श्री शैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Mallikarjun Jyotirlinga Information in Marathi
'mallikarjun temple information in marathi'

संपूर्ण भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे "श्रीशैलम मल्लिकार्जुन" (shri shailam mallikarjun) हे ज्योतिर्लिंग भारत देशातील आंध्र प्रदेश या राज्यात वसलेले असून, ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्रीशैलम पर्वतात स्थित असलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून 474 मीटर उंचीवर आहे. या परिसरातील डोंगर रांगाना नल्लमाई च्या डोंगररांगा असं म्हटलं जातं. या मंदिराचा संपूर्ण परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. या ठिकाणाला "दक्षिणेचे कैलास" म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील "महाबळेश्वर" येथून उगम पावणारी कृष्णा नदी याच मंदिराच्या जवळून वाहते. या नदीवर "श्रीशैलम" नावाचे मोठे धरण बांधलेले असून येथे विद्युत प्रकल्प कार्यरत आहे. 'mallikarjun temple information in marathi' या मंदिराच्या परिसरात अनेक पर्यटन स्थळ असल्याने इथे अनेक राज्यातून पर्यटक येत असतात. आज आपण या लेखात श्रीशैलम मल्लिकार्जुन या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा लेख संपूर्ण वाचावा.
हे सुध्दा वाचा 👇
सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंग संपूर्ण इतिहास
मल्लिकार्जुन मंदिराची संपूर्ण माहिती-Mallikarjun Temple Information in Marathi
जगप्रसिद्ध असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिर (mallikarjun temple) हे आंध्र प्रदेश राज्यातील "कर्णुल" जिल्ह्यात असून, या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर "मलिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिवशंकर" या दोघांचे एकत्रित स्वरूप म्हणजे मल्लिकार्जून (mallikarjun)' mallikarjun temple information in marathi' होय. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर पुरातन असून "सातवाहन" राजवटीच्या काळात बांधले गेल्याचे सांगितले जाते. काही शिला लेखाच्या आधारे हे स्पष्ट होते की, हे मंदिर दुसऱ्या शतकापासून या भूतलावर अस्तित्वात आहे. या भागात कृष्णा नदीस "पाताळगंगा" म्हणून देखील ओळखले जाते. या नदीवरील रस्ता चौदाव्या शतकात प्रोलया वेमा रेड्डी या राजाने बांधला. या राजाचा राजकीय काळ हा श्री सेलम येथील सुवर्णकाळ म्हणून गणला जातो.
या मंदिराचे काही बांधकाम तसेच दक्षिणेकडील गोपुरांचे दगडी बांधकाम विजयनगरच्या साम्राज्यातील राजांनी केले. तसेच "राजा कृष्णदेवराय" या विजयनगरच्या सम्राटाच्या काळात म्हणजे इ.स. पंधराव्या शतकात राजगोपुर चा संपूर्ण भाग बांधून पूर्ण केला गेला. या मंदिराच्या उत्तर दिशेला असणारे गोपुराचे बांधकाम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगितले जाते. ते दक्षिण दिग्विजय मोहिमेवर आले असताना ते श्रीशैलम या ठिकाणी इ.स.1667 च्या दरम्यान आले असल्याची आजही इतिहासात 'mallikarjun temple information in marathi' नोंद आहे. त्यांनी बांधलेल्या मंदिराचे बांधकाम मल्लिकार्जुन येथे उपलब्ध आहे. त्याबरोबर अनेक देव-देवतांची मंदिरही या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात.
मल्लिकार्जून मंदिराचा गाभारा जास्त मोठा नसल्याने दर्शनासाठी अनेक लोकांना एकदाच मंदिरात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागते. मंदिराच्या काही ठिकाणी नक्षीदार व कोरीव काम देखील करण्यात आलेले असून, या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केले आहे. जेव्हा आद्य गुरु शंकराचार्य पहिल्यांदा श्रीशैलम येथे आले, तेव्हा त्यांनी याच मंदिरात काही दिवस वास्तव्य करून "शिवानंद लहरी" या ग्रंथाची रचना केली होती. या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराचे वैभव पाहण्यासाठी लोक नियमित रुपाने गर्दी करत असतात. याचे अजून एक कारण म्हणजे भारतातील एकूण 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ महत्त्वाचे असणारे "ब्रम्हारंबा" या देवीचे मंदीर श्रीशैलम येथे आहे. महादेवाचे वाहन "नंदी" यांच्या तपाची फलप्राप्ती म्हणजे महादेवाचा मल्लिकार्जून अवतार तर पार्वती मातेचा ब्रम्हरम्बा अवतार होय.
