ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Omkareshwar Temple Information In Marathi
नमस्कार मित्र - मैत्रिणींनो आज आपण आपल्या भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग "ओंकारेश्वर"(omkareshwar) याची माहिती पाहणार आहोत. या आधी आपण सोरटी सोमनाथ, श्रीशैलम मल्लिकार्जुन, तसेच महाकालेश्वर या ज्योतिर्लिंग विषयक सखोल माहिती पाहिली आहे. आपणास ही माहिती वाचायची असेल तर आमच्या ब्लॉक साइटच्या मेनू बार मधील "तीर्थक्षेत्र" या पेजला भेट द्यावी.
ज्याप्रमाणे "महाकालेश्वर"(mahakaleshwar) हे ज्योतिर्लिंग मध्यप्रदेश राज्यात आहे, अगदी तिथूनच 112 किमी अंतरावर ओंकारेश्वर(omkareshwar) हे ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. "ओंकारेश्वर"(omkareshwar) मंदिर हे भगवान शिवाचे स्वयंभू प्रकारातील मंदिर असून, याचे बांधकाम अति प्राचीन काळातील मानले जाते.'omkareshwar temple information in marathi' आज या लेखात आपण ओंकारेश्वर(omkareshwar) मंदिरांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत. तरी सर्व वाचकांना नम्र विनंती करतो की हा लेख संपूर्ण वाचून "ओंकारेश्वर" (omkareshwar) या मंदीराची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी.
हे वाचा- "महाकालेश्वर" ज्योतिर्लिंग
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग माहिती- Omkareshwar Jyotirlinga Information In Marathi
हिंदू तीर्थ क्षेत्रापैकी तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे चौथ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग "ओंकारेश्वर"(omkareshwar) हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. ओंकारेश्वर(omkareshwar) मंदिर ज्या बेटावर स्थित आहे, त्या बेटाला माधंता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते. 'omkareshwar temple information in marathi' ओंकारेश्वर(omkareshwar) येथिल बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्याने हे ज्योतिर्लिंग "ओंकारेश्वर"(omkareshwar) या नावाने जगभर प्रचलित आहे. तरीही या मंदिराचे महत्व दोन मंदिरात विभाजित आहे. त्यामध्ये "ओंकारेश्वर" व "अमरेश्वर" अशी दोन रूपात अस्तित्वात आहेत. मंदिराच्या परिसरात नर्मदा व कावेरी या दोन पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे. "नर्मदा" ही अत्यंत पवित्र नदी असून भारतामध्ये "नर्मदा" परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.
हे वाचा - मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग
ओंकारेश्वर मंदिराचा संपूर्ण इतिहास- History Of Omkareshwar Temple
ओमकारेश्वर(omkareshwar) या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन असून, या मंदिराची रचना अत्यंत सुंदर व मजबूत आहे. पुराणातील माहितीनुसार या परिसरात अनेक महान ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे. तसेच अनेक देव - देवतांनी आपले वास्तव्य या ठिकाणी केल्याचा इतिहास आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव व श्री विष्णू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे तीन भागात विभाजन झालेले आहे.'omkareshwar temple information in marathi' ब्रह्म पुरी, विष्णुपुरी, रुद्रपुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. याच ठिकाणी भगवान शंकरा सोबतच श्रीविष्णू व ब्रह्म देवांची मंदिर सुद्धा नर्मदा किनारी वसलेली आहेत. ओंकारेश्वर(omkareshwar) परिसरात एकूण 68 तीर्थक्षेत्र असून, दोन ज्योती स्वरूपाचे शिवलिंग तसेच 108 प्रभावी शिवलिंग आहेत
ओंकारेश्वर(omkareshwar) या ज्योतिर्लिंग "ओंकार माधांत" या नावाने सुद्धा ओळखले जाते. याचे कारण असे की, याच नर्मदा किनाऱ्यावर माधांत राजाने महादेवाचे प्रचंड मोठे अनुष्ठान करून, महादेवाला प्रसन्न करून घेतल्याचे वर्णन इतिहासात आढळते. म्हणून ओम आकाराच्या या बेटाला "माधांता" किंवा "शिवपुरी" ही ओळख प्राप्त झाली आहे. माधांता राज्याची कठोर तपश्चर्या पाहता शिव शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या वरदनामध्ये भगवान शिव शंकरास त्यांनी स्वतः या बेटावर आपले कायमस्वरूपी वास्तव्य करावे, अशी इच्छा प्रगट केली.'omkareshwar temple information in marath' या राजाच्या विनंतीला मान देऊन भगवान शिव शंकराने आपले वास्तव्य कायमस्वरूपी या पर्वतात केले.
