संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती | Sant Janabai Information in Marathi
संपुर्ण वारकरी संप्रदायात आजही ज्याचं नाव आदराने घेतले जाते आशा महान "संत जनाबाई" यांची जीवनगाथा 'sant janabai information in marathi' सांगायची झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील "परभणी" जिल्यात "गोदावरी" नदी किनारी असणाऱ्या "गंगाखेड" येथे इ. स.1258 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'दमा' तर आईचे नाव 'करूंड' असे होते. त्यांचे कुटुंब हे पारमार्थिक असून वडिल 'दमा' हे वारकरी होते. ते नियमित रुपाने भगवान पांडुरंगाची भक्ती करत असायचे. त्यामुळे जनाबाईंना सुद्धा बालपणापासून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली.
•गंगाखेड तालुक्यातील जगप्रसिद्ध शिव मंदिर 👈
संत जनाबाईंचे बालपण - Childhood of Sant Janabai
संत जनाबाईंच्या आयुष्यातली सुरवातीचा 5-6 वर्षाचा काळ हा त्यांच्या जन्मगावी गेला. मुळातच त्या हुशार असल्याने त्यांना बालपणी पासून देवाची भक्ती करणं अत्यंत आवडायचं. त्यांच्यातला समजूतदारपणा लक्षात आल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना बालपणीच दामाजी शिंपी यांच्याकडे कामानिमित्त पाठवले,दामाजी शिंपी हे संत नामदेवांचे वडील होते. संत नामदेवांचे कुटुंब मोठे असून ते सर्व जनाबाईंना आपल्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे जीव लावत तसेच त्यांचे सर्व लाड सुद्धा पुरवत.'sant janabai information in marathi'
संत नामदेव सुद्धा पांडुरंग परमात्म्याची भक्ति करायचे त्यामुळे त्यांच्या सहवासात राहुन जनाबाईंना सुद्धा विठ्ठल भक्तीत अजून जास्त रस निर्माण झाला. संत नामदेव महाराज यांना त्या गुरुस्थानी मानत. त्या देखिल संत नामदेव महाराज यांच्या सारख्या अभंग रचना करायला लागल्या. संत नामदेव यांच्या समवेत राहून त्यांना अनेक संताचा सहवास लाभला. त्यांच्या अनेक अभंग रचनेत त्या स्वतःला "नामयाची जनी" म्हणून संबोधतात. त्यांनी भरपूर अभंग रचना केल्या. त्यांच्या ओव्या आजही काही महिला दळण दळताना मोठया आनंदाने म्हणतात.
संत जनाबाई यांची साहित्य रचना - Literary composition of Sant Janabai
'sant janabai information in marathi' संत जनाबाई यांनी उभ्या आयुष्याच्या कारकिर्दीत अनेक अभंग तसेच खूप साऱ्या ओव्या रचल्याचे दिसून येते. त्यांच्या अभंग गाथेतील जवळपास 350 अभंग आजही उपलब्ध आहेत. त्यांनी लीहलेले काही अभंग संत नामदेवांच्या गाथेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे अभंग हे "कृष्णजन्म" , "बाळक्रीडा", "थाळीपाक", "प्रल्हाद चरित्र", "काकडा आरती", "भक्तीपर अभंग", "संतपर अभंग", "हितवचने", "अख्यानपर" ई. विषयावर आधारित आहेत. संत जनाबाईंच्या "द्रौपदी स्वयंवर" या विषयावरील काही अभंग हे संत एकनाथ महाराजांचे नातू "मुक्तेश्वर" यांना अत्यंत आवडले होते. या अभंगाच्या वाचनातून त्यांना स्फूर्ती मिळाली होती.
त्यांच्या प्रत्येक अभंगात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सेना न्हावी, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत सोपान देव ई. संताची महती वर्णिली आहे. सर्व संताची स्तुती, पांडुरंग परमात्म्याची भक्ति तसेच आपल्या अभंग रचनेतून पांडुरंगाला शरण जाणे, रागवून पांडुरंगाला आपल्या अभंगातून भांडणे त्याच्याशी वाद घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. यातही त्यांच प्रेम भरलेलं होतं.