• हे वाचा - गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती
ब्राम्हारंबा देवीची कथा - Story of Bharamaramba Devi
जेव्हा दक्ष राजांची कन्या "सती" चा विवाह भगवान शंकरांच्या सोबत झाला. तेव्हा काही कारणास्तव राजा दक्ष व भगवान शिव शंकर यांच्यात पटत नव्हते. त्यामुळे जावई असूनही दक्ष राजाने आपल्या घरी करण्यात येणाऱ्या यज्ञास भगवान शिव व सती या दोघा नवरा बायकोला निमंत्रित केले नाही. तेव्हा यज्ञाचे आमंत्रण आपले पती शंकरास न मिळालेले पाहून सती ला आपल्या वडिलांचा राग आला. परंतु वडील असल्याने ती त्यांना काही म्हणू शकली नाही. त्यामुळे सतीने रागाच्या भरात त्या त्या चालू असलेल्या यज्ञात जाऊन आपली आहुती दिली. हे भगवान शंकरांना कळताच ते अगदी तातडीने तिथे गेले आणि त्यांनी आपली पत्नी "सती" चे प्रेत आपल्या हातात उचलून घेतले व ते रागाच्या भरात पृथ्वीवर प्रचंड मोठा तांडव करु लागले. तेव्हा आपल्या पत्नीच्या दुखामुळे व्यथित होउन ते पृथ्वीवर सगळीकडे तिचे प्रेत घेऊन फिरू लागले. महादेवाचा क्रोध या सृष्टीला सहन होणार नाही, ही गोष्ट श्री विष्णूच्या लक्षात आल्यावर त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले गेले ते 51 तुकडे म्हणजेच आजचे 51 शक्तीपीठ म्हणून गणले जातात. त्या 51 तुकड्यात प्रत्येक ठिकाणी माता भगवती प्रगट झाली. "सती" देवीच्या या तुकड्यापैकी महत्त्वाचा भाग म्हणजे देवीचे मस्तक या श्रीशैलम पर्वतात पडल्याने महाशक्ती पीठ म्हणून "ब्रम्हरंबा" देवीचे हे शक्तिपीठ सबंध भारतात प्रसिद्ध आहे.'mallikarjun temple information in marathi'
हे सुद्धा वाचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तिपीठ 👇
1. आई तुळजाभवानी मातेचा संपूर्ण इतिहास
2. माहूरगड रेणुका मातेची संपूर्ण माहिती
3. सप्तशृंगी देवीचा संपूर्ण इतिहास
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कथा-Story Of Mallikarjun Jyotirlinga
शिव - पार्वती यांचे दोन पुत्र गणपती आणि कार्तिकी या दोघांमध्ये विवाह संदर्भात एकदा छोटासा वाद निर्माण झाला. तेव्हा तो वाद सोडवण्यासाठी ते कैलास पर्वतावर आपल्या आई वडिलांकडे गेले व ते आपल्या माता पार्वती ला विचारू लागले की, आमच्या दोघांपैकी सर्वात अगोदर कुणाचा विवाह होणार. तेव्हा मात्र हा प्रश्न पाहून माता पार्वती व महादेवांनी त्या दोघांना सांगितले जो सर्वप्रथम या पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचे लग्न अगोदर होईल.
ही शर्यत एकूण कार्तिकी आपल्या वाहन मयुरावर बसून प्रदक्षिणा करण्यास निघाला, परंतु श्री गणेशाने मात्र एक युक्ती लढवली. त्यांना माहिती होते की आपले वाहन मूषक असून त्याची गतीही कमी आहे. म्हणून त्यांनी आपले आई वडील हेचं संपूर्ण विश्व निर्माते आहेत. यामुळे पृथ्वी देखील यांच्यातच सामावलेली आहे. म्हणून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास न जाता. त्यांनी आपले वडिल शिव शंकर व माता पार्वती यांनाच आपल्या समोर बसवून 7 वेळा प्रदक्षिणा घातली व माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली असा दावा केला. 'mallikarjun temple information in marathi' तेंव्हा महादेव पार्वतीला अत्यंत आनंद झाला. श्री गणेश शर्यत कमी वेळात जिंकले यामुळे त्यांनी काही वेळातच गणपतीचा विवाह करून दिला.
