जेजुरी गडाची माहिती | Jejuri Gad Information in Marathi - History of Jejuri Temple
महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडोबा चे मंदीर जेजुरी गडावर आजही अभेद्य उभे आहे.
• खंडोबा मंदीर जेजुरी - Khandoba Temple Jejuri
जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदीर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) गावातील डोंगरात वसलेले आहे. राज्यातील प्रसिध्द तिर्थापैकी एक असणारे हे मंदिर 'Jejuri gad information in marathi' काळ्याभोर दगडांनी बांधलेले आहे. मंदीरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसा बाई यांची देखिल मुर्ती आहे. खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठया आनंदाने येथे भंडारा उधळत असतात. खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो. या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या असून नवविवाहित वर आपल्या वधुस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठया प्रेमाने चढत असतात. या पायऱ्या चढत असताना वातेटच बानुबाई ( खंडोबाची दुसरी पत्नी ) यांचंही मंदिर लागतं. मंदिराच्या सुरवातीला भव्य दगडी कमानी आहेत. मंदीरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लगत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वेकडून मोठ्यात - मोठ्या आकाराचे पितळी धातूने मढवलेले कासव आहे. सर्वत्र परिसर भंडारा उधळल्या ने गजबजून जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते. जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोकं आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात. 'Jejuri gad information in marathi' खानदेशातील लोकांची संख्या देखिल इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते. खंडोबा हे कार्य सिधिला नेणारं दैवत आहे.श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते. त्या पैशातून 25000 रुपयांच्या मुर्त्या बनवल्या तसेच उर्वरित पैशातून मुखवटे आशा विवध प्रकारचं साहित्य आणल. देवाच्या मंदीरात पितळ चांदी युक्त तीन मूर्तींचे जोड होते परंतू त्यातील एक मूर्तीचा जोड इ. स.1942 ला चोरी झाला होता.
* हे सुद्धा वाचा 👇
चालुक्य काळातील जगप्रसिद्ध गुप्तेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर
• जेजुरी मंदिर इतिहास ( History of Jejuri Temple )
श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम इ. स. 1608 मध्ये पुर्ण झाले. मंदिरा भोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे ' राघो मंबाजी ' या मराठा सरदाराने इ. स. 1637 मध्ये पूर्ण केली. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या. इ. स. 1742 मध्ये त्यांनी मंदीरात दगडी खांब उभे केले. काही कालांतराने मंदिराच्या सोभवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी इ.स. 1770 पूर्ण केले. श्री तुकोजी होळकर यांनी ' भुलेश्वर ' या मंदिराचा स्वतः लक्ष्य घालून जीर्णोद्धार केला. 'भुलेश्वर' हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे 17 की.मी. अंतरावर आहे. हे मंदीर अकराव्या शतकात देवगिरी येथिल यादवांनी बांधलेले आहे. याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निःसीम भक्त होते. त्या काळात खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक. पंढरपूरच्या विठ्ठला नंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक विविधतेत नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबा चे मंदीर अती शोभामान दिसते. गेले कित्येक वर्षांपूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा, कमानी तसेच पायऱ्या देखिल उभारलेल्या आहेत. हे सगळ नक्षीदार काम अत्यंत तेजोमय आहे.'Jejuri gad information in marathi'
![]() |
'Jejuri gad information in marathi' |
सर्व शेतकरी बांधवांना आपलस वाटणार हे दैवत शिव, भैरव आणि सूर्य देव या तिन्ही देवाचं एकत्रित स्वरूप आहे. म्हणुन खंडोबाचा उपवास देखील भाविक मंडळी रविवारी करतात. या मंदिरा पासून काही किमी अंतरावर असणाऱ्या कडे- पठारावर खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे, परंतू जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा तीन शतकापूर्वी चे म्हणजे जवळपास सतराव्या शतकातील आहे.'Jejuri gad information in marathi' हे खंडोबाचं मंदिर त्या काळात मोगली सैन्याने उद्धवस्त केल्याची घटना इतिहासात नोंद आहे, मंदिरा बदल असं देखील सांगितल जातं की जेंव्हा मंदिरातील मधमाश्या मोगली सैन्याच्या मागे लागल्या त्या काही केल्या शांत होत नव्हत्या, म्हणून औरंगजेब बादशहाने श्री खंडोबाला साकडे घातले तसेच मंदिरासाठी 1 लाख 25000 चांदीच्या मोहरा दिल्याचा उल्लेख सुद्धा इतिहासात आढळतो. "नवलाख पायरी" असणारा हा (jejuri) "जेजुरी गड" अशी देखील गडाची महती सांगितली जाते. गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतले की म्हाळसा बाई, मणी मल्ल व खंडोबा यांच्या तीन सुरेख मुर्त्या आहेत. गडावर अनेक पुरातन वास्तू असून प्रचंड वजनाची दिव्य - भव्य तलवार सुद्धा आहे. हि जड तलवार हातात घेउन दरवर्षी ईथे एक खेळ खेळला जात असतो. ही वजनदार तलवार जो कुणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य इनाम दिला जातो.
