भीमाशंकर मंदीर संपूर्ण माहिती | Bhimashankar Temple Information in Marathi

भीमाशंकर मंदीर संपूर्ण माहिती | Bhimashankar Temple Information in Marathi 

'bhimashankar temple information in marathi'
'bhimashankar temple information in marathi' 

   नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण 'bhimashankar temple information in marathi' या लेखात भारत देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी सहाव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेले "भीमाशंकर"(bhimashankar) या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. यापूर्वी सोरठी सोमनाथ, मल्लिकार्जून, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, परळी वैजनाथ या पाच ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती आपण पाहिली. ही सर्व माहिती आपणास वाचायची असेल तर आमच्या साईट च्या मेनू बार मधील "तीर्थक्षेत्र" या पेजला भेट द्यावी.

  "भीमाशंकर"(bhimashankar) हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या रांगेत स्थित असून नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. चोहीकडे डोंगर व घनदाट जंगल असून त्यात "भीमाशंकर"(bhimashankar) हे पुरातन मंदिर अत्यंत शोभून दिसते. "भीमाशंकर"(bhimashankar) मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख अवश्य वाचा.


• 17 वेळा उध्वस्त करुनही आजही दिमाखात उभे असणारे पहिले ज्योतिर्लिंग "सोरठी सोमनाथ" मंदिरांचा इतिहास अवश्य वाचा.


भीमाशंकर ज्योतिर्लिंग संपूर्ण माहिती | Bhimashankar Jyotirlinga Information In Marathi

'bhimashankar temple information in marathi'
Bhimashankar jyotirlinga 

    "भीमाशंकर"(bhimashankar) हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील "खेड" तालुक्यात वसलेले आहे. हे देवस्थान समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे, तसेच मंदिराचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. 'bhimashankar temple information in marathi'   "भीमाशंकर"(bhimashankar) हे एक मोठे अरण्य असून यास इ. स. 1984 ला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. "भीमाशंकर"(bhimashankar temple) मंदिराजवळ "भीमा" नदीचा उगम होऊन ती गुप्त होते व पूढे 1.5 किलोमीटर अंतरावर जाऊन परत पूर्वेकडे दिसायला लागते. याच ठिकाणास "गुप्त भीमाशंकर" म्हणून ओळखले जाते.

   हिचं भिमा नदी पूढे पंढरपुरात गेल्यावर चंद्रकृती आकारात वाहत जाते, म्हणुन या भिमेस पंढरपुरात "चंद्रभागा" या नावाने ओळखले जाते. भीमा नदीचा इतिहास पाहायला गेलं तर "त्रिपुरासूर" नावाचा राक्षस अत्यंत उन्मत्त झाला, तेंव्हा त्याचा सर्वनाश करण्यासाठीं प्रत्यक्ष महादेव प्रगट झाले. 'bhimashankar temple information in marathi'  त्या दोघात घनघोर युद्ध होऊन शेवटी महादेवांनी राक्षसाला ठार केले. त्या युद्धात महादेवाला अत्यंत घाम आला त्यामुळे ते एका शिखरावर जाऊन विश्रांती करत बसले. तेंव्हा त्या घामाचे रूपांतर नदीत झाले, ती नदी म्हणजेच "भिमा" होय.

    "भीमाशंकर"(bhimashankar) या अभयारण्यात विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखल्या जाणारा "शेकरू" नावाचा प्राणी "भीमाशंकर"(bhimashankar) अभयारण्यातील मुख्य आकर्षण आहे. तो दिसायला "खारी" सारखा असून तो आकाराने मोठा व तपकिरी रंगाचा असतो. याच शेकरू ला "उडती खार" म्हणून ओळखले जाते. या अभयारण्यात अन्य जिवांमध्ये बिबट्या, रानडुक्कर, हरीण, सांबर, ससा, रानमांजर, उद मांजर, भेकर, साप ई. प्राणी पाहायला मिळतात. पावसाळ्यात या ठिकाणीं सर्वच परीसर हिरवागार भासतो.


• श्री शैलम मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग संपूर्ण इतिहास 


भिमाशंकर मंदिराचा संपूर्ण इतिहास | History Of Bhimashankar Temple 

'bhimashankar temple information in marathi'
भीमाशंकर मंदिर - 'bhimashankar temple information in marathi'

