संत तुकाराम महाराज गाथा |अभंग क्र १७५९ लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त | lekurache hit
तुकोबारायांनी गाथेत सर्व विषयावर आधारित अभंग लिहलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबारायांनी आपल्या अनमोल शब्दातून प्रत्येक विषयाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. संपुर्ण जगाचं अस्तित्व ज्या दोन अक्षरांनी जोडलेलं आहे तो शब्द म्हणजे "आई". 'sant tukaram abhang'
प्रत्येक क्षेत्रात आईचं स्थान हे अत्यंत मोठं आहे. संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथात अनेक ठिकाणी आईचं वर्णन केलं आहे. संत तुकाराम महाराजांनी देखील संत आणि आईची माया ही सारखीच असते हे स्पष्ट करताना हा अभंग लिहिला आहे.'sant tukaram abhang'
अभंग क्र १७५९
लेकुराचे हित । वाहे माऊलीचें चित्त ।।१।।
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ।।२।।
पोटी भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ।।३।।
तुका म्हणे माझें । तुम्हा संतांवरी ओझे ।।४।
अभंगाचा सरळ अर्थ - 'sant tukaram abhang'
संत तुकाराम महाराज या अभंगातून लिहितात की आपल्या मुलाचं हित कशात आहे, किंवा आपल्या मुलाने काय केलं तर त्याचं भविष्य उज्ज्वल घडेल, हा सर्व विचार त्याच्या आईच्या मनात नियमित रूपाने चालत असतो. आपल्या लेकरा बद्दल एवढा कळवळा फक्त माय माऊलीला असतो, अन्य कुणालाही नाही. तिच्या प्रेमात कोणतीही स्वार्थी भावना नसते.
सांसारिक गाडा ओढताना कशाचीही पर्वा न करता ती आपल्या बाळाला नऊ महिने पोटात सांभाळत असते. आणि त्याच्यामुळे होणारा त्रास किंवा प्रसूती काळातील जीवघेण्या वेदना देखील ती त्याच्यावरील मायेपोटी सहन करत असते. आपल्या लेकराच ओझं तिला कधीच वाटत नाही. ते ओझ उराशी बाळगून आई जीवन जगत असते. हे सांगताना शेवटी आपल्या अभंगात तुकोबाराय सर्व संताना अनुसरून म्हणतात की जस आईचं आणि मुलाचं नात आहे. तसचं आपल्यातील नातं दृढ राहुद्या आणि इथून पुढे माझ्या संपुर्ण जबाबदारीच ओझं तुमच्या सारख्या दयानिधी संतावर आहे.'sant tukaram abhang'
निरूपण
हा अभंग अत्यंत उच्च कोटीचा असून यात तुकोबारायांनी संताचे दयारुपी मन आणि आईची आपल्या लेकरा बद्दल असणारी माया सांगितली आहे. तुकाराम महाराजांनीच नाही तर सर्व संत मंडळींनी देखील आपल्या अनेक अभंगात वडीलांपेक्षा आईला जास्त महत्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळते.'sant tukaram abhang' उदाहरण द्यायचं झालं तर संत नामदेव महाराज देखील एका ठिकाणी संत सावता माळी यांचं वर्णन करताना लिहितात..
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता।
साठविला दाता त्रेलोक्याचा ।।
या अभगांत सुद्धा वडिलांपेक्षा आईचा उल्लेख आपल्याला अगोदर दिसतो. तुकोबाराय देखील असाच उल्लेख आपल्या एका अभंगात करतात..
आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥
आशा प्रकारे संत साहित्यात अनेक ठिकाणी आईला महत्वाचं स्थान देण्याचं काम संतांनी केलं आहे. आणि ते सांगताना..
महाराज या अभंगाच्या प्रारंभी लिहितात..
