सप्तशृंगी देवी मराठी माहिती | Saptashrungi Devi Information in Marathi

सप्तशृंगी देवी मराठी माहिती | Saptashrungi Devi Information in Marathi 

'Saptashrungi Devi Information in Marathi'
'Saptashrungi Devi Information in Marathi'

    भारतात एकूण 51 शक्तीपीठ असून त्यातली महत्वाची साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रतील या नावाजलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पाहिलं शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूर येथिल महालक्ष्मी माता, दुसरं शक्तीपीठ म्हणजे माहूरगड येथील रेणुका माता, तिसरं महत्वाचं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी तसेच अजून एक महत्वाचं अर्धपिठ म्हणजे सप्तशृंग (वणी)'Saptashrungi Devi Information in Marathi' गडावरील सप्तशृंगी माता.


श्री सप्तशृंगी गड - Saptashrungi Fort 

'Saptashrungi Devi Information in Marathi'
'Saptashrungi Fort' 


     महाराष्ट्रतील साडे तीन शक्तिपीठांपैकी प्रसिद्ध असणार अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी देवीचा उल्लेख सर्वत्र केला जातो. सप्तश्रृंगी देवी ही संपुर्ण महाराष्ट्रात 'वणीची देवी' या नावाने प्रसिद्ध आहे. सर्व भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करणाऱ्या या जगदंबे चा  'सप्तशृंगी गड' 'Saptashrungi Devi Information in Marathi' नाशिक येथून सुमारे 65 किमी अंतरावर आहे. दूरवरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी जवळच काही किलोमीटर अंतरावर ओझर येथे विमानतळ आहे. तसेच नाशिक रोड हे रेल्वे स्टेशन देखील जवळच आहे. गडावर येण्यासाठी बस स्थानक नाशिक येथून बस सुविधा देखील उपलब्ध आहे. सप्तश्रृंगी गड आताच्या कळवण तालुक्यात असून सह्याद्रीच्या पर्वत रांगेत उभा आहे. एकूण सात डोंगरी शिखरात देविचं सुंदर असं मंदिर आहे. म्हणूनच या गडाला 'सप्तशृंग' असे नाव आहे. गडाची एकुण उंची 4569 फूट ( 1480 मीटर ) एवढी आहे.

        सप्तश्रृंगी गड निर्माण कसा झाला याबद्दल देखील एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की रामायणात जेव्हां रावणाचा पुत्र इंद्रजित याने जेव्हा श्री रामाचे लहान बंधू लक्ष्मण यास आपल्या शक्ती अस्त्राने मूर्च्छित केले. तेंव्हा तिथल्या वैद्य बुवाने त्यांना द्रोणगिरी पर्वतातील संजवणी युक्त वनस्पती आणायला सांगितल्या. तेंव्हा श्री राम प्रभूंनी दिलेल्या आदेशाचे पालन करत मारुती द्रोणगिरी पर्वतावर गेले परंतु महाबली मारुती रायाला संजवनी युक्त वनस्पतीची जास्त माहिती नसल्यामुळे त्यांनी संपुर्ण द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतातील एक भाग वाटेत तुटून पडला तो भाग म्हणजे अताचा 'सप्तशृंगी गड'. 'Saptashrungi Devi Information in Marathi' 


सप्तश्रृंगी देवी मंदिर - Saptashrungi Devi Temple 

          
'Saptashrungi Devi Information in Marathi'
'Saptashrungi Devi Temple'

         सप्तश्रृंगी गडावर सात डोंगरांनी वेढलेल देविच अप्रतीम असं मंदीर अपणास पाहायला मिळत. मंदिरात आठ फूट उंच असणारी पाषाणात कोरलेली अद्भुत अशी देवीची मूर्ती आहे. देवीला अठरा हात असून दोन्ही बाजूला नऊ - नऊ आसे प्रत्येक हातात वेगवेगळ्या प्रकारची आयुधे घेतलेली आहेत. देवीच्या मंदिराला सूर्यद्वार , चंद्रद्वार व शक्तिद्वार हे तीन दरवाजे असून मातेचा साज शृंगार विविध प्रकारचे फळे आणि भाज्या यांनी केला जातो. देवीची मूर्ती स्वयंभू असून याच देवीला आदिशक्तीचे रूप मानलं जातं. आई सप्तशृंगी देवीची मूर्ती शेंदूर चर्चित असून ती सुमारे 9 फूट उंचीची आहे. देवीला 11 वार मानाची पैठणी साडी नेसून सजवल जातं त्यात तिन वार खणाची चोळी , कानात कर्णफुले, डोक्यावर सोन्याचा मुकुट, नाकात नथ, गळ्या मध्ये मंगळसुत्र, सुंदर असा कमरपटा, पायात तोडे इत्यादि. दागिने देवीला परिधान केले जातात.'Saptashrungi Devi Information in Marathi'