परंतु इकडे संबंध पृथ्वीची प्रदक्षिणा करून आल्यावर कार्तिकी यांना गणपतीचे लग्न झालेले दिसले. हे पाहून आपल्यावर अन्याय झाला, असं त्यांना वाटू लागले. त्यामुळे ते नाराज होऊन एका पर्वतात रुसून गेले. हे त्यांच्या आई वडिलांना कळल्यावर शिव-पार्वती आपल्या पुत्रास परत आणण्यासाठी ते स्वतः कर्तिकिंच्या मागे गेले. परंतू आपले आई-वडील आपल्या मागे आपल्याला शोधत येत आहेत. हे कळल्यावर ते अजून दूरवर चालत गेले, ते पाहून भगवान शंकर व पार्वती माता कार्तिकी पुढे जाऊन अचानक प्रगट झाले. ते ज्या ठिकाणी प्रगट झाले, ते ठिकाण म्हणजेच "श्रीशैलम मल्लिकार्जुन" होय. आजही ते आपल्या मुलाच्या प्रेमासाठी या ठिकाणीं प्रत्येक पौर्णिमेला येत असतात. त्यामुळें या ठिकाणाला अत्यंत महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्याने मानवाचे सर्व पातके नष्ट होतात. असे स्कंद पुराणात सांगितले आहे.
• श्रीशैलम येथील इतर पर्यटन स्थळे -
![]() |
"Shri shailam Dam" |
![]() |
"Shri shailam Dam" |
श्रीशैलम येथे मल्लिकार्जून मंदीर तसेच ब्राम्हरंबा देवी या सर्व ठिकाणा सोबतच अन्य काहीं प्रसिध्द ठिकाणे त्या परीसरात पाहण्यासाठी योग्य आहेत. त्यामध्ये जवळच "नागार्जुन सागर नावाचा व्याघ्र प्रकल्प" आहे. त्यामध्ये वाघ, रानडुक्कर, हरीण, इ. प्राणी असून हि पर्यटकांसाठी विशेष पर्वणी आहे. तसेच कृष्णा नदीवर उभारण्यात आलेले "श्रीशैलम धरण" हे धरण अत्यंत सुंदर असून आजू बाजुला संपूर्ण हिरवळ आहे. इथे मोठा विद्युत प्रकल्प आहे. तसेच या परिसरात नाग लुटी मंदीर, पाठला गंगा, अक्का महादेवी लेणी, इश्टकमेश्वरी देवीचे मंदीर, चेंचू लक्ष्मी आदिवासी संग्रहालय, पलाधरा पांचाधरा. इ प्रसिध्द ठिकाणे'mallikarjun temple information in marathi' पाहण्यासारखी आहेत. त्यामुळें श्रीशैलम मल्लिकार्जुन येथे आल्यावर या सर्व पर्यटन स्थळांना अवश्य भेट द्या. आणि आपल्या पर्यटनाचा आनंद वाढवा.
![]() |
"नागार्जुन व्याघ्र प्रकल्प " |
श्रीशैलम मल्लिकार्जुन येथे कसे जाल ?
"श्रीशैलम मल्लिकार्जुन" येथे अनेक राज्यातून भाविक भक्त येत असतात. या मंदिरात शिवरात्री उत्सवानिमित्त अत्यंत गर्दी पाहायला मिळते. श्रीशैलम येथे येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये विमान, रेल्वे, बस तसेच इतर खाजगी वाहतूक सुविधा देखील उपलब्ध आहेत.
विमान सेवा - हैद्राबाद येथे राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे अंतर श्रीशैलम येथुन 213 किमी आहे. भारत देशातील अनेक राज्यांतील हा हवाई मार्ग जोडला गेला असून, प्रत्येक राज्यातून भाविक भक्तांना ईथे येता येते. हैद्राबाद येथून मल्लिकार्जुन मंदिरांचा प्रवास 5 ते 6 तासाचा आहे.
रेल्वे सेवा - मल्लिकार्जुन मंदिरापासून जवळच 81 किमी अंतरावर मरकापुर नावाचे रेल्वे स्टेशन असून हे अनेक प्रमुख रेल्वे स्टेशन शी जोडले गेले आहे. या भागात रेल्वेने जास्त प्रमाणात पर्यटक येत असतात.
बस सेवा - रेल्वेने किंवा विमानाने आल्यावर तिथून मल्लिकार्जुन येथे जाण्यासाठी बस सुविधा तसेच खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
• हैद्राबाद ते मल्लिकार्जुन अंतर - hyderabad to mallikarjun distance - 213 km
हे लेख सुद्धा वाचा 👇
1. राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनचरित्र
2. स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र
0 Comments