संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती | Sant Namdev Information in Marathi

संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती | Sant Namdev Information in Marathi

'sant namdev information in marathi'
'sant namdev information in marathi'


      "नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी"  हा खरा प्रबोधनाचा विचार आपल्या मनात घेऊन आपलं उभं आयुष्य ज्यांनी "भागवत धर्माची" पताका अवघ्या भारत देशात झळकावली. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. 'sant namdev information in marathi'


संत नामदेव महाराज यांचं बालपण - Childhood of Sant Namdev Maharaj 

 
      संत नामदेव महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील "नरसी" (नरसी-नामदेव)  या गावी झाला. संत नामदेव महाराजाचा जन्म इ. स. 1270 मध्ये कार्तिक शुध्द एकादशीला, रोहिणी नक्षत्रावर 'रविवारी' दिनांक 26 ऑक्टोबर 1270 ला झाल्याचं सांगितलं जातं. 'sant namdev information in marathi'  "नरसी - बामणी" जरी त्यांचं जन्मगाव असलं तरीही त्यांचं संपूर्ण बालपण हे पंढरपुरात गेलं. बालपणी पासून त्यांना कविता रचण्याची आवड होती. सतत पांडुरंगाच्या भक्तित दंगुन जाणं त्यांना खूप आवडायचं  त्यांच मूळ नाव श्री. "नामदेव दामा रेळेकर" असं होतं. त्यांचे वडील "दामाजी" हे पेशाने शिंपी होते. ते कपडे शीवण्याचा व्यवसाय करत. त्यांच्या आईचे नाव "गोणाई" पत्नी राजाई , मोठी बहीण आऊ बाई तसेच त्यांचे चार मुलं नारा, महादा, गोदा, विठा व एक मुलगी लिंबाई   असे नामदेवांचे कुटुंब होते. स्वतःला "नामयाची जनी" म्हणून संबोधित करणाऱ्या "संत जनाबाई" देखील त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग होत्या. संत जनाबाई यांच्या सहित संत नामदेवांच्या कुटुंबात एकुण 15 सदस्य होतें.

     संत नामदेव महाराज हे बालपणी अत्यंत निरागस होते. त्यांची निस्वार्थी भक्ति पाहून देव सुद्धा थक्क व्हायचे. एकदा तर नामदेवांच्या वडिलांनी त्यांना मंदीरात जाऊन देवाला नैवद्य ठेवायला सांगितला. वडिलांच्या सूचनेप्रमाणे ते मंदिरात गेले आणि देव नैवद्य कधी ग्रहण करतो याची वाट पाहत मंदिरातच बसले. लहानग्या नामदेवांचा हा भाबडेपणा पाहून चक्क देवाने प्रगट होऊन तो नैवद्य स्वतः सेवन केला. 'sant namdev information in marathi'  त्यांच्यातील भाबडेपणाचे अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एकदा त्यांच्या जवळील पोळी एका कुत्र्याने हिसकून पळवली. तर ती कोरडी पोळी त्याला खायला चांगली लागणार नाही. असं म्हणून स्वतः संत नामदेव महाराज त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळत सुटले.

   संत नामदेव हे अनेक ग्रंथाचे अभ्यासक होते. त्यांनी लीहलेल्या साहित्यातून त्यांचा अध्यात्म क्षेत्रातील अनेक विषयांचा अभ्यास असल्याचं स्पष्ट होतं. त्यांच्या कीर्तनाच्या मांडणीत देखील मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक ज्ञान सांगतील जायचं यावरून ते एक उत्तम "तत्वज्ञ" असल्याचं दिसून येतं. संत नामदेव महाराज यांना संत संप्रदायाची अत्यंत आवड होती. संत ज्ञानेश्वर महाराजांना पुजस्थानी ठेउन त्यांनी लीहलेली " ज्ञानेश्वरी " देखील स्वतः अनुभवली. 

संत नामदेव महाराज आपल्या एका अभंगात लिहितात.. 

"नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी,

  एक तरी ओवी अनुभवावी "

 

संत नामदेव महाराज यांचे जीवनकार्य -Life work of Sant Namdev Maharaj 

 
       संत नामदेव महाराज एक उत्कृष्ठ रचनाकार तसेच उत्तम कवी होते. त्यांना विवध भाषेतील ज्ञान असल्याने त्यांनी व्रज भाषेत सुद्धा काव्य रचली. त्यांचे अनेक अभंग शिखांच्या "गुरु ग्रंथ साहिब" या ग्रंथात देखील आहेत. त्यांचे हिंदी भाषेवर सुद्धा कमालीचे प्रभुत्त्व होते. त्यांनी "भगवत धर्माचा" प्रसार अनेक राज्यात केला. संत नामदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन होते.  आपल्या कीर्तनातून प्रत्यक्ष पांडुरंगाला नाचायला लावणारी अशी त्यांची ओळख होती. 'sant namdev information in marathi' 

संत जनाबाई देखील आपल्या अभंगात लिहितात..


      "नामदेव किर्तन करी, पूढे देव नाचे पांडूरंग"

      एकदा संत गोरोबा काकांच्या "तेर ढोकी" या गावी सर्व संत मंडळी जमली असता संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, मुक्ताबाई , संत नामदेव, चोखामेळा इ. संत होते. यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विनंतीस मान देउन संत गोरोबा काकांनी सर्व संताच्या अध्यात्मिक तयारी विषयी विचारपूस केली. तेंव्हा प्रत्येकाने आप- आपले मत व्यक्त केले. याच बैठकी नंतर संत नामदेवांना "विसोबा खेचर" हे गुरू प्राप्त झाले. 'sant namdev information in marathi' 


     संत नामदेव महाराज यांचा अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यास प्रचंड असल्याने त्यांचं "किर्तन" हे अधिक उठून दिसत असे. आपल्या कीर्तनातून त्यांनी संपूर्ण जगभर ज्ञानाचे दीप लावण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. हे करतांना त्यांना अनेक लोकांनी विरोध केला तर अनेकांनी त्रासही दिला. परंतू न डगमगता त्यांनी आपलं कार्य चालूच ठेवलं. त्यांच्या बद्दल काही आख्यायिका आहेत. त्यापैकी एक अशी की एकदा श्री क्षेत्र "औंढा नागनाथ" येथे सर्व भाविक लोकांनी मिळून त्यांचं किर्तन "औंढा नागनाथ" मंदिरात ठेवलं. परंतू तिथल्या काही पुजाऱ्यानी या कीर्तनाला विरोध केला. आणि या मंदिराच्या मागे जावून किर्तन करा अशी सूचना दिली. जेंव्हा नामदेव महाराज मंदिराच्या समोर किर्तन न करता मंदिराच्या मागे किर्तन करायला लागले. तेंव्हा कीर्तनात चमत्कार झाला आणि "औंढा नागनाथ" मंदीर हे पूर्वाभिमुख न राहता पश्चिमेस फिरले. हे त्या काळी झालेला चमत्कार काही साधा नव्हता. या प्रसंगाचं वर्णन करतांना संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात लिहितात...

           फिरविले देऊळ जगामाजी ख्याती |
             नामदेवा हाती दूध प्याला ||

'sant namdev information in marathi'
औंढा नागनाथ मंदीर 

      अशाप्रकारे अनेक चमत्कार नामदेवांच्या काळात घडले. संत नामदेव आणि भगवान पांडुरंग परमात्मा यांच्यात अत्यंत जिव्हाळा होता हे त्यांच्या साहित्यातून दिसून येते. संत नामदेवांच्या गाथा पुस्तकातील जवळपास 2500 अभंग रचना प्रसिध्द आहेत. त्यांच्या विवध भाषेतील अन्य काही अभंग रचना आहेत. शिखांच्या "गुरु ग्रंथ साहिब" या ग्रंथात संत नामदेव लिखित जवळपास 62 अभंग रचना आजही उपलब्ध आहेत. संत नामदेव महाराजांनी आदी, समाधी आणि तीर्थावळी या ग्रंथातील काही अध्यायात श्री संत "ज्ञानेश्वरांचे चरित्र" वर्णिले आहे.