    "भीमाशंकर मंदिर"(bhimashankar temple) हे प्रचंड भक्कम असून हेमाडपंथी स्वरूपाचे आहे. या मंदीराची वास्तुकला पुरातन नागरा शैलीतील असून विश्वकर्मा निर्मित वास्तू केलेप्रमाने भासते. 'bhimashankar temple information in marathi'  हे मंदिर पुरातन असून जवळपास 1200 वर्षा पूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या सर्वत्र बाजूंनी नक्षीदार कोरीव काम केलेले असून, त्यामधे दशवतराच्या मुर्ती विराजमान आहेत. भगवान शिव पिंडीसाठी पंचमुखी चांदीचा मुखवटा बनवण्यात आलेला आहे. त्या मुखवट्यावर ब्रम्ह, विष्णु, महेश, सूर्य आणि चंद्र या पाच देवांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, म्हणूनचं या शिवलिंगाचा उल्लेख "पंचमुख" असा केला जातो. शिव लिंगाच्या पश्चिम दिशेला माता पार्वतीची सुंदर मुर्ती विराजमान आहे. तसेच अंगणात लहानसे शनी मंदिर असून थोड्या उंचीवर गोरक्षनाथ यांचे मंदिर आहे.

  "भीमाशंकर" (bhimashankar jyotirlinga) मंदिराचा जिर्णोद्धार इ. स. 18 व्या शतकाच्या सुमारास श्री नाना फडणवीस यांनी केला. तसेच इ. स. 1437 ला पुणे येथील सावकार चिमणाजी भिडे यांनी "भीमाशंकर"(bhimashankar) मंदिराचा सुसज्ज असा सभामंडप उभारला. या शिव लिंगाची रचना मोठया स्वरूपाची असल्याने "भीमाशंकर"(bhimashankar) हे ज्योतिर्लिंग "मोटेश्वर" या नावाने सुद्धा देशभर प्रचलित आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य मूर्ती असून, अंगणात पाच मण वजनाची मोठी लोखंडी घंटा बांधण्यात आली आहे. 'bhimashankar temple information in marathi'  हि घंटा इ. स. 16 मे 1739 ला पोर्तुगीज युद्ध जिंकून येताना चिमाजी अप्पांनी "भीमाशंकर"(bhimashankar temple) मंदिरास भेट दिली. या आशा प्रकरातील घंटा त्यांनी जवळपास पाच मंदिरांना त्यावेळी भेट दिल्या. त्यामधे ओंकारेश्वर, बाशंकर, रामलिंग तसेच कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर असणारे शिव मंदीर या सर्व मंदिरांचा समावेश होता.

   "भीमाशंकर" (bhimashankar) या मंदिरात अधून - मधून स्वराज्याचे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजाराम महाराज शिव शंकराच्या दर्शनाला येत होते. तसेच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे सुद्धा "भीमाशंकर" (bhimashankar) मंदिरात दर्शनाला आल्याची इतिहासात नोंद आहे.

'bhimashankar temple information in marathi'
भीमाशंकर मंदिर कळस 


• महाकालेश्वर ज्योतिर्लिंग संपूर्ण इतिहास


भिमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा | Story Of Bhimashankar Jyotirlinga

     "भिमाशंकर"(bhimashankar jyotirlinga) या मंदिराचा इतिहास जरी 1200 वर्षापूर्वीचा असला, तरीही हे ज्योतिर्लिंग नेमकं कसं निर्माण झाले ? याची कथा अशी की, जेव्हां रावणाचे आणि भगवान श्री राम प्रभूंचे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात रावणाचा मोठा बंधू "कुंभकर्ण" याचा वध केला गेला. परंतु याच्या मागील इतिहास असा की कुंभकर्ण एकदा सह्याद्री पर्वतात वास्तव्यास असताना, त्याच्या सहवासात "कर्कटी" नावाची स्त्री आली. तिचं सौंदर्य पाहून कुंभकर्णाने तिच्यासोबत विवाह केला. परंतू कुंभकर्ण काही दिवसांनी लंकेत रावणाकडे निघून गेला. इकडे मात्र कर्कटी ग्रभवती राहिली. नऊ महिन्यानंतर तीला पुत्रप्राप्ती झाली. त्या मुलाचे नाव तिने "भीम" असे ठेवले. 

    भिम सुरवाती पासूनच पराक्रमी आणि शूरवीर होता. आपल्या वडिलांचा वध श्री रामाने केला हे त्याला कळल्यावर त्याला श्री रामाचा खूप राग आला. त्याने आधीक बलशाली होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली. सर्व देवतांवर विजय मिळवता यावा यासाठी भीम प्रचंड तप करू लागला. त्याची कठोर तपश्चर्या पाहून श्री ब्रम्ह देव स्वतः प्रगट झाले व भिमास वर मागण्यास सांगितले. तेंव्हा मला कुठलेही देव - देवता पराजित करु शकणार नाही, असा वर द्या. त्याची प्रार्थना एकुण ब्रम्ह देवाने त्यास होकार दिला. 

