संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती | Sant Eknath Maharaj Information In Marathi

संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती | Sant Eknath Maharaj Information In Marathi

'sant eknath information in marathi'
'sant eknath information in marathi'

       संत एकनाथ महाराजांसारख्या महान संताची जीवनगाथा लिहिताना संत नामदेव महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर..'sant eknath information in marathi' 

ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले | उद्ध रया आले दीन जना ||

अगदी या ओविसी लागू पडतील अशा कर्तृत्वाचे अनेक संत - माहात्म्य इथल्या भूमीत जन्माला आले. अगदी त्यांच्यातील एक म्हणजे शांति ब्रम्ह एकनाथ महाराज. "नाथ" महाराजांबद्दल सांगायचं झालं तर संत एकनाथ महाराजांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील "संभाजीनगर" जिल्ह्यात असणाऱ्या "पैठण" या गावी झाला.

'sant eknath information in marathi'

हे सुद्धा वाचा 👇

आषाढी वारीचा संपूर्ण इतिहास 


संत एकनाथ महाराजांची कौटुंबिक माहिती - Family Information of Sant Eknath Maharaj 

      संत एकनाथ महाराज यांचा जन्म इ. स. 1533 ला पैठण मधील एका छोट्याशा ब्राम्हण कुटुंबात झाला. "पैठण" हे गाव "वेद, शास्त्र, पुराणांचे माहेरघर" तसेच महाराष्ट्रातील "दक्षिण काशी" म्हणून ओळखले जाते. संत एकनाथ महाराज यांच्या बद्दल एक विशेष गोष्ट अशी की, थोर असे कृष्ण भक्त "संत भानुदास महाराज" हे नाथ महाराजांचे पंजोबा होते. ते नियमित रुपाने सूर्य देवतेची पूजा अन् उपासना करायचे. त्यामुळेच कदाचित नाथ महाराजांच्या वडिलांचे नाव "सूर्यनारायण" ठेवलं असावं. नाथ महाराजांचा घरांना पूर्वीपासून पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असे. एकदा तर पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती राजा "कृष्णदेवराय" याने आपल्या विद्यानगर ला नेली. तेंव्हा प्रचंड प्रयत्नातून ती मूर्ती पंढरपुरात परत आणण्याचे महान काम "संत भानुदास" महाराजानी त्या काळी केले. भानुदास महाराजांचे पुत्र "चक्रपाणी" तर चक्रपाणी यांचा मुलगा "सूर्यनारायण". 'sant eknath information in marathi' नाथ महाराजांच्या आई वडिलांचे नाव  रुक्मिणी आणि सुर्यनारायण असे होते.


संत एकनाथ महाराजांचे बालपण - Childhood of Sant Eknath Maharaj

       नाथ महाराजांच्या बालपणीच त्यांचे आई - वडिल त्यांना कायमचे सोडुन गेले. खरतर एवढ्या बालवयात आई वडिलांचं छात्र हरवून जाणं, हि नाथ महाराजांसाठी अत्यंत दुःखद घटना होती. परंतू नियती पूढे मनुष्य तरी काय करणार. त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी व आजी सरस्वती या दोघांनी मिळून केला. लहानपणापासून नाथ महाराज अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना अध्यात्माची प्रचंड आवड होती. नाथ महाराज 7 वर्षाचे असताना त्यांची मुंज करण्यात आली. 

      त्यांना जेंव्हा पारमार्थिक क्षेत्रातील ज्ञान उमजायला लागले. तेंव्हा आपले कुणीतरी पारमार्थिक गुरू असावे, अशी ओढ मनापासून त्यांना लागली होती. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला. यातूनच देवगिरी (दौलताबाद) येथे वास्तव्यास असणाऱ्या "जनार्दन स्वामी कडे जाऊन त्यांना गुरू करा" असा आदेश त्यांना प्राप्त झाला. तेंव्हा कोणालाही न सांगता नाथ महाराज लहानपणीच देवगिरी येथे गेले. जनार्दन स्वामी हे मूळचे चाळीसगाव येथील असले, तरीही ते देवगिरी येथिल दरबारात अधिपती या पदावर कार्यरत होते. त्यांचे गुरु श्री "दत्तात्रय" होते. जेंव्हा नाथ महाराज देवगिरी येथे आले, तेंव्हा आपल्याला झालेला दृष्टांत सांगून मनोभावें गुरूंच्या पाया पडले. स्वामींनी सुद्धा त्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेऊन त्यांना आपल्या जवळ ठेऊन घेतलं. अनेक महान ग्रंथाची माहिती त्यांना आपल्या गुरू मार्फत मिळाली.'sant eknath information in marathi' नाथ महाराजांनी आपल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे अनेक ग्रंथाचा अभ्यास केला. गुरू आणि ईश्वर एकच मानून नाथांनी आपल्या गुरूंची जवळपास 6 वर्ष सेवा केली.