       देवीची दररोज महापूजा केली जाते. देवीच मंदिर पहाटे 5 वाजेला उघडलं जातं. नंतर काही वेळाने नियमित काकडा आरती केली जाते. देवीला विधियुक्त स्नान घालून सकाळी 8 वां महापूजा केली जाते. लगेचच वेगवेगळ्या पदार्थांचा नैवद्य देवीला दाखवितात. देवीच्या मुखामध्ये नगिनीच्या पानाचा विडा दिला जातो. आणि वरी दिल्याप्रमाणे शृंगार करुन देवीला सजवले जाते. नंतर आरती तसेच सायंकाळी शेज आरती करून परत देवीची पूजा केली जाते.


सप्तश्रृंगी देवीचा इतिहास - Saptashrungi Devi History 

        
'Saptashrungi Devi Information in Marathi'
'Saptashrungi Devi'


       पूर्वी सप्तशृंगी देवी म्हणजे आद्य शक्तिपीठ म्हणून ओळखले जायचे परंतू काही दिवसांनी लोकांनी आद्य शक्तिपीठ या शब्दाचा अपभ्रंश करत - करत आर्धपिठ असा शब्द तयार केला, असं देखिल सांगितल जातं. देवी बद्दल सांगायचं झालं तर भूतलावर महिषासूर नावाचा दैत्य अनेक असुरी शक्तीने उन्मत झाला होता. भगवान शंकराकडून वर प्राप्त केल्यामुळे त्याला कुणीही मारू शकत नव्हतं. त्याने अनेक देवतांना देखिल त्रास दिला होता. तेंव्हा सर्व देवतांनी आदिमाया आदिशक्ती ला विनंति केली की या दैत्याचा वध तुमच्याशिवाय कुणीच करु शकत नाही. तेंव्हा देवीने त्यांच्या विनंतीस मान देउन त्या राक्षसाचा वध करायचं ठरवलं. देवी आणि त्या दैत्या मध्ये घनघोर युद्ध झालं. आदिमायेचे त्याला आपल्या शक्तीने परास्थ करून त्याचा वध केला म्हणुनच देवीला ' महिषासुरमर्दिनी' म्हणून ओळखले जाते. त्या दैत्याचा वध याचं सप्तशृंगी गडावर केला.'Saptashrungi Devi Information in Marathi'

     याच गडावर प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना इथे आल्याचं सांगितलं जातं. संत निृत्तीनाथ देखिल समाधी घेण्यापूर्वी मातेच्या दर्शनासाठी या गडावर आले होते. तसेच नाथ संप्रदायातील मूळ नाथ मच्छिंद्रनाथ यांनी बद्रिकश्रमात 12 वर्ष कठोर तप केले. तेंव्हा श्री दत्तात्रय आणि महादेव त्यांना प्रसन्न होऊन शाबरी विद्या प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला. तेंव्हा तिथून ते तीर्थयात्रा करत - करत या सप्तशृंगी गडावर आले व त्यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेतले. शाबरी विद्या प्राप्त करण्यासाठी त्यांना सर्व देवी देवतांचा आशिर्वाद हवा होता त्या कारणाने त्यांनी आई जगदंबेचे सात दिवसांचे अनुष्ठान करून देवीस प्रसन्न करुन घेतले. आणि आपल्या मनातील शाबरी विद्या कवित्व करण्याचा शुध्द हेतू सांगितला तेंव्हा देविने त्यांना जवळचं असणाऱ्या मार्कंडेय पर्वतावर नेलं आणि त्यांना सर्व देवतांना प्रसन्न करण्याचा मार्ग दाखविला.

