आषाढी एकादशी संपूर्ण माहिती | Ashadi Ekadashi Information in Marathi | Ashadi Vari - 2023
"आषाढी एकादशी" म्हंटले की तमाम महाराष्ट्रातील लाखो विठ्ठल भक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी एकादशीचे महत्व अन्यसाधारण आहे. वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा सण-उत्सव जर कुठला असेल तर तो म्हणजे "आषाढी एकादशी" आहे. या दिवशी पंढरपुरात भाविक दर्शनासाठी अत्यंत गर्दी करतात. अवघ्या वैष्णवांचा सोहळा पंढरपुरात याचं आषाढी एकादशीला दाखल होत असतो.'ashadi ekadashi information in marathi' संपूर्ण महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यातून अनेक भाविक भक्त आपल्या छोट्या - मोठ्या दिंडीत सहभागी होत पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. यात सर्वात महत्वाचे म्हणजे आळंदी येथून माऊली ज्ञानेश्वरांची पालखी, देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठण वरून संत एकनाथ महाराजांची पालखी, शेगाव येथून गजानन बाबांची पालखी, त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ यांची पालखी, उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी अस्या भरपूर संत महात्म्यांच्या पालख्या या पंढरपुरात येतं असतात.
आषाढी एकादशी असो अथवा नियमित येणारी एकादशी असो. दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या एकादशीचे व्रत अनेक वारकरी मनोभावे करत असतात.'ashadi ekadashi information in marathi' अनेक संत महात्म्यांनी या एकादशी व्रताला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. संत तुकाराम महाराज तर एकादशी व्रत न करणं किती घातक आहे. हे सांगताना आपल्या अभंगांत लिहतात..
एकादशी व्रत सोमवार न करिती |
कोण त्यांची गती होईल नेणो ||
एकादशी व्रत जेवढे महत्वाचे तेवढंच सोमवार व्रताला देखील तुकोबारायांनी तितकंच महत्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं. एकादशी व्रत हे पुण्य प्राप्त करून देणार असून हे सर्व भाविकांनी आवर्जून करायला हवं. जे या शुद्ध एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतात त्यांना ते अन्न अगदी कुत्र्याच्या विष्टे समान आहे. हे अगदी प्रखरतेने सांगताना तुकोबाराय लिहितात..
एकादशीस अन्न पान |
जे नर करिती भोजन ||
श्वान विष्टे समान |
अधम जन ते एक ||
हे सुध्दा वाचा 👇
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा संपूर्ण इतिहास
आषाढी एकादशी - 2023 | Ashadi Ekadashi
हिंदू दिनर्शिकेप्रमाणे संपूर्ण वर्षभरात 24 एकादशी येतं असतात. जर अधिक मास असेल तर यात 2 एकदाशी ची वाढ होते. यावर्षी अधिक मास आल्याने 24 एकादशी ऐवजी 26 एकादशी आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतं असतात.'ashadi ekadashi information in marathi' एक शुद्ध तिथीला व दुसरी वद्य तिथीला अगदी तसेच आषाढ महिन्यात सुद्धा दोन एकादशी येतं असतात. आषाढ शुद्ध अन् आषाढ वद्य एकादशी. आषाढी शुद्ध एकादशीला अत्यंत महत्व दिलं जातं. या दिवशी पंढरपुरात खूप मोठी यात्रा भरते. आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला चं आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, पद्म एकादशी ई. नावाने ओळखले जाते.
यावर्षीची आषाढी एकादशी दिनांक 29 जून 2023 वार गुरुवार या शुक्ल वद्य तिथीला येत असून तिचा प्रारंभ हा हिंदू पांचागा नुसार 29 जून ला सकाळी 3 वाजून 18 मिनिटांनी होत आहे. तसेच एकादशी चा कालावधी 30 जून 2023 ला सकाळी 2 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होणारं आहे. चंद्रमा आधारित प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष असो अथवा कृष्ण पक्ष यां दोन्ही पक्षातील 11 व्या तिथीस एकादशी येतं असते. या काल चक्रातील फरकामुळे तिथि ची वृध्दी झाली असता 'ashadi ekadashi information in marathi' स्मारत एकादशी व भागवत एकादशी आशे दोन भेद सांगितले जातात. अनेकदा या दोन्ही एकादशी एकाच पक्षात लागोपाठ येतात. त्यामुळे पहिल्यांदा येणाऱ्या एकादशी ला नाव असते भागवत एकादशी ला नाव दिलेलं नसतं. तसेच अधिक मास असेल तर अजून 2 एकादशी वाढतात.
