संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण माहिती | Sant Dnyaneshwar Maharaj Information in Marathi
![]() |
'sant dnyaneshwar information in marathi' |
ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया ||
'sant dnyaneshwar information in marathi'
या संत बहिणाबाईंच्या ओवी प्रमाणे ज्यांनी संत संप्रदायाचा मूळ पाया रचला. ज्यांनी मनोभावे पांडुरंग परमात्म्याची भक्ति केली. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्यांची वारकरी संप्रदायात ओळख निर्माण झाली. त्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आताच्या संभाजीनगर जिल्हयातील "पैठण" जवळ असणाऱ्या "अपेगाव" येथे श्रावण वद्य, कृष्ण अष्टमीला झाला. त्यांचा जन्म हा इ. स. 1275 ला जरी झाला असला तरी काही इतिहास अभ्यासकांनी त्यांचा जन्म 1271 ला झाला असल्याचं सांगितलं आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची कौटुंबिक माहिती - Family Information of Sant Dnyaneshwar Maharaj
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी तर आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी असं होतं. ते एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले.'sant dnyaneshwar information in marathi' संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सहित ते चौघे भावंडं असून सर्वात थोरले बंधू संत निवृत्तीनाथ नंतर ज्ञानदेव यांची धाकटी भावंडं सोपान, मुक्ताबाई अशी ही चार अपत्य विठ्ठलपंत कुलकर्णी यांना झाली.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण - Childhood of Sant Dnyaneshwar Maharaj
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण खरतर अत्यंत खडतर प्रवासात गेले. त्यांच्या बालपणीचा संघर्ष खरतर कुणाच्याच वाट्याला येऊ नये. गोदावरी नदी किनारी असणाऱ्या आपेगाव येथे जरी या चार भावंडांचा जन्म झाला असला तरीही ते आपेगावला जस्त काळ राहिले नाही. जेव्हां विठ्ठलपंत यांचा विवाह रुक्मिणीबाई यांच्याशी झाला तेंव्हा संसारात न रमता ते काशीला गेले. आणि तिथे जाऊन सन्यास घेतला. विठ्ठलपंत कुलकर्णी हे एक विरक्त संन्यासी होते. ते विवाहित असूनही त्यांनी संसाराचा त्याग केला हे जेंव्हा त्यांच्या गुरूच्या लक्षात आलं तेंव्हां त्यांनी विठ्ठलपंत यांना काशी येथून परत पाठवलं. विठ्ठलपंत हे नंतर तीर्थयात्रा करत असताना आळंदी येथे येऊन स्थित झाले.
परंतू त्या गावातील लोकांनी त्यांना अपिवत्र समजून त्यांना वाळीत टाकलं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक माणसाची ते हेटाळणी करू लागले. त्या सर्वांना ते हिनवू लागले. विठ्ठलपंत यांच्या सर्व मुलांची मुजं करण सुद्धा तिथल्या ब्रम्हणानी नाकारली. आपल्या कुटुंबाची हि सर्व होणारी अवहेलना बघून ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी तिथल्या धर्म शास्त्र पंडितांना यावर उपाय काय ते सांगा ? असा प्रश्न केला. परंतू त्यावर एकच उपाय तो म्हणजे तुम्हाला देहत्याग करावा लागेल, यावर शिक्षा ती एकचं ती म्हणजे देहदंड. हे एकूण आपल्या मुलांना इथल्या समाजात स्थान प्राप्त व्हायला हवं. त्यांना कुणी त्रास देऊ नये. त्यांचं भविष्य उज्ज्वल घडाव तसेच त्यांची रितीप्रमाने मूंज व्हावी असे अनेक कारणं लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई कुलकर्णी यांनी इंद्रायणी मध्ये स्वतःला झोकून देऊन आपलं आयुष्य समाप्त केले. कुठल्याही संस्करापासून आपली मुलं वंचित राहू नये हा मानस उरात बाळगून अगदी जड अंतःकरणाने त्यांनी स्वतःला संपवत देहांत प्रायश्चित केले. 'sant dnyaneshwar information in marathi'
खरतर असं बालपणी अचानक आई वडिलांचं सोडून जाणं या चारही भवंडासाठी अत्यंत मोठं दुःख होतं. पण त्या दुःखाला पर्याय नव्हता. आई वडिलांच्या देह त्यागानंतर देखिल लोकांनी त्यांना त्रास देणं सोडलं नाहीं. एका संन्याशी व्यक्तींची मुलं म्हणुन त्यांना लोकं अन्न, पाणी देखिल देत नव्हते. ते भिक्षा मागायला गेले तर लोकं घराचे दरवाजे लावून घेत असतं. त्यांच्यावर दगड, सेनाचा मारा करत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते आपली विद्वत्ता सिध्द करण्यासाठी पैठण ला गेले. त्या काळी पैठण हे न्यायपीठ होतं.