 

                        मार्कंडेय पर्वत   

               
'Saptashrungi Devi Information in Marathi'
'Markandeya Fort'

     सप्तशृंगी गडा लगतच आजीवन उभा असणारा 'मार्कंडेय पर्वत' आजही आपल्याला पाहायला मिळतो. इथे आजही गुप्त रुपाने मार्कंडेय ऋषी च वास्तव्य आहे. मार्कंडेय ऋषी हे अत्यंत महान ऋषी म्हणून ओळखले जातात. निःसीम शिवभक्त अशी ज्यांची ख्याती त्यांना प्रत्यक्ष महादेवांनी असा वर दिला होता की जोपर्यंत या भूतलावर सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत तुम्हाला मरण येणार नाही असं म्हणुन अमरत्व प्रदान केलं. मार्कंडेय ऋषीं सारख्या महान विभुतीनी पूनित असा हा पर्वत आजही जशास तसा उभा असलेला आपणास पाहायला मिळतो . 'Saptashrungi Devi Information in Marathi'


सप्तशृंगी देवी यात्रा - Saptashrungi Devi Yatra 

      चैत्र पौर्णिमा आणि नवरात्री उत्सवाच्या वेळी गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पौर्णिमेला देखिल गडावर गर्दी असतेच. भारत देशातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात त्यातली त्यात खानदेशातील भविकांच प्रमाण इतरांच्या तुलनेत अधिक आहे. चैत्र पौर्णिमेला गडावर किर्तिध्वज फडकावयाचा मान दरेगाव येथिल पाटिल यांचा आहे. तसेच देवीच्या महा पूजेचा मान दीक्षित आणि देशमुख यांचा असतो. कीर्ति ध्वजाची भव्य मिरवणूक काढून नाना विवध पदार्थ खास करुन पुरण पोळीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.

       यात्रे निमीत्त गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुख सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांच्या राहण्याच्या सोईसाठी ट्रस्टच्या वतीने 200 पेक्षा अधिक रूम तिथल्या धर्मशाळेत उपलब्ध केल्या आहेत. मंदिरातील संस्थांनातर्फे  अल्प पैशात पोटभर जेवणाची सोय केलेली आहे. कधी-कधी यात्रा दरम्यान संस्थानाच्या वतीने निःशुल्क भोजन सुद्धा दिले जाते. यात्रे निमित्त बसणे प्रवास करणाऱ्या भाविकांना 'जुने मध्यवर्ती बस स्थानक नाशिक' येथून भरपूर 'बस' आहेत. यात्रेच्या काळात बसच्या संख्येत अजून वाढ करण्यात येते. अलीकडील काळात देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी पायऱ्या चढून जायचं नसेल तर रोप वे ची सुविधा देखिल करण्यात आली आहे. गडावर गणपती मंदीर, गुरुदेव आश्रम, शितकडा, शिवतीर्थ , सूर्यकुंड , कालिकुंड, जलगुफा  इत्यादी ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. नांदुरी या गावाजवळ वसलेलं अन् सप्तशृंगी देवीच्या वास्तव्याने पावन झालेलं हे तीर्थक्षेत्र एक आगळं वेगळं असून देशातील प्रत्येक भाविकाने ईथे एकदा तरी दर्शनास यायला हवं.'Saptashrungi Devi Information in Marathi'

 

'Saptashrungi Devi Information in Marathi'

'Saptashrungi Devi Paduka'


अजून काही निवडक लेख 👇

    

      1. गाथा मंदिर देहू (सविस्तर माहिती)👈

      2. धारासुर येथिल प्राचीन असं गुप्तेश्र्वराच मंदिर ( सविस्तर )


FAQ 


 1) महाराष्ट्रतील सर्वात उंच शिखर कोणते?

           - कळसूबाई ( 1646 मीटर )

 

 2) सप्तशृंग गडाची उंची किती ?

           - 1480 मीटर 


3) महाराष्ट्रात किती शक्तिपीठ आहेत?

           - साडेतीन शक्तिपीठे 


         सर्व वाचकांना विनंती anokhapravas.blogspot.com या ब्लॉग च्या माध्यमातून विविध विषयावरील सविस्तर माहिती मराठीत देण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मी करत आहे, या माझ्या ब्लॉग साईट ला अवश्य भेट द्यावी. या लेखात भर घालावी आशी अजून काही महिती आपल्याकडे असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा धन्यवाद 🙏❣️


     

     


     

Post a Comment

0 Comments