आषाढी एकादशी कथा - Story of Ashadi Ekadashi
जेंव्हा भगवान श्री कृष्ण आणि पांडव यांच्यात वार्तालाप चालू असताना धर्मराज युधिष्ठिराने देवाला एक प्रश्न केला. की हे भगवंता या आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी व्रताची संपूर्ण माहिती सांगाल का ? हा प्रश्न एकुण भगवान श्री कृष्ण म्हणाले हे धर्मराज या आषाढी एकादशी ची कथा ब्रम्ह देवाने देवर्षी नारद मुनीला सांगितली होती, तीच कथा आता मी तुला सांगतो असं म्हणत श्रीकृष्ण सांगायला लागले ...
पूर्वी ब्रम्ह देवाला श्री नारदाने हाच प्रश्न विचारला असता ब्रम्ह देव नारदाला आषाढी एकादशी ची पूर्व कथा सांगायला लागले. ती कथा आता मी तुला सांगत आहे, तु लक्ष देऊन ऐक...
पूर्वीच्या काळात "माद्धांत" नावाचा सूर्यवंशी कुळातील बुद्धिवान राजा होता. तो अतिशय लोकं कल्याणकारी असून दयावान होता. त्याच्या राज्यात सर्व जनता अतीशय सुखी होती. तो राजा तिथल्या रयतेची काळजी आपल्या पोटच्या पोरा प्रमाणे घेतं असे. त्या नगरीत अन्न धान्याच्या अजीबात तुटवडा नव्हता. प्रचंड प्रमाणात धान्यसाठा असायचा त्यामुळें राजा दानशूर होता. जी काही धन दौलत राजाकडे होती, ती सर्व उत्कृष्ठ व्यवहार करुन कामवाली होती. त्यामुळे राजा कुणावर अन्याय करत नसल्याने या नगरीतील सर्व रयत सूखी होती.
परंतू काही वर्ष आनंदात गेल्यावर एक दिवस राजाला दुःख प्राप्त झाले. त्याच्या नगरात जवळपास 2 ते 3 वर्ष पाऊस आला नाही. त्यामुळे राज्यांतील सर्व अन्न कोठार संपून गेले. त्यामुळे राजाला आपल्या रयतेची काळजी घेणे कठीण झाले. पाउस न येण्याचे कारण म्हणजे मेघ राजाची अवकृपा असावी. आपल्या हातून काहीतरी पातक घडले असावे असं राजाला मनोमन वाटू लागले. नगरातील काही तज्ञ मंडळी राजास विनंती करु लागले की महाराज यावरती काही तरी उपाय करा. यावर काय उपाय करावा हे राजास सुचत नसल्याने आपले काही सहकारी सोबतीला घेऊन राजा वनामध्ये गेला. तिथल्या काही ऋषी मुनिला राजाने भेट दिली. तेंव्हा राजाशी गाठ "अंगिरा ऋषी" सोबत पडली. हे ऋषी अत्यंत तेजोमय असून ब्रम्ह देवाचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे, राजाने ऋषींना मनोभावें वंदन करून आपली व्यथा सांगीतली.