👇

अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र 


संत एकनाथ महाराजांची तपश्चर्या -Penance of Sant Eknath Maharaj

       ग्रंथातील शाब्दिक ज्ञान आणि आत्मसात केलं गेलेलं ज्ञान यात खूप फरक असतो. त्यामुळे खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या महत्वाची आहे. हि गोष्ट लक्षांत घेऊन जनार्दन स्वामी यांनी नाथ महाराजांना तपश्चर्या करण्यास सांगितले. आपल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे नाथ महाराज तपश्चर्या करण्यास गेले. तपश्चर्या पूर्णत्वास आल्यावर आपल्या गुरूंचे गुरुवर्य असणारे महान अनुसया पूत्र श्री दत्तात्रय यांनी नाथ महाराजांना आपले दर्शन दीले. नाथ महाराजांना या तपश्चर्या मधून खूप सारा लाभ होऊन त्यांना दिव्य ज्ञान मिळाले.'sant eknath information in marathi' तसेच त्यांना " सिध्द " अवस्था प्राप्त झाली. आपल्या कठोर तपश्चर्या यातील अनुभव त्यांनी आपल्या गुरू देवांना आल्यावर सांगितले.

       नाथ महाराजांना प्राप्त झालेलं ज्ञान हे सर्व दुरवर पसरून अज्ञानाच्या अंधकारात पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाथ महाराजांचे विचार ईथल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत असं स्वामींना वाटू लागले. त्यामुळे नाथ महाराजांना त्वरित तीर्थयात्रा करण्याचा आदेश स्वामींनी दिला. स्वामींच्या आदेशावरून नाथ महाराज तीर्थयात्रा करण्यास निघून गेले. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर जाताना त्यांना विवध अनुभव प्राप्त झाले. यातूनच त्यांनी जगाचे कल्याण करण्याचा हेतू मानत बाळगून अनेक ग्रंथ रचना देखील केल्या.'sant eknath information in marathi'

'sant eknath information in marathi'
गुरू परंपरा - श्री दत्तात्रय - श्री जनार्दन स्वामी - संत एकनाथ महाराज 

संत एकनाथ महाराजांचे साहित्य - Literature of Sant Eknath Maharaj 

        नाथ महाराजांनी त्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीत अनेक अभंग रचना तसेच ग्रंथ रचना केल्या. जेंव्हा नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी नाशिक येथिल पंचवटी येथे श्री राम प्रभूंच्या दर्शनासाठी निघाले असता वाटेत त्यांनी एका गृहस्थाच्या घरी मुक्काम करावा लागला.'sant eknath information in marathi' त्या गृहस्थाचे नाव " चंद्र-भट " असं होतं. मुक्कामाच्या रात्री त्या गृहस्थाने त्यांना "चतुःश्लोकी भागवत" या ग्रंथाचे सविस्तर निरुपण करून दाखवले. यातूनच जनार्दन स्वामी यांनी नाथ महाराजांना याचं "चतुःश्लोकी भागवत" ग्रंथावर प्राकृत भाषेत टिका करण्याचा आदेश दिला. गुरूच्या आज्ञेप्रमाणे हे लिखाण अगदी काही दिवसांत नाथ महाराजांनी पूर्ण देखील केले. एकादश स्कंध यावरील टिका श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या कृपेने पूर्ण होईल. असा आशिर्वाद स्वामींनी नाथ महाराजांना दिला.

         नाथ महाराजांनी "चतुःश्लोकी भागवत"  ग्रंथाच्या  बरोबरच अनेक रचना केल्या त्यात अभंग, गौळणी, भारुड,   रुक्मिणी स्वयंवर, स्फुट कथा, चारित्रपर लेखन, संत नामदेव चरीत्र, संत गोरा कुंभार चरित्र, संत चोखामेळा, संत सावता महाराज इ. चरित्रे, ध्रुव, प्रल्हाद, सुदामा यांच्यावर आधारित भक्त चरित्रे, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्यावर आधारित स्तुतीपर रचना, आरत्या, काव्य, हिंदी रचना, भावार्थ रामायण, चिरंजीव पद इत्यादी अध्यात्मिक रचना नाथ महाराजांनी त्यांच्या लेखणीतून केल्या. "त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा" हि प्रसिध्द दत्तगुरु वरील आरती देखील नाथ महाराजांनी लिहिलेली आहे. आपल्या लेखणीतून शांतीचा संदेश देत आयुष्यभर त्यांनी "भागवत धर्माचा" प्रसार केला.

