लंकेत जाताना मुद्दामून त्यास लघुशंका आणण्याचे प्रयोजन त्यांनी केले. आणि आपण स्वतः एका गुरख्याचा वेष धारण करून ते रावणाच्या जवळ आले. तेंव्हा रावणाने त्या गुराखी व्यक्तीला पाहून त्यास विनंती केली की मी लघुशंका करून येतो. तोपर्यंत या शिवलिंगाचा सांभाळ कारा यास जमिनीवर ठेऊ नका. ते एकुण गुराखी वेषधारी गणपतीने रावणास होकार दिला. रावणाचे शिवलिंग गुरख्याच्या स्वाधीन करुन तो लघुशंका करण्यास गेला. परंतू रावणास उशीर झाल्याने गुराखी वेषधारी गणपतीने ते शिवलिंग जमिनीवर ठेवलं. नंतर काही काळानंतर रावण धावत तिकडे आला परंतु त्यास शिवलिंग जमिनीवर ठेवलेलं दिसले. ते पाहून रावणास गुराख्याचा खूप राग आला पण गुराखी तोपर्यंत गुप्त झाला होता. 'parli vaijnath temple information in marathi' 

      रावणाने आपली संपूर्ण शक्ती लावून ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच्या शक्तीचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तो निराश होऊन लंकेत निघून गेला. पण शिवलिंग मात्र त्याच ठिकाणी स्थित राहिले,  नंतर महादेवांनी त्या लिंगात आपला प्रवेश केल्यावर स्वतः ब्रम्ह, विष्णू व इतर देवतांनी त्या लिंगाची यथासांग पूजा केली. हे शिवलिंग अन्य काही नसून प्रत्यक्ष "परळी वैजनाथ"(parli vaijnath) होय.'parli vaijnath temple information in marathi'  कालांतराने याचे रूपांतर 12 ज्योतिर्लंगांपैकी एकात झाले. आजही "परळी वैजनाथ"(parli vaijnath) येथे मोठया प्रमाणावर अनेक भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

      "परळी वैजनाथ" (parli vaijnath) येथे दूर वरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना राहण्यासाठी अनेक खाजगी खोल्या भाड्याने मिळतात. कधी - कधी मंदिरात देखील प्रसाद दिला जातो. मंदिराच्या परिसरात प्रसादाचे दुकाने आहेत. "परळी वैजनाथ" हा शहरी भाग असून ईथे येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. 
'parli vaijnath temple information in marathi'
औष्णिक विद्युत केंद्र, परळी


• परळी वैजनाथ ईथे कसे जाल ?

   "परळी वैजनाथ"(parli vaijnath) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात जवळेचे विमानतळ "नांदेड" असून ते परळी येथून सुमारे 129 किमी अंतरावर आहे. नांदेड येथून रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत, तसेच परभणी येथून सुद्धा परळी हे शहर सुमारे 83 किमी अंतरावर असून, इथून देखील रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत. तसेच इतर भागातून येण्यासाठी बस तसेच सर्व प्रकारच्या खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे "परळी वैजनाथ" (parli vaijnath) येथे येण्यासाठी प्रवास हा सुखकर आहे. आपणही एकदा या ठिकाणाला अवश्य भेट द्या.

  "परळी वैजनाथ"(parli vaijnath) या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण या लेखात जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.'parli vaijnath temple information in marathi'  ही सर्व माहिती  बरोबरच आहे, असा माझा बिलकुल दावा नाही. त्यामुळे आपल्याकडे अजून काही महिती असेल, तर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ती माहिती योग्य असेल तर, या लेखात नक्की अपडेट करू. हा लेख आपणास आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा.

आमचे हे लेख सुध्दा वाचा 👇

  

Post a Comment

0 Comments