       संत ज्ञानेश्वर महाराज समाधिस्त झाल्यानंतर तब्बल 50 वर्ष संत नामदेव महाराजांनी "भागवत धर्माची" पताका आपल्या खांद्यावर घेऊन भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून काम केले. त्यांनी अनेक राज्यात भागवत धर्माचा प्रसार केला. त्या काळात लोकांच्या भावना जाणून घेत परिवर्तन करण अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन "पंजाब" पर्यंत त्यांनी भागवत धर्म तिथल्या जनमानसात रुजवला. आजही पंजाब मधील शिख बांधव त्यांना आपलस मानून " नामदेव बाबा " म्हणुन अतिशय प्रेमाने त्यांचे भजन गातात.
 'sant namdev information in marathi'  पंजाब मधील कीर्तनाची पद्धत वेगळी असून आपल्या वारकरी संप्रदायातील कीर्तनात आणि पंजाब मधील कीर्तनात विलक्षण साम्य दिसून येतं. संत नामदेव महाराजांनी पंजाब सारख्या ठिकाणी आपल्या कीर्तनातून जनजागृती केली. त्याकाळी पंजाब मध्ये देखील त्यांचे काही शिष्य बनले होते. पंजाब मधील "घुमान" येथे तर राजस्थान मध्ये सुध्दा शिख बांधवांनी संत नामदेव महाराजांची भव्य मंदीर देखील उभारली आहेत.

संत नामदेव महाराजांचा मृत्यू -Death of Sant Namdev Maharaj

 
     संत नामदेव महाराज यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासात जवळपास 1 कोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केला होता. त्यातील बऱ्याच रचना आजही साहित्यात उपलब्ध आहेत. त्यांच्यातील विद्वत्ता हि अंत्यंत महान होती. 'sant namdev information in marathi'  म्हणूनचं त्यांना "संत शिरोमणी" ही उच्च पदवी दीली जाते. उभ आयुष्य पांडुरंगाची भक्ती करत असताना भागवत धर्माचा प्रसार व्हावा म्हणुन अवघी भारत भूमि ज्यांनी पायाखाली घातली अशे महान संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी आषाढ वद्य त्रयोदशीला, शके 1272 मध्ये दिनांक 3 जुलै 1350 वार शनिवार या दिवशी आपला देह पांडुरंगा चरणी ठेवत ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या जन्म व मृत्यूच्या तारखा बद्दल तज्ञांची वेग- वेगळी मतं आहेत. 'sant namdev information in marathi' 

    संत नामदेव महाराज यांना वारकरी संप्रदायातील लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा होता. माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडावी म्हणून त्यांनी अगोदरच तसा निर्देश केला होता. तो असा की विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वारी माझी समाधी असावी. अणि तिथल्या भाविकांनी अगदी त्यांच्या मताप्रमाणे त्यांची समाधी बांधली. ती आजही " नामदेव पायरी " म्हणून ओळखली जाते. आजही मोठया आनंदाने नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भाविक पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त गर्दी करतात.

'sant namdev information in marathi'
" नामदेव पायरी "
श्री क्षेत्र पंढरपूर 

     संत नामदेव महाराजांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेली ओळख त्यांना आयुष्यभर कामी आली. 'sant namdev information in marathi'  संत नामदेवांना एकुण 80 वर्ष आयुष्य लाभलं. त्यातला बहुतांश काळ त्यांनी समाजासाठी दिला. त्यामुळे शिख धर्मातील लोक देखील त्यांना महत्वाचं स्थान देतात. आज त्यांच्या जन्मगावी विकास व्हावा म्हणून पंजाब तसेच अन्य राज्यांतील शीख बांधव धडपड करत आहेत. पहिले "नरसी- बामणी"  या नावाने ओळखले जाणारे त्यांचे मूळ गाव आज "नरसी -नामदेव" म्हणून ओळखले जाते. 2018 ते 2022 दरम्यान मंदिराचे नवीन बांधकाम करुन जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आता "नरसी"  तेथे सुंदर असं नामदेव महाराजांचं मंदिर उभारले असून "नरसी" येथे भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. श्री क्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी करुन आल्यावर बरेच भाविक मंडळी नर्सी नामदेवांच्या दर्शनाला दरवर्षी न चुकता येतात.