संत एकनाथ महाराजांचे सांसारिक जीवन - Worldly Life of Sant Eknath Maharaj

         नाथ महाराज घरी कोणालाच न सांगता गुरू करण्यासाठीं निघून गेले. तेंव्हां त्यांचे वय हे 12 वर्ष होते. सर्व अध्यात्मिक ज्ञान आपल्या गुरूकडून प्राप्त केल्यावर, तीर्थयात्रा करून नाथ महाराज आपल्या पैठण या जन्मगावी आले. तेंव्हा त्यांचे वय 25 वर्ष होते. नाथ महाराज घरी आलेले पाहून त्यांच्या आजी आजोबांना अत्यंत आनंद झाला. नंतर काही दिवसातच आपल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी विवाह केला. " गिरीजा बाई " हे त्यांच्या पत्नीचे नाव होते. नाथ महाराजांना हरी नावाचा मुलगा तसेच गंगागोदावरी अशा दोन मुली झाल्या. त्यांचा मुलगा हरी हा अत्यंत हुशार असून पुढे त्याने आपल्या वडिलांना गुरुस्थानी ठेवून सर्व अध्यात्मिक ज्ञान मिळवले. पुढे हरीला प्रल्हाद, मेघश्याम तसेच राघोबा हे तीन अपत्य प्राप्त झाली. मधला मुलगा मेघश्याम याचा वंश आजही पैठण येथे वास्तव्यास आहे. महान कवी "मुक्तेश्वर" सुद्धा नाथ महाराजांचे मुलीकडून नातू होते.'sant eknath information in marathi'


संत एकनाथ महाराजांचे सामाजिक कार्य - Social work of Sant Eknath Maharaj

      नाथ महाराजांनी आपलं उभ आयुष्य समाजासाठी झोकून दिलं. त्या काळातील समाज अज्ञानात वाहून जातं होता. त्याला आपल्या ज्ञानाचे बांध घालत थांबवण्याचे काम नाथांनी केले. त्या काळी सर्वसामान्य लोकांत अनेक, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा, नवस, मुक्या जनावरांना बळी देणं. या गोष्टी चालत होत्या. नाथ महाराजांनी या असत्य गोष्टींना थारा न देता. सर्व लोकांना सत्य काय याची जाणीव करुन दिली. सर्व लोकं हे समान आहेत असं म्हणत जाती पातीच्या जाळ्यातून बाहेर काढत लोकांना पारमार्थिक क्षेत्राकडे वळवलं. हे करतांना नाथ महाराज यांनी अनेक भारुड रचली. 'sant eknath information in marathi'

      नाथ महाराजांनी "भूतदया" हि सर्वश्रेष्ठ आहे  हे जाणून प्राणी, पक्षी यांच्यावर प्रेम करावं. त्यांना मारू नये अशी विनंती तिथल्या लोकांना केली. आणि स्वतः देखील तसे वागले. त्यांनी एका गाढवाला पाणी पाजून त्याची तहान भागवली, गोदावरी नदीत पडलेला विंचू त्यांनी पाण्यातून बाहेर काढला. त्याला बाहेर काढताना त्या विंचाचे अनेक दंश त्यांनी सहन केले. गरिबाच्या मुलांना आपल्या कडेवर घेऊन त्यांनी आपला "मानवता धर्म" निभावला. त्यांना तिथल्या अनेक ग्रामस्थानी त्रासही दिला. त्यांच्यात खर क्रोध नाही का ? हे पाहण्यासाठी काही लोकं खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या कामात अडथळा आणत असतं. परंतू नाथ महाराजांनी आपल्यातील शांतता कधीचं सोडली नाही. ते समाजाच्या प्रगतीसाठी आजीवन लढत राहिले. 


संत एकनाथ महाराजांचा अंतिम काळ - Last time of Sant Eknath Maharaj

      नाथ महाराज यांनी शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्यात आपलं जिवन समर्पित केलं. खरतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ महाराजांच्या कालखंडात 250 वर्षाचा फरक जरी असला. तरी नाथ महाराजांना माऊली बद्दल अत्यंत आदर होता. एकदा तर आळंदी येथिल अजाण वृक्षाची मुळी माऊली च्या छातीजवळ येऊन ठेपली. तेंव्हा स्वतः माउलींनी नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन त्यांना आळंदी ला बोलावलं. खरतर मुळीच फक्तं निम्मित होतं. कारण माउलींना नाथ महाराजाची भेट घ्यायची होती. हे कळताच नाथ महाराज कसलाही विलंब न करता आळंदीस गेले. त्यांनी माऊलींची समाधी शोधून काढली. तसेच तिथली स्वच्छता केली. स्वतः त्या मुळीला बाजूला काढून माऊलींची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या दोघात भरपूर वेळ सवांद झाल्याचे देखील सांगितले जाते. यातूनच पूढे माऊलींच्या सांगण्यावरून नाथ महाराजांनी "ज्ञानेश्वरी" ग्रंथाचे शुध्दीकरण केले.