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग - Miraculous events in the life of Dnyaneshwar Maharaj
सर्व भावंडाना घेऊन माऊली पैठण मध्ये शुद्धिपत्र घेण्यासाठी आले तेंव्हा तिथल्या धर्मपीठ अधिकारी मंडळींनी त्यांचे शुद्धिपत्र नाकारले. 'sant dnyaneshwar information in marathi' त्यांच्यातील विद्वत्ता सिध्द करण्यासाठी त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. "पैठण" येथे देखिल त्यांना कुणी भिक्षा वाढली नाही. एकदा तर ज्ञानेश्वरांना मांडे खाण्याची इच्छा झाली तेंव्हा ते भाजण्यासाठी मुक्ताबाई खापर आणायला गेल्या परंतू त्यांना साधं खापर सुद्धा कुणी दिलं नाही. उलट त्यांना त्रास मात्र दीला. तेंव्हां ज्ञानेश्वरांनी मुक्तेस ते मांडे आपल्या पाठीवर भाजायला सांगितले. आणि खरचं काही वेळातच मांडे भाजले गेले. हा माऊलीने केलेला चमत्कार त्या काळात विलोभनीय होता.
तिथल्या काही पंडित लोकांनी त्यांच्या ज्ञानावर संशय घेत नियमित त्यांना हिणवलं. एकदा तर ते माउलींना म्हणाले तू म्हणतोस सर्वत्र ईश्वराचा वास आहे. मग हा इकडे येणारा रेडा वेद बोलेल का ? तेंव्हा मात्र माउलींनी शुध्द अंतकरणाने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा खरोखर आपल्या मुखातून वेद बोलायला लागला. तिथली दिग्गज व्दिज मंडळी चकित झाली. 'sant dnyaneshwar information in marathi' या प्रसंगाचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज देखील आपल्या एका अभंगात लिहितात...
रेड्यामुखीं वेद बोलविला | गर्व द्विजांचा हरविला |
शांतीरुपें प्रगटला | ज्ञानोबा माझा ||
अशे अनेक चमत्कार त्यांनी आपल्या कारकीर्दीत केलें त्यातला एक अजून चमत्कार सांगायचा झाला तर एकदा चांगदेव यांनी या चारही भावंडांची कीर्ती एकूण यांना भेटायचं ठरवलं. आणि ते भेटायला निघाले सुद्धा त्या आधी त्यांनी माउलींना पत्र पाठवले पण ते पत्र कोरेच होते. त्यामुळे निवृत्ती नाथांनी माऊलीला त्या पत्राचे उत्तर लिहायला सांगितले ते उत्तर पूढे "चांगदेव पासष्टी" म्हणुन ओळखले जाऊ लागले. जेव्हां चांगदेव वाघावर बसून माउलींना भेटायला निघाले तेंव्हां हे चारही भावंडं एका निर्जीव भिंतीवर बसले होते. परंतू माउलींनी त्या भिंतीला अज्ञा केल्याने ती सुध्दा चालायला लागली. हा सर्व चमत्कार पाहून चांगदेव महाराजांनी त्यांचें दर्शन घेतले. आणि चांगदेव यांनी मुक्ताबाई यांना आपले गुरू मानले. असे अनेक चमत्कार त्यांनी आपल्या कारकीर्दीत केलें. तेंव्हा पैठण येथिल लोकांना उशिरा का होईना हे सर्व समजलं. त्यांना वाटलं की आई वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलास का द्यावी म्हणून अनेक मंडळींच्या सांगण्यावरून पैठण येथील धर्म पीठाने इ. स. 1288 ला संत ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धिपत्र देउन आपल्या धर्मात परत घेतले. 'sant dnyaneshwar information in marathi'
संत ज्ञानेश्वर महाराज लिखित साहित्य - Literature written by Sant Dnyaneshwar Maharaj
संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांच्या गुरू स्थानी होतें. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी कमी वायात त्यांनी खूप सार साहित्य लिहल. त्यामधे गीतेवरील टीका ज्ञानेश्वरांनी सांगितली व ती सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथाला "ज्ञानेश्वरी" तसेच "भावार्थदीपिका" म्हणून संबोधलं जातं. हेचं संस्कृत भाषेतील लिखाण ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणलं. ज्ञानेश्वरी लिहिताना अपल्या मराठी भाषेचं वर्णन देखील त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. वारकरी संप्रदायात आजही सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणून "ज्ञानेश्वरी" ला आदराचे स्थान आहे. या ग्रंथात 9000 ओव्या असून 18 अध्याय आहेत. ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र नेवासा इथे लिहिला असुन तो वयाच्या 16 व्या वर्षी लिहिला. 'sant dnyaneshwar information in marathi'
