आषाढी वारी - 2023 | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान | आळंदी ते पंढरपूर वेळापत्रक जाहीर | संपूर्ण माहिती | Ashadi Wari -2023
![]() |
'Ashadi Wari - 2023' |
वर्षानुवर्ष चालत आलेला हा अनोखा सोहळा वारकऱ्यांसाठी खरा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. येथे प्रत्येक जाती - धर्माच्या लोकांची गर्दी पाहायला मिळते. असा हा सर्व जाती धर्मियांना सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहे.
सकळांशी येथे आहे अधिकार |
कलयुगी उद्धार हरीच्या नामे ||
या पवित्र वारकरी संप्रदायात सर्वांना सारखाच अधिकार आहे हे तुकाराम महाराजांनी आपल्या अनेक अभंगात सांगितलं आहे.
'Ashadi Wari Information in Marathi'
• संत तुकाराम महाराज यांचे अर्थासहित काही अभंग 👇
• आषाढी वारी इतिहास - History of Ashadi Wari
आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण भागात अनेक गावातून वारकरी दिंडी करुन पंढरपूरला निघतात. किंवा माऊलीच्या पालखी सोहळ्यात जातात. हे सर्व वारकरी पंढरपुरला दरवर्षी न चुकता जातात यालाच 'वारी' असं म्हंटल जातं.
या वारीचा इतिहास फार जुना असून जवळपास तेराव्या शतकापासून वारीची परंपरा अखंड चालू असल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर नव्हें तर त्यांच्याही अगोदर त्यांचें वडिल विठ्ठलपंत हेही वारीला पायी जात असत असा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, मलप्पा वासकर या सर्व महात्म्यांनी भगवत धर्माची पताका खांद्यावर घेत अनेक वर्ष वारी केली. संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबात वारीची जुनी परंपरा होती. हे स्पष्ट करतांना ते लिहितात..'Ashadi Wari Information in Marathi'
हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी।।
• वारकरी -
'वारकरी' म्हंटल की अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मूळात 'वारी' या शब्दापासून ' वारकरी ' हा शब्द अस्तित्वात आला असावा. कारण पांडुरंगाची वारी करणारा प्रत्येक माणूस हा वारकरी. माणसा माणसात कसलाही भेदा - भेद न बाळगणारा वैष्णव म्हणजे वारकरी. नियमित रूपाने ज्ञानेश्वरी ,भागवत, गाथा या सर्व ग्रंथाचं पारायण करणारा एक वारकरी च असू शकतो. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात ते लिहितात.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥
कसलाही भेद न बाळगता प्रत्येकाला प्रेमाने माऊली - माऊली अशी हाक मारत आनंदाने पायी चालत राहायचं यापेक्षा मोठ सुखं ते काय? 'Ashadi Wari Information in Marathi'
• संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा - Sant Dnyaneshwar Palakhi Sohala
या अनोख्या पालखी सोहळ्याची सुरुवात करण्याचं संपूर्ण योगदान आदरणीय श्री हैबत बाबांचं. ते गावचे देशमुख तसेच कर्तबगार सरदार होतें. त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं आरफळ ते एकदा गावाकडे निघाले असता काही भिल्लानी त्यांच्या जवळील सर्व पैसा अडका लुटून घेउन त्यांना आणि त्यांच्या सोबतीला असणाऱ्यांना एका गुहा घरात कोंडून टाकले. परंतु बाबाच्या तोंडुन देवाचं नाम अखंड चालू होतं. ते मुखाने माऊलीचा हरिपाठ म्हणत होते. तेवढ्यात त्या भिल्लांच्या राजाला पूत्र झाला तो अत्यंत आनंदी झाला. त्याने बाबांना आणि त्यांच्या समवेत असणाऱ्यांना सोडून दिलं तसेच त्यांना मानसन्मान सुद्धा दिला हि सर्व माऊलीची कृपा हे जाणून ते तिथून घरी गेलेच नाही आणि त्यांनी सदैव आळंदीला राहुन माऊलीची आजीवन भक्ती