अहिल्याबाई होळकर मराठी माहिती | Ahilyabai Holkar Information in Marathi
अहिल्याबाई होळकर यांचे बालपण - Childhood of Ahilyabai Holkar
गरजू लोकांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या कुशल प्रशासक, युद्ध कलेत पारंगत असणाऱ्या,आदर्श शासन कर्त्या विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून ज्यांनी दिलं त्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म इ. स. 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात "चौंडी" या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे तर आईचे नाव सुशिलाबाई शिंदे असं होतं. त्यांचे वडिल माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. ज्या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात असायचं त्या काळात मात्र त्यांच्या वडिलांनी अहिल्याबाईंना योग्य शिक्षण शिकवून साक्षर बनविले.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांची कौटुंबिक माहिती- Family Information of Ahilyabai Holkar
अहिल्याबाई होळकर यांचा विवाह त्या लहान असतानाच झाला त्याच कारण असं की, एकदा मल्हारराव होळकर पुण्याच्या मार्गाने निघाले असता वाटेतच "चौंडी" या गावी ते आराम करण्यासाठी थांबले होते. त्यांनी एका मंदिरात अहिल्याबाईंना पाहिलं तेव्हा त्या 8 वर्षाच्या होत्या. अहिल्याबाई कडे बारकाईने पाहिले असता त्यांचं बोलणं, वागणं, त्यांच्यातला समजूतदारपणा, गरीबाबद्दल असणारी आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम या सर्व गोष्टी मल्हारराव होळकरांना या लहानग्या अहिल्याबाईत दिसून आल्या.. तेव्हा अहिल्याबाईंना आपल्या घरची सून करण्याचा निश्चय त्यांनी केला. काही दिवसांनी माणकोजी शिंदे यांच्याशी बोलणं करून आपला मुलगा खंडेराव होळकर याच्या सोबत अहिल्याबाईंचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांनीही या लग्नात होकार देत आपली मुलगी अहिल्याबाईंचे लग्न मल्हारराव यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत लावून दिलं. पूढे काही वर्षांनी त्यांना मालेराव नावाचा मुलगा तसेच मुक्ताबाई नावाची मुलगी अशी दोन अपत्य प्राप्त झाली. नंतर काही दिवसांनी ई. स. 1954 ला कुम्हेर च्या लढाईत खंडेराव होळकर यांना वीरमरण प्राप्त झाले. पतीच्या निधनानंतर अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले. 'Ahilyabai Holkar Information in Marathi' अहिल्याबाई मधील कर्तुत्व त्यांनी बालपणीच ओळखलं होतं त्यामुळे त्यांना सर्वप्रकारची युद्धनीती शिकवून सामर्थ्यवान बनवलं. परंतु 12 वर्षानंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा देखील मृत्यू झाला. मग त्यांचे सुपुत्र मालेराव होळकर यांनी प्रशासकीय धोरणं आपल्या खांद्यावर घेतली. परंतु काही वर्षातच त्याचाही मृत्यू झाला. आपल्या पोटच्या मुलाच अचानक सोडून जाणं हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं दुःख होतं, परंतु अजिबात न डगमगता त्या उभ्या राहिल्या आणि राज्यकारभाराची संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतली. यातच त्यांचं प्रचंड मोठ सामर्थ्य दिसून येतं.
अहिल्याबाई होळकर यांचा प्रशासकीय कालावधी- Administrative period of Ahilyabai Holkar
खरंतर आपल्या पती आणि सासऱ्याच्या मृत्यूनंतर मध्येच अचानक पोटचा मुलगा जाणं हे दुःख एका स्त्रीसाठी अत्यंत भयानक असतं. परंतु इथल्या समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसावी म्हणून अहिल्याबाई यांनी "माळवा" प्रांताची सूत्र आपल्या हाती घेण्यासाठी पेशवे सरकार यांना विनंती केली. परंतु यास अनेक मंडळींचा विरोध होता. पण तरीही अहिल्याबाईंनी माळव्यातील राज्यकारभार स्वतः पहावा अशी तिथल्या तमाम रयतेची प्रचंड इच्छा होती. होळकरांचे सैनिक मंडळ देखील अहिल्या राणीसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास इच्छुक होते. नंतर त्यांनी मल्हाररावांचा दत्तक पुत्र तुकोजी होळकर याला आपल्या सैन्याचे सेनापती पद बहाल केलं.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाईंच कर्तुत्व त्यांच्यातला कर्तबगारपणा याबद्दल त्यांचे सासरे हयात असताना त्यांना किती अभिमान वाटायचा याचं उदाहरण द्यायचं झालं तर इ. स. 1765 च्या एका लढाई दरम्यान च्या एका पत्रावरून ते दिसून येत...