       नाथ महाराजांनी आपल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी आपले गुरू जनार्दन स्वामी यांचा " एका जनार्दनी" असा उल्लेख आदराने केलेला आढळतो. नाथ महाराजांचा अगदी 25 अभंगाचा हरिपाठ देखील लिहिला.'sant eknath information in marathi' तो हरिपाठ आज सर्व वैष्णव आवडीने गातात. नाथ महाराजांच्या आयुष्यात "फाल्गुन वद्य षष्ठी " या दिवसाचे महत्व आधिक होते. त्याचे कारण असे की नाथ महाराजांच्या गुरूंचा जन्म देखिल याच षष्ठी च्या तिथीला झाला होता. नाथ महाराजांच्या गुरूची भेट देखील त्यांना याच दिवशी झाली होती. त्यांना दत्त दर्शन देखिल याच फाल्गुन वद्य षष्ठी ला झाले. त्यामुळे या तिथीचे महत्व त्यांच्या जिवनात अनन्यसाधारण होतं. त्यांनी देखील स्वतः चा अंतिम दिवस याच षष्ठी ला ठरवला होता. अगदी तशी कल्पना सुद्धा त्यांनी आपल्या घरी कमावर असणाऱ्या "श्री खंड्या" ला दिल्याचं सांगीतलं जातं. असच वाळवंटात कीर्तन करत असताना आपल्या गुरूंच्या जन्म तिथिवर त्यांनी आपला देह ठेवला. नाथ महाराज इ. स. 1599 ला आपल्या जीवनाची यात्रा संपवत "पैठण" येथे समाधिस्थ झाले.

'sant eknath information in marathi'
नाथ महाराजांच्या मंदिराचे प्रवेशद्वार 

'sant eknath information in marathi'
"संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थळ"


       "पैठण" ही पूर्वी "शालिवाहन" राजाची राजधानी होती. विद्या व कला याने निपुण असणाऱ्या या शहराचा विकास करुन शालिवाहन राजाने पैठण ला जागतिक स्तरावर नेले. आज हिचं नगरी नाथांचे पैठण तसेच "दक्षिण काशी" म्हणुन ओळखली जाते. इथे अनेक प्रसिध्द वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यात श्री खंड्या चां राजन, श्री पांडुरंगाचे मंदिर, नाथ महाराजांच्या मंदिरा पुढील "पुराण खांब" "उद्धव खांब" आहे. गाढेश्वर, पिपलेश्वर ही अन्य तीर्थ आहेत. राज्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक असणारं "जायकवाडी धरण" देखील पैठण येथे आहे. 

'sant eknath information in marathi'
"जायकवाडी प्रकल्प"

यालाच "नाथ सागर" म्हणून ओळखलं जातं. फाल्गुन वद्य षष्ठी ला पैठण येथे मोठी यात्रा भरते. त्या निमित्ताने नाथ महाराजांचे मंदिर भाविक भक्तांच्या गर्दीने अगदी गजबजून जाते.  'sant eknath information in marathi'

       खरंतर नाथ महाराज यांच्यावर लिहायला गेलं तर शब्द अपुरे पडतील एवढी महान त्यांची ख्याती आहे. 'sant eknath information in marathi' पण तरी सुद्धा तोडक्या मोडक्या भाषेत महत्वाची माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मि केला आहे. ही माहिती आपल्याला नक्की आवडेल. जर आवडली तर आपल्या मित्रांना तसेच वारकरी संप्रदायातील ग्रुपला शेअर करा आणि विविध विषयावरील लेख वाचण्यासाठी अमच्या ब्लॉग साईट ला अवश्य फॉलो करा 👇

धन्यवाद 🙏


जय हरी 🚩


हे लेख सुध्दा अवश्य वाचा 👇


1. संत जनाबाई जीवनचरित्र

2. संत नामदेव जीवनचरित्र

 3. सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती

4.  गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती

5. जेजुरी गडाची संपूर्ण माहिती 



FAQ


1. संत एकनाथ महाराजांचा जन्म कधी झाला ? 

     - इ स. 1533

2. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे ?

    - " पैठण "

3. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे ?

    - गोदावरी 

4. महाराष्ट्रातील "दक्षिण काशी" म्हणून ओळखले जाणारे शहर ?

     - पैठण 

5. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

   - जायकवाडी धरण 



         





          

       

     

Post a Comment

0 Comments