केली. त्यांनी माऊलीच्या अनेक दिंड्या सोबत घेउन भजन म्हणत त्यांच्या पादुका रथातून पंढरपूर कडे नेण्याची परंपरा चालु केली. ती आजपर्यंत मोठया आनंदाने जपली जाते. पूर्वी माऊलीच्या पालखी सोहळ्यात हत्ती, घोडे, लवाजमा माननीय राजे ' औंध ' यांच्या तर्फे येतं असे. पेशवे सरकार देखिल मदत करत असे. काही दिवसांनी या खर्चाची तरतूद कंपनी सरकारचा अमल चालु झाल्यामुळे त्यांच्याकडून होत असे. या सर्व गोष्टींची देखरेख करण्यासाठी सरकारने एक कमिटी देखिल स्थापन केली होती.'Ashadi Wari Information in Marathi'
या सोहळ्यात अनेक दिंड्याचा समावेश असतो. त्यातील काही दींड्या मानाच्या असतात. हा पालखी रथ ओढण्यासाठी दोन खिल्लार बैलांची जोडी असते. माउली च्या पालखीला बैलगाडी देण्याचा मान आळंदीतील ठराविक कुटुंबांना च मिळतो. रथा समोरील दिंडी क्रमांक 1 ते 7 पर्यंत आदरणीय वै. गुरुवर्य तात्यासाहेब आबासाहेब वासकर महाराज यांचा मान असतो. पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसांचा प्रवास जरी असला तरी परतीचा प्रवास हा कमी दिवसांचा म्हणजे जवळपास निम्म्या दिवसांचाच असतो. ज्या दोन खिल्लार बैलाचा मान जातानाचा तोच मान त्यांना परत येतानाही असतो.
• पालखी मार्गावरील विवध उपक्रम -
पालखी वाटेवरील गावातील अनेक दानशूर भाविक मंडळी अन्नदान, आरोग्य विषयक सुविधा , पाण्याची सुविधा, वस्त्र दान या गोष्टींची पूर्वणुक करतांना दिसतात. अनेक वैद्यकीय सामाजिक संस्था वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा करत असताना मोफत औषधं गोळ्या पूर्वण्याच काम निस्वार्थी भावनेने ते करत असतात. पालखी मार्गाची स्वच्छता आणि सुव्यवस्था शासनाकडून योग्य पद्धतीने केली जाते. शासनाकडून मोफत असे अनेक उपक्रम राबवले जातात. साहित्य क्षेत्रात देखील अनेक लेखकांनी वारीचं वर्णन करणारी अनेक पुस्तकं लीहली आहेत.'Ashadi Wari Information in Marathi' आषाढी वारीवर आधारित अनेक मराठी चित्रपट देखील आहेत.
पालखी वाटेवर मुक्कामाच्या ठिकाणी अनेक दिग्गज महाराज मंडळींचे किर्तंन होत असतात तर अनेक भागातून आलेल्या गायक, भजनी मंडळींचे भजन सुद्धा मोठया जलोषात होत असते.
• श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा संपूर्ण वेळापत्रक - Seduls of sant Dnyaneshwar Palakhi Sohala - 2023
ज्येष्ठ वैद्य. रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी दुपारी 4 ला माऊलीच्या मंदिरातील परिसरातून पालखी प्रस्थान करणार आहे. त्या रात्रीचा मुक्काम दर्शन मंडप आळंदी संस्थान (गांधी वाडा) इथे असणार आहे. 'Ashadi Wari Information in Marathi'
• श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम •
• दिनांक 12 जून 2023 - आळंदी येथून निघून वाटेत थोरल्या पादुकांची आरती होणार असून सकाळचा विसावा भोसरी फाटा इथे असणार आहे. दुपारचे भोजन फुलेनगर येथे करून विसावा संगमवाडी इथे असेल. पालखी विठोबा मंदीर (भवानी पेठ पुणे) रात्रीचा मुक्काम. दिनांक 13 जून ला देखील पालखी पुण्यातच मुक्कामी असेल.
• दिनांक 14 जून 2023 - पुणे येथून निघून सकाळचा विसावा व आरती शिंदे छत्री इथे असणार आहे. दुपारी हडपसर अन् रात्री सासवड येथे मुक्काम. दुसऱ्या दिवशी 15 जून ला सुद्धा पालखी सासवड इथेच असेल.
• दिनांक 16 जून 2023 - सासवड येथून निघून बोरावके मळ्यात सकाळचा विसावा घेऊन यमाई शिवरी येथे दुपारचे भोजन करून दुपारचा विसावा साकुर्दे येथे घेऊन रात्रीचा मुक्काम जेजुरी गडावर असणार आहे.17 जून ला खंडोबा चे दर्शन घेऊन वाल्हा येथे दुपार आणि मुक्काम असेल.