ओंकारेश्वर(omkareshwar) मंदिर अत्यंत प्राचीन जरी असलं तरी हे मंदिर कोणी निर्माण केलं ? याची इतिहासात अद्याप नोंद नाही. परंतु काही माहितीच्या आधारे इ. स. 1063 दरम्यान उद्या "उद्यादित्य" नावाच्या राजाने या मंदिराच्या बांधकामात चार दगड बसवले होते. यावरती संस्कृत भाषेत काही रचना आहेत. नंतर इ.स. 1195 ला राजपूत राजा "भारत सिंह चव्हाण" या राजाने ओंकारेश्वर(omkareshwar) या मंदीराची दुरुस्ती करून हे मंदिर पुन्हा बांधले होते. त्यानंतर संपूर्ण मंदिराचा जिर्णोद्धार 18 शतकात मराठा साम्राज्यातील पेशवे "दुसरे बाजीराव" यांच्या नेतृत्वात झाला.
इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासा सोबतच "राजमाता अहिल्याबाई होळकर" यांनी या ओंकारेश्वर(omkareshwar) या तीर्थक्षेत्राचा विकास केल्याची इतिहासात नोंद आहे. अहिल्याबाईंनी त्यांच्या काळात या "नर्मदा" नदीच्या प्रवाहात 18 हजार मातीची शिवलिंग विसर्जित केली होती.'omkareshwar temple information in marathi' त्यांच्या या काळापासून ही प्रथा आजही कायम आहे. नंतर काही काळानंतर इ.स. 1824 दरम्यान या मंदिराच्या परिसरात ब्रिटिशांचे शासन होते.
हे वाचा - सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंग
ओंकारेश्वर मंदिर व परिसर - Omkareshwar Temple
ओंकारेश्वर (omkareshwar) मंदिराची रचना अत्यंत भक्कम असून, हे मंदिर तीन मजली बांधण्यात आलेले आहे. या मंदिराचा सभामंडप प्रचंड मोठा असून परिसर देखील मोकळा आहे. मंदिराच्या भिंतीवर नक्षीदार काम केलेले असून अनेक चित्रे देखील कोरण्यात आलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर असे शिवलिंग असून त्याची रचना अंडाकृती आहे. ओंकारेश्वर (omkareshwar) हे शिवलिंग खडकाच्या स्वरूपात आहे. या शिव लिंगाची नियमित रूपात पंचामृताने स्नान घालून महापूजा केली जाते.
ओंकारेश्वर (omkareshwar) या मंदिरा सोबतच तितकच महत्व "अमरेश्वर" म्हणजे आताच्या काळातील "ओंकार ममले श्वर" या मंदिराला देखील आहे. याच मामलेश्वरास पूर्वीच्या काळी "अमरेश्वर" या नावाने ओळखले जायचे.'omkareshwar temple information in marathi' याच दोन मंदिराच्या संपूर्ण परिसरात अनेक तीर्थ आहेत त्यामध्ये सीता वाटिका, धावडी कुंड, मार्कंडेय शीला, माता घाट, मार्कंडेय संन्यास आश्रम, विज्ञान शाळा, अन्नपूर्णा आश्रम, खेडा पती हनुमान, बडे हनुमान, ओंकार मठ, ऋण मुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, माता आनंदमयी आश्रम, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आडे हनुमान, चांद सूरज दरवाजे, माता वैष्णवी देवी मंदिर, कुबरेश्वर महादेव, नरसिंह टेकडी, चंद्रमुळेश्वर, काशी विश्वनाथ, गजानन बाबा इत्यादी मंदिर अस्तित्वात आहेत.
ओंकारेश्वर(omkareshwar) या मंदिराच्या सभोवताली डोंगरी भाग असून, इथला संपूर्ण परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. पूर्वीच्या काळापासून या ठिकाणास अत्यंत महत्त्व आहे. श्री राम वंशज "राजा माधांता" राजाने या बेटावर आपला राज्यकारभार थाटला होता. तस पाहायला गेलं तर वेगवेगळ्या युगात हे ठिकाण बदलले गेले आहे, हे इतिहासात सांगितले जाते. उदाहरण द्यायचे झाले तर, सत्य युगात बेट रत्नांनी जडलेला होता, त्रेता युगात इथे सोन्याचे डोंगर अस्तित्वात होते, तर द्वापार युगात हा संपूर्ण परिसर तांबा या धातूने बांधलेला होता, आता या कलियुगात हा परिसर खडकात रूपांतरित झाला आहे.