संत जनाबाई आणि संत कबीर यांची भेट - Meeting of Sant Janabai and Sant Kabir
संत जनाबाई पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी राहून त्यांची सर्व कामे करत असायच्या. झाडून काढणे, केर भरणे, पाणी भरणे, स्वयंपाक करणे अशी अनेक कामे जनाबाई स्वतःला "नामदेवांची दाशी" म्हणून करत असत. त्यांची भक्ती पाहून भगवान परमात्मा देखिल त्यांच्या मदतीला धावून यायचा असेहि सांगितले जाते. या सर्व कामातून सवड काढून त्या अभंग रचना करत असतं.'sant janabai information in marathi' त्यांचं साहित्य त्या काळात सर्व दूरवर पसरलं होतं. त्यांची ख्याती ऐकून अनेक विद्वान लोकं त्यांना भेटायला येत असतं.
अशीच संत जनाबाईंची कीर्ति सर्व दुर पसरली असताना ती "संत कबीर" महाराजांच्या कानावर आली. त्यांना असं वाटलं की एवढी महान विठ्ठल भक्त असणारी महीला नेमकी आहे तरी कोण ? एकदा तरी प्रत्यक्षात ती पहावी. असं म्हणून ते कसलाही विलंब न करता थेट पंढरपुरात आले. त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले.'sant janabai information in marathi' आणि ते तिथल्या लोकांना जनाबाई बद्दल विचारणा करू लागले. जनाबाई कुठे राहतात हे कळल्यावर ते नामदेवांच्या घरी गेले. परंतू जनाबाई तेंव्हा गोवऱ्या आणायला गेल्या होत्या. बराच वेळ झाला त्या येतं कशा नाहीत हे पाहायला स्वतः कबीर तिकडे विचारत - विचारत गेले. तेव्हां तिकडे दोन बायका गोवऱ्यासाठी प्रचंड भांडताना त्यांनी पाहिल्या. तु माझ्या गोवऱ्या चोरी केल्यास असं त्या एकमेकींना म्हणत तंटा करत होत्या. हे सर्व पाहत असताना कबीर त्या दोघींना विचारू लागले की जनाबाई कोण आहेत ? त्या आल्या का इकडे.? त्यावर ती दुसरी बाई म्हणाली अहो हीचं की "जनी" जी मला भांडत आहे. त्यावर क्षणभर कबीर यांना वाटलं की या भांडणाऱ्या जनाबाई असूच शकत नाहीत. म्हणुन ते परत - परत तेचं विचारू लागले आणि शेवटीं न राहवून स्वतः जनाबाई त्यांना म्हणाल्या अहो मीच "जना" आहे. तुम्ही काय करा तर इकडे या आणि आमच्या भांडणाचा न्यायनिवाडा करा. त्यावर क्षणभर काही न बोलता संत कबीर म्हणाले या शेणाच्या गोवऱ्या तर सारख्याच आहेत. तर कोणाच्या कोणत्या हे कसं ओळखणार ? असं म्हणत ते परत निघाले. परंतू जनाबाईंनी त्यांना सांगितलं की ज्या गोवरीतून माझ्या विठ्ठलाचं नाव एकु येईल त्या गोवऱ्या माझ्या. तेंव्हा मात्र कबीर गोवऱ्या हातात घेउन कानाला लावून पाहायला लागले, तेंव्हा बऱ्याच गोवऱ्या मधून विठ्ठल नाम एकु आले. जनाबाईंच्या बाजूने न्याय झाला. हा चमत्कार पाहून संत कबीर यांचा पक्का विश्वास बसला की याच संत जनाबाई असाव्या. नंतर जनाबाईंनी देखिल त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांचा योग्य पाहुणचार केला. 'sant janabai information in marathi' आशा प्रकारे अनेक चमत्कारिक प्रसंग पांडुरंग परमात्म्याच्या कृपने त्यांच्या आयुष्यात घडले. आजही वारकरी संप्रदायात त्यांच्या नामाचा जप केला जातो. आशा या साधं राहणीमान असणाऱ्या जनाबाई पूढे महान संत म्हणून या महाराष्ट्रात नावा रूपाला आल्या.