व्यथित झालेल्या राजाकडे पाहून अंगीरा ऋषींनी राजाला एक व्रत सांगितले. ते व्रत म्हणजे "आषाढी एकादशी" होय. ते म्हणाले हे राजन आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशी चे व्रत तू मनोभावे कर. या व्रताच्या प्रभावाने तूझ्या राज्यांतील दुष्काळ दुर होउन तिथे घनघोर पाऊस पडेल. हे व्रत अत्यंत महत्त्वपूर्ण असून या युगात फळ देणारे आहे. तू हे व्रत सर्व प्रजेसहित करावे अशी माझी ईच्छा आहे. हे ऋषींचे बोलणे एकुण राजाने त्यांच्या बोलण्यास होकार दिला आणि पुन्हा एकदा ऋषींना आदरपूर्वक नमस्कार केला व त्यांचा आशिर्वाद घेऊन राजा आपल्या नगराकडे निघाला.
काही दिवसांनी आषाढ महिना लागला, ऋषींनी सांगितल्या प्रमाणे राजाने आपल्या सर्व प्रजेला सूचना करून आपल्या सर्व कुटुंबातील सदस्या सहीत हे व्रत मनोभावे केले. राजाने या आषाढी एकादशी च्या दिवशी दिवसभर उपवास केला. या व्रताच्या प्रभावाने संपूर्ण नगरित मेघ दाटून आले. आणि प्रचंड प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे नगरीतील प्रत्येक घरातील शेतकरी सुखावला. त्याची सर्व राने हिरवीगार झाली. ही खरी भगवंताची कृपा राजावर झाली होती. त्यामुळे राजा प्रत्येक आषाढी एकादशी ला उत्सव साजरा करु लागला. अनेक दीन लोकांना दानधर्म करू लागला. या व्रताच्या प्रभावाने तो पूर्ण सुखी झाला. तेंव्हा पासून या युगात आषाढी एकादशी ला महत्वाचे स्थान आहे.
आषाढी एकादशीचे महत्व - Significance of Ashadhi Ekadashi
याचं आषाढी एकादशीला चातुर्मास आरंभ होतो. हिंदू धर्मातील पंचागा नुसार आषाढ शुद्ध एकादशीला चातुर्मास प्रारंभ होऊन कार्तिक शुध्द एकादशीला चातुर्मासाचे चार महिने पूर्ण होतात. या आषाढी एकादशी पासून जवळपास चार महिने श्री विष्णू निद्रा अवस्थेत असतात असं देखील सांगितल जातं. त्यामुळे या चातुर्मासात अनेक शुभ कार्य वर्ज्य मानले जातात. अनेक धार्मिक ग्रंथ वाचन तसेच देव - देवतांची मनोभावे पूजा केली जाते. काही दिवसांनी येणाऱ्या कार्तिक प्रबोधनी एकादशीला भगवंत जागे होतात. त्यामुळें भगवंताचा निद्रा काळ म्हणजे "चातुर्मास" होय. या काळात भगवान श्री विष्णूची पूजा केली जाते.
पंढरपुरात चातुर्मासात काळात भाविकांची प्रचंड गर्दी होते. काही भाविक तर अखंड चातुर्मास काळात पंढरपुरात आपलं वास्तव्य करतात. नियमित रुपाने चंद्रभागेचे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतात. जवळपास चार महिने मोठ्या उत्साहात काकडा आरती सुद्धा नियमित रुपाने होतें. "आषाढी वारी" आणि "कार्तिक वारीला" भाविक भक्त आपल्या दर्शना करिता येत असतात, या भक्तांच्या भेटीची ओढ देखील भगवंताला लागलेली असते. यांचं वर्णन करताना संत नामदेव आपल्या अभंगात लिहितात..
आषाढी कार्तिकी विसरू नका मज |
सांगतसे गूज पांडुरंग ||
आषाढी एकादशी बद्दल जी काही माहिती उपलब्ध झाली. ती या लेखातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हि माहिती जर आपल्याला आवडली तर सर्व विठ्ठल भक्तांना शेअर करायला विसरु नका 🚩🙏
जय हरी 🚩
हे लेख सुद्धा अवश्य वाचा 👇
1) संत नामदेव महाराजांचं जीवनचरित्र
2) संत एकनाथ महाराजांचे जीवनचरित्र
3) जेजुरी गडाची संपूर्ण माहिती
4) सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती
0 Comments