संत तुकाराम महाराज अभंग गाथा |
अभंग क्र.७४८ भक्त ऐसे जाणा जे देहि उदास
![]() |
'sant tukaram abhang' |
संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत लिहलेला प्रत्येक अभंग म्हणजे ज्ञानमय शब्दांचा ठेवा असं म्हणावा लागेल. त्यांच्या एकाही अभंगाचा संपूर्ण अर्थ शोधणं हे सामान्य माणसासाठी अती कठीण काम आहे.'sant tukaram abhang'
संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लीहले त्यातील भक्ताच महत्व व लक्षणं सांगणारा हा अभंग आहे..
भक्त ऐसे जाणा जे देही उदास।
गेले आशा पाश निवारोनी ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण।
नावडे जन धन माता-पिता॥२॥
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ॥३॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे।
घातलिया भये नरका जाणे ॥ ४
अभंगाचा सरळ अर्थ -
संत तुकोबाराय भक्तांच वर्णन करताना लिहितात की भक्त हा देहाने उदास असावा. त्याला कसल्याही प्रकारची शरीरा विषयी आसक्ती नसावी. कोणत्याही इतर आशेवर तो निर्भर नसावा. इतर इच्छा, आकांक्षा त्याच्या मनात निर्माण होऊ नये. त्याच्या आयुष्यात एकच विषय असावा तो म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण. आणि या नामस्मरणात तो एवढा दंग व्हावा की पैसा तर सोडाच स्वतःच्या कुटुंबात देखील त्याला रस राहू नये. आणि हे जर त्याला जमल तर सदैव त्याच्या पाठीशी देव उभे राहतात. आणि न मागता सर्व काही मिळत. कुठलच साकडं किंवा मागणी देवाकडे करायची आवश्यकता त्याला लागत नाही. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात अशा सत्य कार्यात जर कुणी मोडा अथवा भय घालत असेल, तर त्याला नरकात पचाव लागतं.
निरूपण -
संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगातून भक्तांची लक्षणं स्पष्ट करताना दिसतात. एका साधकाने जेंव्हा महाराजांना विचारलं असेल की महाराज 'भक्त' नेमका कसा ओळखावा? किंवा त्याची लक्षणं काय असतात ? असा प्रश्न उभा केल्यावर बहुतेक त्यांनी हा अभंग लिहिला असावा.
भक्त ऐसे जाणा जे देही उदास।
गेले आशा पाश निवारोनी ॥१॥
तुकोबाराय प्रथम चरणात लिहितात की भक्त देहाने उदास असावा. नेमका उदास कसा तर त्याला आपल्या देहाविषयी तिळमात्र सुद्धा आसक्ती नसावी. कारण देह जो आहे तो नाश पावणार आहे. तो कायम टिकणार नाही हे सांगताना महाराज आपल्या एका अभंगात लिहितात..
नाशिवंत देह जाणार सकळ |
आयुष्य खातो काळ सावधान ||
हे शरीर नाश पावणार आहे. नको त्या आशा, अपेक्षा यात गुरफटून न राहता त्यातून बाहेर पडायला हवं. या सर्व मोह मायेतून बाहेर पडता आलं की भक्तीचा मार्ग सापडतो. आणि मग मानवी आयुष्य बदलत जातं. वाम मार्गाचे रस्ते बंद होऊन चांगल्या मार्गाने चालण्यास मदत होते. आणि मग देवाच्या नामस्मरणाची गोडी लागून मन त्यात गुंतून जात आणि मग आयुष्यात एकच विषय राहतो, तो म्हणजे काय तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात..
विषय तो त्यांचा झाला नारायण।
नावडे जन धन माता-पिता॥२॥
उदाहरण द्यायचं झालं तर भक्त प्रल्हादाच देता येईल, त्यांनाही ईश्वराच्या नामस्मरणा शिवाय दुसर काहीच आवडत नव्हत.त्यांना अनेक संकटाना सामोरे जावं लागलं तरीही ते डगमगले नाही.