लेकुराचे हित ।
वाहे माऊलीचें चित्त ।।१।।
आपल्या मुलाबाळांचं चांगल व्हावं हे प्रत्येक माय माऊलीला वाटत असतं. आपलं मुलं हे वाईट मार्गाला जाऊ नये, ते निर्व्यसनी राहावं.याकरिता बालपणी पासून त्याला योग्य संस्कार देण्याचं काम आई ही मोठया हिमतीने करत असते. आपल्या मुलाचं हित कशात आहे हे तिला कळत असतं. आणि म्हणून तिच्या मनात नेहमी आपल्या लेकराच्या हिताचा विचार केला जातो. या सर्वामध्ये तिचं आपल्या लेकरा बद्दल असणार प्रेम स्पष्ट होतं. 'sant tukaram abhang'
म्हणून महाराज दुसऱ्या चरणात लिहितात..
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभाविण प्रीति ।।२।।
जगाच्या पाठीवर निस्वार्थी प्रेम करणारी फक्त आई असते. बाकी सर्व नाती ही स्वार्थाने जोडली जातात. प्रत्येक नात्यात कुठला तरी स्वार्थ असतो. कारण जगात आपलं असं कुणीच नाही याचं उदाहरण देताना तुकोबाराय एका ठिकाणी लिहितात..
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे |
अंत हे काळीचे कोणी नाही ||
दुर्दैवाने काही लोक परक्या लोकांना जवळ करतात व स्वतःच्या आई वडीलांना अनाथ आश्रमात टाकतात हे वास्तव आहे. ज्या माय माऊलीने जन्म दिला तिला त्रास देतात. हे कृत्य कुठतरी बंद व्हायला हवं. हे सर्व करताना एकदा त्या माय माउलीचे कष्ट, तिने आपल्या जन्माच्या वेळी सहन केलेल्या वेदना याची जाणीव करायला हवी.कारण तिने आपल्या मुलाकरिता प्रसूती काळात खूप त्रास सहन केलेला असतो. तो कसा तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात लिहितात..
पोटी भार वाहे ।
त्याचें सर्वस्वही साहे ।।३।।
नऊ महिने नऊ दिवस पोटचा गोळा सांभाळन, त्याचा अजिबात भार न वाटू देणं, त्याची जिवापाड काळजी घेणं या सर्व गोष्टी मोठ्या कठीण असल्या तरी देखील याला सोप करण्याचा प्रयत्न ती माय माउली करत असते. त्या पोटातील गर्भामुळे तिला अनेक पथ्य पाळावी लागतात.अनेक आकर्षक वस्तूंचा त्याग करून स्वतःच मन मारून ती बाळाला जन्म देत असते. त्यामुळे माय माउलीचे उपकार हे न फिटणारे असतात. त्या उपकाराची परतफेड करण म्हणजे त्या माय माऊलीला कधीचं दुःख न देणं नेहमी आनंदात ठेवणं एवढीच आहे.
हा अभंग लिहिताना कदाचित तुकोबारायांना साधकाने असा प्रश्न विचारला असावा की महाराज संताचा स्वभाव त्यांच्यातले गुण नेमके कसे असतात ? तेंव्हा तुकोबारायांनी "आईच्या" प्रेमाची उपमा देत संताचा स्वभाव हा माय माउली सारखा असतो हे सांगितल असाव. त्यामुळे तुकोबाराय लहान लेकरा सारखा आपला संपूर्ण भार संतावर सोपवताना अभंगाच्या शेवटच्या चरणात लिहितात..
तुका म्हणे माझें ।
तुम्हा संतांवरी ओझे ।।४।
या अभंगाचा अर्थ असाच आहे. असं माझं अजीबात मत नाही. मी तो फक्त तोडक्या - मोडक्या भाषेत 'sant tukaram abhang' सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून एकच सांगेल आपल्या परिसरात जर कुणी आई वडीलांना त्रास देत असेल. तर त्याला योग्य सल्ला देण्याचं काम करा कारण आयुष्यात आई पेक्षा मोठं कुणीच नसतं. हा लेख आवडला तर नक्की शेअर करा 🙏
![]() |
'sant tukaram abhang' |
इथे 👇
अभंग क्र. १ - समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ( चिंतन ) 👈
अभंग क्र. ७४८ - भक्त ऐसे जाणा ( चिंतन ) 👈
गाथा मंदिर देहू - ( सविस्तर माहिती) 👈
राम कृष्ण हरी 🙏🚩
0 Comments