"चंबळ पार करून गालवीर येथे जावा. तिथे तुम्ही चार-पाच दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही सोबत मोठे सैन्य ठेवू शकता. आणि त्यांच्या शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा. कूच करताना सुरक्षेसाठी रस्त्यावर चौकी पहारे लावा."
अहिल्याबाईंच्या कर्तुत्वावर त्यांच्या सासऱ्यांचा विश्वास तर होताच परंतु जेव्हा त्या माळव्याचा राज्यकारभार बघायला लागल्या तेव्हा तिथल्या जनतेचा देखील त्यांच्या कार्यावर अत्यंत विश्वास होता. त्यामुळे त्या सर्वांमध्ये लोकप्रिय बनल्या होत्या. सर्वजण त्यांना "राजमाता" म्हणून संबोधित असत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही गरीब वंचित लोकांना कधी त्रास दिला नाही. उलट त्यांच्यासाठी दिवस रात्र झटत राहून त्यांची अनेक रखडलेली जीवन आवश्यक कामे मार्गी लावली. ज्याला अन्नधान्य नाही त्याला अन्नधान्य मिळवून दिलं. अशी अनेक सामाजिक कार्य त्यांनी त्या काळात पार पाडली . एक कुशल राज्यकर्त्या म्हणून आजही त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो.
अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य - Social work of Ahilyabai Holkar
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत संपूर्ण देशभरात अनेक सामाजिक कामे केली. त्यामध्ये योग्य पाणीपुरवठा, नदीवरील बंधारे , विहिरी, पडझड झालेली मंदिरे, धर्मशाळा बांधण्याचे काम त्यांनी केलं. तरुण मंडळींना रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक औद्योगिक धोरण राबवण्याचे काम त्यांनी त्या काळात केले. बहुतांश खेड्यापाड्यांना सुशोभित करण्याचे काम तसेच अनेक मंदिराचा जिर्णोद्धार त्यांनी आपल्या राजकीय काळात केला. अनेक तीर्थक्षेत्रावर त्यांनी मंदिराची कामे केली. उदाहरणार्थ गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, द्वारका, काशी, उजैनी, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, नाशिक तसेच परळी वैजनाथ. यामुळे अहिल्याबाईंना मंदिराच्या आश्रय दात्या म्हणून देखील ओळखलं जायचं. त्यांच्या राज्याची राजधानी जरी "महेश्वर" असली, तरीही त्यांनी ' इंदूर ' सारख्या गावाचं देखिल सुशोभीकरण केलं होत. त्यांनी माळवा प्रांतात अनेक गड किल्ले उभारले तसेच तेथील रस्ते , तलाव नव्याने बांधले.
• रयतेचा न्याय निवाडा - 'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत न्यायदानाचे काम देखील अत्यंत काळजीने केले त्या रोज आपल्या रयतेचा दरबार भरवून त्यांच्या अडचणी विचारून घेत असतं. सर्वांना समान न्याय मिळावा असं त्यांचं मत होतं. कधी कुणावर अन्याय होऊ नये असं त्यांना नेहमी वाटत असे. त्यांच्या न्यायदानाची कीर्ती सर्व दूर पसरली होती. कसलाही भेद भाव न करता त्या न्याय करत असतं. एकदा तर सेनापती तुकोजीराव होळकर यांच्या मुलाने रयतेला त्रास दिला म्हणून रयत न्याय मागण्यासाठी अहिल्याबाई कडे आली. तेंव्हा त्यांनी कसलाही भेद न करता तुकोजीच्या मुलास शिक्षा करुन तुरुंगात टाकले होते.
• शेती व शेतकऱ्यासाठी दिलेलं योगदान - 'Ahilyabai Holkar Information in Marathi'
सर्व जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा नेहमी आनंदी रहावा म्हणून त्यांच्या मनात शेतकरी वर्गा बद्दल अत्यंत जिव्हाळा होता. आपला भारत देश कृषिप्रधान असून इथला शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी. त्यामुळे त्यांना अनेक जाचक करातून मुक्त केले. त्यांच्या शेतीसाठी आवश्यक सर्व देऊन अनेक शेतकऱ्यांना गाई देखिल दान केल्या.