त्यांच्या वडिलांकडे एवढं राजवैभव असताना देखील त्यांना आई - वडील, धन, दौलत यात रस राहिला नव्हता, म्हणूनच त्यांना भक्त ही उपाधी दिली जाते. अगदी तशाच पद्धतीने भक्ती करणारा प्रत्येक जण भक्त असतो, असं तुकोबाराय सांगतात. हि अशी भक्ती ईश्वराला देखील प्रिय असते. आणि अशा निस्वार्थी भक्ताच्या कोणत्याही कार्यात तो देव अडथळा येऊ देत नाही.त्याच्यावर ईश्वराची नित्य कृपा राहते.'sant tukaram abhang'
दृष्टांत द्यायचा झाला तर, द्रौपदीच वस्त्रहरण होताना तिला कधीही न संपणारी साडी दान केली. अगदी विषाचा प्याला पिऊन सुद्धा संत मीराबाई जिवंत राहिल्या. अशा अनेक भक्तांच्या पाठीमागे देव नियमित उभा असतो हे सांगताना तुकोबाराय अभंगांच्या तिसऱ्या चरणात लिहितात..'sant tukaram abhang'
निर्वाणी गोविंद असे मागे पुढे ।
काहीच साकडे पडो नेदी ॥३॥
भक्ताला त्याची भक्ती एकदा सिद्ध करता आली, तर त्याच्या निर्वाणीच्या काळात न मदत मागताच देव त्याचा सांभाळ करायला हजर होतो, हे सांगताना तुकोबाराय आपल्या एका अभंगात लिहितात..
मागे पूढे उभा राहे सांभाळीत |
आलिया अगाध निवाराया ||
'sant tukaram abhang' याबद्दल एक दृष्टांत देता येईल तो असा की कुरुक्षेत्रावर जेंव्हा कौरव - पांडवाच युद्ध संपल. तेंव्हा अनेक जिवांचा नाश झाला.तेंव्हा भगवान श्री कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. त्यांनी रथ एका बाजूला नेऊन उभा केला आणि अर्जुनला म्हणाले हे अर्जुना या रथाच्या खाली उतर.
तेंव्हा अर्जुनला प्रश्न पडला तो असा की सारथी रथातून आधी उतरतो. परंतु श्री कृष्ण का मला उतरायला सांगत आहेत. पण तरीही हे सर्व विचार मनातून काढून अर्जुन रथाच्या खाली उतरला. तेंव्हा काहीच घडलं नाही पण काही वेळानंतर जेंव्हा भगवान श्री कृष्ण रथातून उतरले. तेंव्हा मात्र रथ जळून खाक झाला. यातून हेच सांगता येईल की त्या रथात बसून अर्जूनाकडून अनेक पातकं घडली, म्हणून तो रथ जळून दग्ध होणार होता परंतु तो न जळण्याच कारण म्हणजे भगवान श्री. कृष्ण त्या रथाचे सारथी होते.'sant tukaram abhang'अर्जुन ईश्वराचा प्रिय भक्त असल्यामुळे तो निर्वाणीच्या काळात सुद्धा जिवंत राहिला, भक्ती जर निरपेक्ष असेल तर देवाला कुठलच साकडं घालायची गरज पडत नाही.
अशा भक्तांना जो कोणी त्रास देतो, किंवा त्याच्या कार्यात भय घालतो देव त्याचा वाईट काळ लवकरच चालू करतो..'sant tukaram abhang'
हे सांगताना तुकोबाराय शेवटच्या चरणात लिहितात..
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहे।
घातलिया भये नरका जाणे ॥ ४
तुकोबाराय म्हणतात जे कर्म सत्य आहे, त्याला सहकार्य करायला हवं. देवाची भक्ती करणाऱ्याला विरोध करू नये. त्यांना भयभीत करू नये. आणि असं जर केलं तर शेवटी नरकात जावं लागत.'sant tukaram abhang'
या अभगांचा अर्थ असाच असेल, असं माझं मत नाही. मी फक्त तो तोडक्या मोडक्या भाषेत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा 🙏
![]() |
'sant tukaram abhang' |
राम कृष्ण हरी 🙏🚩
0 Comments