   • संत नामदेव महाराज यांचे नरसी येथिल मंदिर

'sant namdev information in marathi'
" नरसी येथिल संत नामदेव महाराज मंदिर "


      हिंगोली पासून अवघ्या 31 किलोमिटर अंतरावर असणार संत नामदेव महाराजांचं जन्मगाव हे "नरसी - नामदेव" या नावाने ओळखले जाते. इथे नामदेव महाराजांचं जून घर आहे. असं देखील सांगितल जातं. इथे एकादशी निमित्त यात्रा भरते. अनेक प्रसादाची व तुळशीच्या माळा असणारी छोटी - छोटी दुकान इथे आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर अशी मंदिराची रचना केलेली असुन मंदीरात सायंकाळी नियमित रुपाने हरिपाठ व पहाटे 4 ला काकडा आरती केली जाते. प्रत्येक वारकऱ्यांनी "श्री क्षेत्र नरसी नामदेव" इथे अवश्य भेट द्यावी व संत नामदेवांचे दर्शन घ्यावे. तिथूनच अगदी जवळ महाराष्ट्रतील पाच ज्योतिर्लिंगांपैकी "औंढा नागनाथ" हे एक ज्योतिर्लिंग अवघ्या 35 km अंतरावर आहे. ईथेच संत नामदेव महाराजांनी "विसोबा खेचर" यांना आपले अध्यात्मिक गुरू केलें.
      संत नामदेव महाराज यांच्यावर अनेक लेखक लोकांनी साहित्य लिहलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कार्याची यशोगाथा सांगायची झाली तर शब्द अपुरे पडतील एवढी महान व्यक्ती म्हणजे संत नामदेव महाराज.
 'sant namdev information in marathi'  खरतर संत नामदेव महाराज यांच्यावर आधारित मी जी काही माहिती लिहिली आहे. हि सर्व बरोबरच आहे, असा माझा बिलकुल दावा नाही. परंतू बऱ्याच प्रयत्नातून ही माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही चुकीचे असल्यास आपण ते कॉमेंट बॉक्स मध्ये कळवावे. आपल्याकडे संत नामदेव महाराज यांच्या बद्दल अजून काही महिती असेल तर नक्की कळवा. आम्ही या लेखात नक्की बद्दल करू. जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहचवा. आणि पेजला स्क्रोल करुन खाली असणाऱ्या आमच्या या ब्लॉग साईट ला अवश्य फॉलो करा.

धन्यवाद 🙏


      
• संत तुकाराम महाराज यांच्या काही निवडक अभांगवर आधारित सविस्तर चिंतन इथे अवश्य वाचावे 👇

     1. भक्त ऐसे जाणा जे देहि उदास ( सविस्तर अर्थ )


     2. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ( सविस्तर अर्थ )

'sant namdev information in marathi'
"भगवान पांडुरंग परमात्मा"



हे सुध्दा वाचा 👇

1) जेजुरी गड संपुर्ण माहिती


2) सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती


3) गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती


राम कृष्ण हरी 🙏🚩


FAQ 

1. संत नामदेव महाराज यांचा जन्म कधी झाला ?

    - संत नामदेव महाराजाचा जन्म इ. स. 1270 मध्ये कार्तिक शुध्द एकादशीला, रोहिणी नक्षत्रावर 'रविवारी' दिनांक 26 ऑक्टोबर 1270 ला झाला.   

Post a Comment

0 Comments