![]() |
'jejuri temple' |
• खडोंबा यात्रा उत्सव ( चंपा शष्टी )
तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते. परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते. खंडोबाची जत्रा चैत्र, पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे पाच दिवस असते. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे एकुण सहा दिवस तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित दहा दिवस यात्रेचे असतात. या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच आषाढी वारी निमीत्त पंढरपुरी निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा (वेळापत्रक-2023) देखील एक दिवस " जेजुरी " (jejuri) येथे मुक्कामी असतो. तेंव्हा देखील गडावर प्रचंड मोठी गर्दी असते.
![]() |
'Khandoba' |
• चंपा षष्ठी •
"चंपा षष्ठी" हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठी च्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणी - मल्ल या दोन दैत्याना पराजित करुण खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. म्हणून हि घटना नियमित स्मरणात राहावी, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. चंपा षष्ठी ची नवरात्र म्हणजे सहा दिवसांची असुन मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखिल साजरा केला जातो. अनेक लोककलेच्या माध्यमांतून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात त्यात जागरण गोंधळ घालून 'वाघ्या मुरळी' यांना दान धर्म करणे त्यांना भोजण देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. या दिवशी वांग्याचं भरीत अन् भाकरी असा खंडोबाला नैवद्य केला जातो. यातला काही भाक खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात. त्याची पूजा करुण तळी उचलून आप्तस्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते. 'Jejuri gad information in marathi'
पौष पौर्णिमेला फार जुन्या काळापासून जेजुरीला गाढवांचा बाजार भरत असतो. तो आजही भरतो. या विवध वाहतूक साधनांमुळे जरी गाढवांचा उपयोग कमी झाला असला तरी गडावर आजही लोकं अनेक पैसे खर्च करून गाढव खरेदी करतात.
• पुणे ते जेजुरी अंतर (pune to jejuri distance)
जेजुरी गडावर दर्शनासाठी राज्यातील प्रत्येक भागातून लोकं येतं असतात. त्यांना गडावर येण्यासाठी अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे, बस, खाजगी गाड्या ई. पुणे येथून जवळपास 49 की. मी. अंतरावर 'जेजुरी गड' असून इथे यायला पुणे महानगर पालिकेने बसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 'Jejuri gad information in marathi'
• हे सुद्धा अवश्य वाचा -
* गाथा मंदिर देहू ( सविस्तर माहिती ) 👈
* सप्तश्रृंगी देवी ( संपुर्ण माहिती ) 👈
• खंडोबाचे प्रसिद्ध स्थाने
1. अणदूर ( धाराशिव)
2. जेजुरी ( पुणे )
3. देवर गुड्डा ( रानी बेन्नुर )
4. पाली ( सातारा )
5. निमगाव (धावडी पुणे)
6. मंगसुळी (बेलगाव)
7. अदिमैलार ( बिदर )
8. मैलापुर ( गुलबर्गा)
9. माळे-गाव ( नांदेड)
10. मैलार लिंगप्पा ( बेलारी )
11. सातारे ( संभाजीनगर )
12. शेगुड ( अहमदनगर )
13. खंडोबाची शेलवाडी ( ठाणे )
14. देवदैठण ता . जामखेड ( अहमदनगर )
15. काकण बर्डी ( जळगाव )
16. चंदनपुरी ( नशिक )
17. वाकडी ता. राहता ( अहमदनगर )
18. बाळे ( सोलापूर )
'Jejuri gad information in marathi' हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुमच्या जवळ जेजुरी गडाबद्दल आणखी माहिती असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अनेक विषयावरील लेख वाचण्यासाठी www. anokhapravas.com या वेबसाईट ला भेट द्या.. धन्यवाद 🙏
• संत तुकाराम महाराजांचे निवडक अभंग ( सविस्तर चिंतन) 👇
1. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
3. लेकूराचे हित वाहे माउलीचे चित्त
.....येळकोट येळकोट जयमल्हार 🙏💛
FAQ
1 ) जेजुरी गडाला किती पायरी आहे ?
- 200
2 ) पुणे ते जेजुरी हे अंतर किलोमीटर आहे ?
- 49 की. मी.
0 Comments