यंदाचा मान्सून कसा असणार ? पंजाबराव डख हवामान अंदाज | Monsoon - 2023 | Panjab dakh wether forecast | पंजाबराव डख कोण आहेत? संपुर्ण माहिती

यंदाचा मान्सून कसा असणार ?

 पंजाबराव डख हवामान अंदाज|

Monsoon -2023|

Panjab dakh wether forecast|

पंजाबराव डख कोण आहेत ?

संपुर्ण माहिती 

'Panjab dakh havaman andaj'
'Panjab dakh havaman andaj'


      यंदाचा मान्सून कसा असणार याबद्दल 19 मे 2023 या दिवशी आदरणीय श्री पंजाबराव डख साहेबांनी फेसबुक पेज च्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना माहिती दिली आहे. त्या माहितीत डख साहेब सांगतात की 21 ते 22 तारखेच्या आत मान्सून अंदमान येथे धडकणार असून लवकरच तो आपल्या महाराष्ट्र राज्याकडे देखिल वाटचाल करणार आहे.'Panjab dakh havaman andaj' यंदाचा मान्सून 26 आणि 27 मे यादिवशी पर्यंत अत्यंत प्रगतिशील होणारं असून राज्यात तो 1 जून 2023 ला धडकेल असही ते म्हणाले. परंतू त्या आधीच 22 ते 25 तारखेच्या दरम्यान मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखिल त्यांनी वर्तवली असुन हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. या पावसाचं स्वरूप अवकाळी असणार आहे त्यामुळे नुकसान देखिल होऊ शकतं.

      म्हणुन पंजाब डख साहेबांनी शेतकरी बांधवांना काही सूचना केल्या आहेत. त्या आशा कि या मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आपली शेतीतील सर्व कामे आटपून घ्यावीत. तसेच ज्या काही शेतकरी बांधवांचा भुईमूग काढणे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतातील भुईमूग काढून तो सुखरूप घरी आणावा. कारण आता फक्त 8 ते 10 दिवसात पावसाला आरंभ होणारं असुन 1 जुन 2023 या दिवशी मान्सून ला प्रारंभ होत आहे. 1 जून 2023 ते 3 जून 2023 दरम्यान बहुतांश भागात पावसाळ्या सारखा दमदार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतीची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्यात 22,23 मे ला काही ठिकाणी अवकाळी स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या दिवसांत काही लग्नाचे मुहूर्त देखिल आहेत.'Panjab dakh havaman andaj' त्या सर्वांनी देखिल योग्य नियोजन लावण्याचा प्रयत्न करावा. 1 जून नंतर लगेचच 8 जून ला सुद्धा पाऊस पडणार आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर पर्यंत चांगला पाऊस असू शकतो.

'Panjab dakh havaman andaj'
'Panjab dakh havaman andaj'


     

• कोण आहेत पंजाबराव डख ?

'Panjab dakh havaman andaj'
'Panjab dakh havaman andaj'

           पंजाबराव डख यांच्या बद्दल थोडक्यात जाणून घेऊया पंजाबराव डख साहेब हे महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे  एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले. ते एक उत्कृष्ठ शेतकरी असून ते त्यांच्या मूळ गावातच राहायला असतात. त्यांच्याच गावातील शाळेत ते शिक्षक पदावर कार्यरत आहेत.'Panjab dakh havaman andaj'

           त्यांना बालपणी पासून टिव्ही वरील बातम्या पाहण्याची आवड असून ते नियमत रुपाने हवामान अंदाज विषयक बातम्या ते काटेकोर पणे पाहत असतं. हळू हळू त्यांना हवामान बदल कळायला लागले तेंव्हा ते आपल्या वडिलांसोबत या विषयावर चर्चा देखिल करत. हवामानाचे निरीक्षण करुन त्याचे बद्दल ते आपल्या नोंद वहीत टिपत असत. काही कालांतराने तंत्रज्ञानाचा अवलंब करून तसेच नैसर्गिक संकेत याचा अभ्यास करून त्यांचे हवामान अंदाज अचूक ठरायला लागले. अजुन महिती वाढावी म्हणुन त्यांनी C- DAC नावाचा कोर्स देखिल केला.'Panjab dakh havaman andaj'