• दिनांक 18 जून 2023 - सकाळी वाल्हे येथून निघून दुपारी निरा नदी येथे श्रींचे स्नान असते. रात्रीला लोणंद येथे मुक्काम. तसेच दुसऱ्या दिवशीचा मुक्काम देखील इथेच असेल.
• दिनांक 20 जून 2023 - दुपारी लोणंद येथे भोजन करून दुपारचा विसावा जवळचं असणारा चांदोबाचा लिंब इथेच पालखीचे पहिले उभे रिंगण असते. तिथून पुढे तरडगाव इथे रात्रीचा मुक्काम केला जातो.
• दिनांक 21 जुन 2023 - या दिवशी सकाळी तरडगाव येथुन निघून काळज येथिल दत्त दर्शन घेतलें जाते. पूढे निंभोरे ओढा इथे भोजन अन् वडजल येथे विसावा आणि रात्रीचा मुक्काम फलटण येथील विमानतळावर असेल. 22 जून चा मुक्काम निंबळन फाट्यावर विसावा घेउन बरड येथे असतो.
• दिनांक 23 जून 2023 - बरड येथुन पूढे जातं साधुबुवाचा ओढा येथे थोडासा विसावा घेउन दुपारी धर्मपुरी कॅनॉल ला भोजन करून सिंगणापुर फाट्यावर दुपारचा विसावा घेउन रात्रीचा मुक्काम नातेपुते येथे असेल.
• दिनांक 24 जून 2023 - ला नातेपुते येथून निघून दुपारचे भोजन मांडवी ओढा इथे. तर दुपारचा वीसावा आणि पहिलं गोल रिंगण पुरंडवडे इथे असते. रात्रीचा मुक्काम माळशिरस इथे असेल. 25 जून ला माळशिरस वरून निघत दुसरं गोल रिंगण खडुस फाटा ईथे असतं. तसेच रात्रीचा मुक्काम वेळापूर ला असेल.
• दिनांक 26 जून 2023 - सकाळी वेळापूर येथून निघाल्यावर काही अंतरावरच ठाकूर बुवाची समाधी असून तिसरं गोल रिंगण इथेच असतं. तोंडले - बोंडले इथे दुपारचं जेवण करून वाटेतच सोपान देवाच्या भेटीचं ठिकाण आहे. तिथून समोर भेंडी शेगाव इथे पालखीचा मुक्काम असतो.
• दिनांक 27 जून 2023 - सकाळी भेंडी शेगाव येथून निघून दुपार ही बाजिरावच्या विहिरीवर असते. इथेच दूसर उभं रिंगण आणि चौथ गोल रिंगण असतं. रात्रीचा म्हणजे शेवटचा मुक्काम वाखरी येथे असतो. दिनांक 28 जून ला श्रींच्या पादुकांची आरती आणि तिसरं उभ रिंगण होऊन पंढरपुरात दाखल होणार .
• दिनांक 29 जून 2023 या दिवशी संपूर्ण नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागेचे स्नान केलं जातं. एकूण 5 दिवस पालखीचं वास्तव्य पंढरपुरात असतं. नंतर दिनांक 3 जुलै 2023 ला श्रींचे चंद्रभागेत स्नान तसेच विठ्ठल रुक्मिणी भेट आणि गोपाळपूर येथे काला. नंतर पादुका जवळ विसावा घेऊन परत रात्रीचा मुक्काम वाखरी येथे करत परतीचा प्रवास होतो.'Ashadi Wari Information in Marathi'
• श्री विठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा -
आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सहपत्निक पांडुरंगाची महापूजा करतात. त्यांच्या सोबत पुजेचा मान एका शेतकरी कुटुंबातील जोडप्याचा देखिल असतो.
या श्री संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. याबद्दल बरीच माहिती लीहण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे अजून काही माहिती असेल तर नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद 🙏
रामकृष्ण हरी 🙏🚩
FAQ
1) संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहली ?
- नेवासे (अहमदनगर)
2) ज्ञानेश्वरांनी कोणत्या वयात समाधी घेतली ?
- वयाच्या 21 व्यां वर्षी
0 Comments