     परंतू ब्रम्ह देवाने दिलेल्या वराचा भीमाने गैरफायदा घेणे चालू केले, तो कोणाचेही म्हणणे एकत नव्हता. आपण या तिन्ही लोकात बलशाली आहोत याचा अभिमान त्याला वाटू लागला. त्याच भागात कामरुपेश्वर नावाचा राजा राज्य करीत होता. तो राजा महादेवाचा भक्त होता. तो नित्य नियमाने शिव लिंगाची पूजा करत असे. एक दिवस तो शिव शंकराची पूजा करतांना भीमाने त्याला पाहिले व त्यास महादेवाची पूजा नको करू तर माझी पूजा कर अशी आज्ञा दिली. परंतु राजाने भीमाच्या अज्ञेस नकार दिला. ते पाहून भीमाने काम रूपेश्वर राजास बंदित टाकले. 

     भीमाने राजास बंदित टाकल्यावर सुद्धा राजाने आपली नियमीत चालणारी पूजा बंद केली नाही. राजाने कारागृहात शिवलिंग स्थापन करुन तो तिथेच पूजा करू लागला. ही गोष्ट भीमाच्या कानावर गेल्यावर त्यास राजाचा खूप राग आला. त्याने राजास मारहाण केली व राजाने स्थापन केलेल्या शिव पिंडीवर आपल्या तलवारीने घाव करण्याचा प्रयत्न करायला गेला. तेवढ्यात भगवान शिव त्या लींगातून प्रगटले व उन्मत झालेल्या भीमा सोबत युद्ध करून त्यास ठार मारले. भगवान शंकरांनी भीमाला मारण्यासाठी अर्धनारी नटेश्वर वेष धारण केला होता. 'bhimashankar temple information in marathi'  आपल्यावरील संकट कायमचे दुर झाले, त्यामुळे राजा व प्रजा सुखी झाली. व त्यांनी भगवान शिव शंकरास त्याच ठिकाणी राहण्याची विनंती केली. त्या सर्व भक्तांच्या विनंतीस मान देउन ते तिथेच राहिले. काही दिवसांनी भीमाचा वध शंकरांनी केला त्यामुळे हे ठिकाण "भीमाशंकर"(bhimashankar) या नावाने ओळखले जाऊ लागले.

• जाणून घ्या नर्मदा किनाऱ्यावर वसलेल्या "ओंकारेश्वर" ज्योतिर्लिंगाचे रहस्य 

भिमाशंकर येथील प्रमुख स्थळे - 

     "भिमाशंकर"(bhinashankar) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. इथे संबंध भारत देशातून भाविक भक्त दर्शनसाठी येत असतात. तसेच या मंदिराच्या परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

    • कोकण कडा - हे ठिकाण भीमाशंकर(bhimashankar) मंदिरापासून जवळच पश्चीम दिशेला असून हा कडा जवळपास 1100 मीटर उंचीवर आहे. या कड्यावरून निसर्गाचे चित्र अत्यंत विलोभनीय दिसते. थोड्या प्रमाणात का होईना अरबी समुद्र देखील इथून दिसतो. म्हणूनचं हे ठिकाण "कोकण कडा" या नावाने प्रसिद्ध आहे.

   • नागफणी - हे ठिकाण भीमाशंकर(bhimashankar) मंदिरापासून जवळच आहे. हे ठिकाण परिसरातील उंच भगांपैकी सर्वात उंचं म्हणजे 1230 मिटर उंचीवर आहे. हे ठिकाण नागाच्या फणीच्या आकाराचे दिसते. म्हणून हे ठिकाण "नागफणी" म्हणून ओळखले जाते.

'bhimashankar temple information in marathi'
नागफणी डोंगर 


  • सीताराम बाबा आश्रम - हे आश्रमाचे ठिकाण कोकण कड्या पासून कमी अंतरावर आहे, तिथूनच या आश्रमात जायला रस्ता असून गाडीने सुद्धा या ठिकाणी जाता येते.

    तसं पाहायला गेलं तर संपूर्ण "भीमाशंकर"(bhimshankar) हे ठिकाणचं मुळात स्वर्गासारखे भासते  त्यामुळे याठिकाणी सर्वांनी नक्की भेट द्यावी.


• हेही वाचा - परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले?


भीमाशंकर येथे कसे जाल ? 

      "भीमाशंकर"(bhimashankar) हे ठिकाण पुणे येथून 106 km तर नाशिक येथून 219 km आहे. दुरुन येणाऱ्या भाविक भक्तांना पुणे येथे येण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध आहेत. तिथून भीमाशंकर येथे येण्यासाठी भरपूर बस तसेच खाजगी वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.

      'bhimashankar temple information in marathi'  या लेखात आपण "भिमाशंकर"(bhimashankar) या ज्योतिर्लिंगाचे महत्व स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. हा लेख आपणास आवडला असेल तर नक्की शेअर करा.


FAQ 

1.  भिमाशंकर मंदिराला किती पायऱ्या आहेत ?

    - 230

2. भिमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे ?

   - पुणे 


Post a Comment

0 Comments