संत जनाबाई यांचा मृत्यू काळ - Death time of Sant Janabai
संत जनाबाई यांनी त्यांचं संपूर्ण जिवन भगवान पांडुरंगाची भक्ती करण्यात वाहिलं. त्या शेवटपर्यंत पंढरपुरात राहील्या आजही त्यांच्या जून्या वस्तू , पंढरपुरात "गोपाळपूरा" इथे आपल्याला पाहायला मिळतात. आजीवन पांडुरंगाची भक्ती करणं, कसलाही स्वार्थ, लोभ नसताना ज्यांनी संताच महत्व आपल्या अभंगातून जनतेत रुजवलं त्या महान संत जनाबाई यांनी आपल्या आयुष्याची कारकीर्द आषाढ कृष्ण त्रयोदशी इ. स. 1350 ला संपवत भगवान पांडुरंगाच्या महाद्वारी त्या अनंतात विलीन झाल्या. संत जनाबाई यांच्या जन्म व मृत्यूची इतिहासात ठोस अशी नोंद जरी नसली तरी त्यांचा अंदाजे कार्यकाळ इ. स. 1258 ते 1350 असावा. 'sant janabai information in marathi' सत जनाबाई यांनी आपल्या जिवनात भक्तीचा खरा आनंद घेतला. त्यांनी मनोभावे पांडुरंग परमात्म्याची सेवा केली. त्यांना "संत नामदेव महाराज" यांच्या सारख्या महान संताच्या सानिध्यात राहायला मिळालं.
संत जनाबाई यांचे अभंग -Abhang of Sant Janabai
1) येग येग विठाबाई
2) झाड लोट करी जनी
3) विठू माझा लेकुरवाळा
4) धरिला पंढरीचा चोर
5) संत भार पंढरीत
या अभांगसारख्या अनेक रचना त्यांच्या आजही प्रसिध्द आहेत. त्यांचे अभंग म्हणजे त्या काळी पांडूरंग परमात्म्याशी केलेली हित गूज म्हणावी लागेल. अशा या महान "संत जनाबाई" आजही प्रत्येक वैष्णवांच्या मनात दडलेल्या आहेत. संत जनाबाई यांच्या बद्दल भरपूर सांगता येईल असं बरंच साहित्य आहे. त्यापैकी बरीच माहिती लीहन्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती नक्की आवडेल अशी आशा बाळगतो. जर ही माहिती आवडली तर आपल्या व्हॉटसअप ग्रूपवर शेअर करायला विसरू नका, आणि आपल्याकडे यापेक्षा अधिक माहिती असेल तर कॉमेंट बॉक्स नक्की कळवा ती योग्य असेल तर आम्ही या पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद 🙏
•हे सुध्दा अवश्य वाचा 👇
1. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र
2. महाराणा प्रताप यांचा संपूर्ण इतिहास
3. अहिल्याबाई होळकर यांचं जीवनचरित्र
•संत साहित्याची आवड असेल तर हे वाचा 👇
1) सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ( संपूर्ण अर्थ )
2) लेकुराचे हित आहे माउलीचे चित्त ( संपूर्ण अर्थ )
राम कृष्ण हरी 🙏🚩
FAQ
1. संत जनाबाईंचा जन्म कोठे झाला ?
- गंगाखेड ( परभणी )
2. संत जनाबाईंचे गुरू कोण होते ?
- संत नामदेव महाराज
1 Comments
👍👍👍👍✨
ReplyDelete