            काही दिवसांनंतर त्यांचा प्रचंड अभ्यास झाल्यानंतर ते आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांना पावसाचे अंदाज देखिल सांगायला लागले. हळू ते अंदाज अचूक ठरायला लागले. त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना पावसाचे अनुमान कळल्या मुळे त्यांच्या शेतीच नुकसान थोडक्यात वाचायला लागलं. काही दिवसांनंतर पंजाब रावांचा लौकिक अत्यंत वाढला. आणि तो काही वर्षांतच संपुर्ण राज्यात पसरला. साहेबांचे अंदाज खरे ठरायला लागले. आज पंजाबराव नाव म्हंटल तरी डख साहेब आठवतात. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कारण आज या माणसामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे. कारण अनेक वेधशाळेचे अंदाज चुकतील परंतू पंजाब रावांचा अंदाज सहजासहजी चुकत नाही.'Panjab dakh havaman andaj'  विशेष म्हणजे कसल्याही स्वरूपाचं मानधन किंवा पैसे न घेतां सर्व सामान्य माणसासाठी झटणारा , ईथल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना निःशुल्क हवामान अंदाज सांगणारा एकमेव माणूस म्हणजे " पंजाबराव डख " म्हणावं लागेल. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना अंदाज लवकर कळावा याकरिता अनेक सामाजिक माध्यमातून ते लाईव्ह येत असतात. तसेच हजारो व्हॉट्सॲप ग्रूप द्वारे ते अचानक हवामानात बदल झाला की लगेच एक मेसेज देतात. कोणतेही वेळ असू ते आपलं काम चोख पार पाडतात. त्यामुळे अलीकडील काळात साहेब अनेक शेतकरी बांधवांना आपलेसे वाटत आहेत.


• पंजाबराव डख हे एक उत्कृष्ठ शेतकरी

           पंजाबराव जरी सद्य स्थितीत अंशकालीन शिक्षक असले तरीही ते एक उत्कृष्ठ शेतकरी आहेत. त्यांच्या घरी 8 ते 10 एकर शेती असून ते अत्यंत सुंदर अशी शेती करतात. आपल्या शेतीत अनेक प्रयोग करुन साध्या पद्धतीने देखिल भरघोस उत्पादन मिळवतात. हरभरा, सोयाबीन यांसारख्या पिकातून सुद्धा ते लाखो रुपयांचे उत्पन्न घेत असतात. अनेक मोबाईल मधील ग्रूप द्वारे शेतीविषयक माहिती देण्याचं काम सुद्धा ते खूप मोठया मनाने करतात. पंजाबराव गेली 20 ते 25 वर्षापासून जरी हवामान अंदाज वर्तवत असले तरी ते या दोन - तीन वर्षात संपुर्ण राज्यात पोचले आहेत. त्यामुळे बाकी बातम्या न बघता पंजाबराव लाईव्ह आलेले पाहणं याला शेतकरी वर्ग आता पसंती देत आहे.'Panjab dakh havaman andaj'


• शेतकऱ्या करिता सूचना -'Panjab dakh havaman andaj'

            यावर्षी पाऊस कसा असेल याचे अचूक अंदाज माहिती करुन घ्यायचे असतील तर पंजाब राव डख साहेबांशी सामाजिक माध्यमातून जोडले जा.पंजाब राव यांचे खूप सारे व्हॉट्सॲप ग्रूप आहेत त्यात सुद्धा जॉईन व्हा. वेळोवेळी हवामानात होणाऱ्या बदलांची माहिती जाणून घेऊन आपल्या शेतीचे नुकसान टाळा. 

धन्यवाद ..

          असेच महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी www.anokhapravas.com या साईट ला अवश्य भेट द्या 🙏


हे सुध्दा वाचा 👇

 1. परभणी जिल्ह्यातील धारासुर येथिल चालुक्य काळातील गुप्तेश्र्वराचं पुरातन महादेव मंदिर ( सविस्तर माहिती)

2. सप्तश्रृंगी गड ( सविस्तर माहिती)


संत साहित्य विषयक आवड असेल तर हे सुद्धा वाचा 👇  

 1. लेकूराचे हित वाहे माउलीचे चित्त (सविस्तर चिंतन) 👈

  गाथा मंदिर देहू ( संपूर्ण माहिती ) 👈


FAQ


   1. मान्सून म्हणजे काय ?

       - वर्षाच्या एका विशिष्ट ऋतूत जो पाऊस पडतो त्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात.


Post a Comment

0 Comments