• विद्वान लोकांचा योग्य सन्मान -
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची महती सर्व दूर पसरली होती त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील विद्वान तसेच कलाकार लोक "माळवा" या प्रांतात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना भेटण्यासाठी यायची. विविध विषयातील माहिती असणारे जानकार, पंडित, चित्रकार, गायक, कीर्तनकार, ज्योतिषी, शस्त्र सल्लागार, आयुर्वेदाची माहिती असणारे वैद्य तसेच संगीतकार या सर्व कलाकारांना योग्य सन्मान देऊन आपल्या राज्यात आश्रय देखिल त्या द्यायच्या. या सर्व विद्वान मंडळींचे वास्तव्य हे राज्याची राजधानी 'महेश्वर' इथे असल्यामुळे ही भूमी अत्यंत पावन झाली होती. ही भूमी त्या काळात धर्माचे माहेरघर म्हणून ओळखली जाऊ लागली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी भाषेचे कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी व संस्कृत भाषेचा विद्वान खुशाली राम या सर्व कलावंतांना त्यांनी आपल्या राजधानीत आश्रय दिला होता.
• इतर सामाजिक कामे -
ज्या काळात वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात दूरवर जाऊन अनेक तीर्थक्षेत्राचा विकास करणं हि काही सामान्य गोष्ट नव्हती. त्या काळात प्रवास करणाऱ्या लोकांना वाटेत अडवून चोर दरोडेखोर त्यांच्या जवळील पैसा अडका लुटून नेत असतं. आशा रयतेला त्रास देणाऱ्या लुटारूना आपल्या सैन्यात सहभागी करून त्यांच्या हाती काम दिले. तसेच त्यांना गायी, म्हशी, बैलं व शेत जमीन दिली त्याचा हेतू आसा की त्या सर्वांनी शेती करावी व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवावी तसेच त्यांनी आपलं जीवनमान सुधाराव अशी त्यांची धारणा होती. परंतू एवढ सर्व करुनही जे लोक सुधरले नाही. त्या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन राज्यात एकप्रकारची वचक निर्माण केली होती. त्यामुळें गरीब लोक निर्धास्त जिवन जगू लागले.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
एक "तत्वज्ञानी महाराणी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर या युद्ध कलेत पारंगत होत्या. महीला ही कुठेच कमी नाही तिला सुद्धा पुरुषा इतकचं महत्व आहे हे त्यांनी त्या काळी समाजात बिंबवल. अज्ञानात खितपत पडलेला समाज हा ज्ञानाच्या प्रवाहात यावा अशी त्यांची इच्छा होती. तसे प्रयत्न करताना त्यांनी पडदा पद्धतीला विरोध केला. विधवेला हि जगण्याचा अधिकार आहे हे सांगताना त्यांनी सती प्रथा मोडीत काढली. त्या काळात सती जाणे पुण्य तर न जाणे पाप समजल जायचं. हे सर्व चुकीच आहे कारण या प्रथेला कुठल्याच शास्त्राचा आधार नाही. रामायण, महाभारतात अनेक मृत्यू झाले. परंतू कुणी महीला सती गेल्याचा उल्लेख कुठेच सापडत नाही हे सांगून त्यांनी रयतेचा गैरसमज दुर केला. पूढे इ. स 1829 ला ही सती प्रथा कायद्यानेच बंद केली. राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातून हे सर्व जरी झालं असलं तरी त्या आधीच्या काळात सती प्रथेला विरोध दर्शवून अहिल्याबाईंची याबाबत असणारी दूरदृष्टी दिसून येते.
अहिल्याबाई ह्या भगवान शंकराच्या भक्त होत्या याची प्रचिती आपल्याला त्यांचे शिवपिंड हाती घेतलेले फोटो पाहून येते. त्यांना महादेवाची पूजा करणं अत्यंत आवडायचं. एका आख्यायिकेनुसार त्यांच्या स्वप्नात देखिल महादेवांनी स्वतः येऊन त्यांना दर्शन दिलं होतं. असं सांगितल जातं. त्या शिव उपासक होत्या त्यामुळे नियमित महादेवाची पूजा करत असायच्या यातूनच पूढे त्यांनी महादेवाच्या अनेक पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यात महत्वाचं म्हणजे काशी येथिल विश्वेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार त्यांनीच केला. त्यांनी उभारलेला कलाकृतीचा, वास्तू, शिल्पकला आजही डौलात उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या धार्मिक असल्या मुळे दान - धर्म करायला त्यांना आवडत असे. त्यामुळें त्यांनी राज्यात अनेक अन्नछत्र देखिल उभारले तसेच अनेक संस्कृत शाळाही उभारल्या.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू - Death of Ahilyabai Holkar
उभ्या आयुष्याच्या कारकिर्दीत त्यांनी किती समाजसेवा केली हे जर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्द कमी पडतील एवढी त्यांची कामगिरी आणि कर्तृत्व मोठं आहे. होळकर घराण्याची ओळख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप संघर्ष करावा लागला. तरुण वयातच पतीचे जाण आणि आजीवन वैधव्य भोगत इथली राज्यव्यवस्था आपल्या खांद्यावर सांभाळणं ही काय सामान्य गोष्ट नव्हती. नंतर सासरे मल्हारराव होळकर यांचे अकस्मात झालेले निधन आणि पोटच्या मुलाचा मृत्यू ह्या दोन घटना अहिल्याबाईंसाठी काळीज हे हेलावून टाकणाऱ्या होत्या. पण तरीही या दुःखाला नजुमानता त्यांनी अत्यंत कुशलतेने राज्यकारभार पाहिला. संपूर्ण रयतेला आपल्या लेकरासारख सांभाळलं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही लढाया देखील केल्या. सर्व जनतेचे संरक्षण करत असताना आपल्या जिवाची अजिबात परवा केली नाही.