"ओंकारेश्वर आणि ममले_श्वर " (Omkareshwar & Mamleshwar)
प्राचीन काळापासून ओंकारेश्वर(omkareshwar) हे ज्योतिर्लिंग विंध्य पर्वतात वसलेले आहे. विंध्य पर्वताचा आणि ओंकारेश्वर(omkareshwar) या मंदिरांचा संबंध दर्शवणारी एक पुरातन कथा आहे. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असताना ते विंध्य पर्वताच्या पायथ्याशी गेले. परंतु जेंव्हा नारद मुनी व विंध्य पर्वताच्या मध्ये वार्तालाप झाला. तेंव्हा विंध्य पर्वत आपन कसे श्रेष्ठ आहोत हे अभिमानाने नारद मूनीला सांगू लागला.
नारद मुंनीना हे दिसून आले की, विंध्य पर्वताच्या बोलण्यातून स्वतः आपण किती महान आहोत, याचे वर्णन तो करत आहे. तेव्हा विंध्य पर्वताला नारद मुनींनी सांगितले की, तुझ्याही पेक्षा श्रेष्ठ "मेरु" पर्वत आहे , त्याचे कारण अनेक ऋषीमुनींनी आपले तप - अनुष्ठान या मेरु पर्वतात पूर्ण केले असून, ती भूमी पावन झाली आहे.
हे नारद मुनींचे बोलणे एकुण, विंध्य पर्वत घोर तपश्चर्या करु लागला. तो ओमकारेश्वर(omkareshwar) महादेवा समोर बसून जवळपास सहा महिने तप करत बसला. तेंव्हा भोळ्या शंकरास विंध्य पर्वताची दया आली व ते स्वतः प्रगट झाले.
विंध्य ने शिव महादेवाचे दर्शन घेतले, तेव्हा महादेव त्यास काय वर देवू असं विचारू लागले. तेंव्हा मला प्रचंड बुध्दी द्या अशी मागणी विंध्य ने केली. व लगेच त्याने महादेवाला दुसरी विनंती केली. की आपण नियमित रूपाने या ठिकाणी वास्तव्य करा. ही विंध्यची मागणी एकूण भगवान शिव शंकर त्या ओंकारेश्वर(omkareshwar) येथे एकाचं वेळी ते दोन शिव लिंगात प्रकट झाले. एक "ओंकारेश्वर" आणि दुसरा "ममले_श्वर". आजही हे दोन प्राचीन मंदिर त्या ठिकाणी आहेत. या दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊन या बेटाला प्रदक्षिणा घातली जाते. ही प्रदक्षिणा अत्यंत पुण्यवान मानली जाते.
• ओंकारेश्वर येथे कसे जाल ?
ओंकारेश्वर (omkareshwar) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना भारत देशातील प्रत्येक राज्यातून येण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा, तसेच इतर खाजगी वाहतूक सेवा सुद्धा आहेत.
इंदोर येथील अहिल्याबाई होळकर विमान तळावर उतरल्यावर 1 ते 2 तासात बस किंवा टॅक्सी ने ओंकारेश्वर(omkareshwar) येथे येता येते. रेल्वे स्टेशन पासून 12 किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे. खांडवा जिल्ह्यात स्थिथ असणारे ओंकारेश्वर (omkareshwar) हे ज्योतिर्लिंग तिथून जवळपास 78 किमी आहे. इथे आल्यावर भाविक भक्त नर्मदा नदीच्या मधून होडीने दर्शनास जात असतात.
ओंकारेश्वर (omkareshwar) येथे सरासरी पाउस पडतो. त्यामुळे ईथे पावसाळ्यात सुद्धा यायला हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. दिवाळीच्या तोंडावर सुद्धा इथे खूप सुंदर वातावरण असते.
- उज्जैन ते ओंकारेश्वर अंतर | ujjain to omkareshwar distance - 141 km
- इंदोर ते ओंकारेश्वर अंतर | indore to omkareshwar distance -78km
- खांडवा ते ओंकारेश्वर अंतर | khandwa to omkareshwar distance - 78 km
आजच्या या लेखात आपण ओंकारेश्वर(omkareshwar) या ज्योतिर्लिंगाचे महत्व तसेच इतिहास जाणून घेतला. हा लेख आपणास आवडला असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
आमचे हे लेख सुद्धा वाचा 👇
3. गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती
0 Comments