चांगेवावर आधारित पासष्ट ओव्यांची चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, अप्रतीम असा एकुण 28 अभंगाचा हरिपाठ त्यांनी लिहला. यात देखील नामस्मरणाचा महिमा माउलींनी सांगितला आहे. हे सर्व साहित्य आजही आपल्याला पाहायला मिळते. सर्व वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरी, गाथा तसेच एकनाथ महाराजांचे भागवत या सर्व ग्रंथावर अवलंबून आहे. हे सर्व साहित्य एवढ्या कमी वयात लिहून माउलींनी संत नामदेव यांच्या समवेत "भागवत धर्माचा" प्रसार करत तीर्थयात्रा केल्या. संत नामदेव लिखित "तिर्थावली" मध्ये त्यांनी या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. माऊलींनी अज्ञानात वाहून जाणाऱ्या लोकांना ज्ञानाच्या प्रवाहात आणून सोडलं. त्यांच्या परोपकारी भावनेतून लोकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या काळात केला. वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराजांना "माऊली" या नावाने संबोधले जाते. आजही त्यांच्या नावाने अवघी अलंकापुरी दुमदुमली जाते. आषाढी वारीचा आनंद घेण्यासाठी भाविक मंडळी इथल्या सोहळ्यात सहभागी होत असतात. 'sant dnyaneshwar information in marathi'
इथे जरूर वाचा - 👇
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वेळापत्रक-2023, तसेच आषाढी वारी बद्दल सविस्तर माहिती.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा - Samadhi ceremony of Sant Dnyaneshwar Maharaj
इ. स. 1296 ला वार गुरुवार कार्तिक वद्य त्रयोदशी, शके 1218 या दिवशी हा ज्ञानमय सूर्य कायमचा अस्ताला गेला. नंतर अवघ्या एका वर्षातच त्यांच्या इतर भावंडांनी देखील आपली जीवनयात्रा संपवली. आजही कार्तिक वद्य षष्ठी पर्यंत हा समाधी सोहळा साजरा केला जातो. इथे अवघ्या देश भरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी वारी निमीत्त पंढरपुरी निघालेले वारकरी देखील आळंदी येथुन प्रस्थान करतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं च प्रस्थान होताना आजही त्यांच्या मंदिराचा कळस हलतो. त्यांना सर्व संप्रदायात गुरुस्थानी ठेवण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर हे संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता महाराज यांचे समकालीन होते. त्यांनी खूप सारे अभंग, गौळणी यांच्या रचना केल्या. आजही त्यांच्या साहित्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांच्या नावाच्या गजरा शिवाय वारकरी संप्रदायातील कोणताच कार्यक्रम सुरू होत नाही. त्यांच्या जिवन चरित्रावर आधारित अनेक मराठी चित्रपट व मालिका आहेत.'sant dnyaneshwar information in marathi'
आज माऊलींच्या समाधी सोहळ्याला अनेक वर्ष जरी झाली असली तरी आळंदी येथे आजही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. आशा या ज्ञानीयांच्या राजास कोटी - कोटी प्रणाम..!!
संत साहित्याची आवड असेल तर हे सुध्दा वाचा 👇
1. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ( संपूर्ण चिंतन )
2. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ( संपूर्ण चिंतन )
3. भक्त ऐसे जाणा जे देहि उदास ( संपूर्ण चिंतन )
4. लेकुराचे हित वाहे माउलीचे चित्त ( संपूर्ण चिंतन )
'sant dnyaneshwar information in marathi' संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जिवन चरित्रावर आधारित हा लेख आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या बद्दल अजून काही माहिती आपल्या जवळ असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद 🙏
'sant dnyaneshwar information in marathi'
FAQ
1) ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कधी झाला ?
- इ. स 1275
2) ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली ?
- वयाच्या सोळाव्या वर्षी
3) पसायदान हे काय आहे ?
- पसायदान हि माऊलींनी ईश्वराला केलेली प्रार्थना आहे. यात ते इथल्या सर्व जीवांच्या कल्याणाची थोडक्यात मागणी करतात.
4) संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव काय होते ?
- ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
5) संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू कोण होते?
- त्यांचें थोरले बंधू निवृत्तीनाथ
6) संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कोणत्या वर्षी समाधी घेतली ?
- एकविसाव्या वर्षी
7) संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कुठे लिहिली ?
- नेवासा ( अहमदनगर )
हे सुध्दा वाचा 👇
• सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती
• गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती
राम कृष्ण हरी 🙏🚩
0 Comments