हे सर्व दुःख त्यांच्या मनात असतानाच त्यांचा अतिप्रिय नाताचं देखिल निधन झालं. ही घटना परत एकदा त्यांचे मन सुन्न करणारी होती. लगेच काही दिवसात पुन्हा एकदा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामध्ये त्यांचे जावई यांचा देखील मृत्यू झाला. आपली मुलगी मुक्ताबाई ला विनंती करून सुद्धा तिने सती जाणं थांबवलं नाही यातच मग मुलीचं सोडून जाणं हे सुद्धा अहिल्याबाईंकरता मोठं दुःख होतं. तरीदेखील या सर्व दुःखांची उजळणी न करत बसता त्यांनी आजीवन रयतेसाठी न डगमगता राज्यकारभार केला. परंतु हे दुःख माणसाला आतून पोखरत असंत त्यामुळें वृद्ध अवस्था लागताच त्या आजारी पडल्या. यातच काही दिवसांनी त्यांनी मृत्युला जवळ केलं. 13 ऑगस्ट 1795 ला आपल्या आयुष्याची कारकीर्द संपवत त्या हे जग कायमचं सोडून गेल्या.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांना मिळालेला सन्मान - Honor received by Ahilyabai Holkar
अहिल्याबाई यांच्या कर्तृत्वाबद्दल भारत देशाने त्यांना सन्मानित केलं. अहिल्याबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ 25 ऑगस्ट 1996 ला भारत सरकारने एक टपाल तिकिट जारी केले. अशा या महान राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन म्हणून इंदूर येथील विमानतळाचा नाव "देवी अहिल्याबाई होळकर" असं ठेवण्यात आलं असून इंदूर येथील विद्यापीठाला "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असं नाव देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील विद्यापीठाला नवीन नाव देण्यात आलं. हे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर असं देण्यात आलं आहे.'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांच्या समान न्याय दानाबद्दल राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील प्रभावीत होते. अहिल्याबाई या उत्कृष्ट न्यायदात्या तसेच उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या आयुष्यात सामान्य जनतेवर अन्याय होईल असं त्या कधीच वागले नाही. अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जिवंतपणी तर सन्मान मिळालाच परंतु त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांना तेवढ्याच सन्मान आजही मिळतो. अहिल्याबाईंचं महान कर्तुत्व नजरेसमोर ठेवून त्यांना लोकांनी संताचा दर्जा देखील बहाल केला आहे. आपल्या असामान्य नेतृत्वाने अनेक लोकांची मने त्यांनी जिंकली होती. त्यामुळे काही दिग्गज मंडळींच्या मते त्या एक अवतारिक स्त्री होत्या असे देखील म्हटले जाते. पुरुषांमध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकर्ते म्हणून महत्त्वाच स्थान तेवढेच महिलांमध्ये राजमाता अहिल्याबाईंना रज्यकर्ती म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. 'Ahilyabai Holkar Information in Marathi'
अहिल्याबाई होळकर यांची जयंती - Ahilyabai Holkar Jayanti
अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे या दिवशी सर्वत्र साजरी केली जाते. तर त्यांचा स्मृतिदिन 13 ऑगस्ट या दिवशी असतो. अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल या लेखात बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीदेखील आपल्याकडे अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल अजून काही माहिती असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि 'Ahilyabai Holkar Information in Marathi' हा लेख आवडला तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद 🙏
खालील लेख सुध्दा अवश्य वाचा 👇
• यंदाचा मान्सून कसा असेल? (सविस्तर माहिती)
1. महाराणा प्रताप संपूर्ण माहिती
2. गाथा मंदिर देहू सविस्तर माहिती
0 Comments