गाथा मंदीर देहू | Gatha Mandir Dehu
![]() |
'gatha mandir dehu' |
आपल्या प्रत्येक अभंगातून प्रबोधन करत अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी ज्यांनी आपलं उभ आयुष्य खर्ची घातलं ते महान संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणजे " देहू ".
• अभंग क्र १ - समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ( निरूपण )👈
देहू हे गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात "इंद्रायणी" नदीच्या किनारी वसलेले आहे. भाविकांच मुख्य आकर्षक ठिकाण म्हणजे अताचं "गाथा मंदिर". 'gatha mandir dehu' मंदिराची रचना अत्यंत अद्भुत असून हे मंदिर "इंद्रायणी" नदीच्या तीरावर विराजमान आहे.
• इंद्रायणी नदी •
![]() |
'gatha mandir dehu' |
इंद्रायणी नदी ही पुणे जिल्ह्यातील कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणी जवळ उगम पावते. हे ठिकाण लोणावळ्या जवळ आहे. या नदीचे पात्र मोठे असून हि नदी देहू , आळंदी येथून वाहते त्यामुळे या नदीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. इंद्रायणी नदी पुढे वाहत जाऊन ' तुळापूर ' या ठिकाणी भीमा नदीस मिळते. 'कुंडलिका' ही इंद्रायणी ची उपनदी आहे.
•आळंदी•
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र |
तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ||
![]() |
आळंदी |
आळंदी येथे पालखी प्रस्थान काळात भाविकांची अचाट गर्दी पाहायला मिळते, आळंदी या गावात संत ज्ञानेश्वरांच त्यांच्या भावंडांचं बालपण गेलं. त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्तिक यात्रेला इथे खूप गर्दी पाहायला मिळते. हेच भाविक पुढे देहूला जाऊन तुकोबारायांचे देखील दर्शन मोठ्या संख्येने घेतात.
• गाथा मंदिर •
![]() |
'gatha mandir dehu' |
गाथा मंदिराची रचना मनमोहित करणारी असून एकटक मंदिराकडे पहातच राहावं अशी आहे. मंदिराच्या पायऱ्या अत्यंत आकर्षक आहेत,'gatha mandir dehu' चारही दिशेला थांबून बघितलं तरीही मंदिर अत्यंत सुंदर दिसत. मंदिराच्या परिसरात प्रचंड मोठी अन् मोकळी जागा आहे. आत गाभाऱ्यात एकदम मधोमध प्रचंड मोठी तुकोबारायांची आसनस्थ मूर्ती आहे. तसेच उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील तिथे पाहायला मिळते. मंदिरात इतरही संत महात्म्यांच्या प्रतिमा आहेत. मंदिराच्या चौफेर भाविकांना वाचता येतील अशा अक्षरात गाथेतील अभंग हे संगमरमर च्या दगडावर कोरलेले आहेत.'gatha mandir dehu'
'gatha mandir dehu' इथून थोड खाली गेलं तर इंद्रायणी नदीचा तिर पाहायला मिळतो. तिथे लागूनच पुरातन मंदिर आहे. तिथेच काही पायऱ्या उतरल्या की इंद्रायणीच्या काठावर भाविकांना स्नान देखील करता येते. तुकोबारायांच्या काळात त्यांना देहू येथील कर्मठ वृत्तीच्या लोकांनी खूप विरोध केला तसेच त्रासही दिला. अभंग रचना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं म्हणत त्यांची अभंग रचीत गाथा सुद्धा इंद्रायणीच्या पाण्यात बुडवली असं म्हणतात हिचं "गाथा" काही कालांतराने तुकोबारायांच्या आत्मिक शक्ती पुढे कोरड्या रूपाने इंद्रायणी नदीच्या वर आली, हाच चमत्कार देहूतील ग्रामस्थानी देखील पहिला होता अशी देखील आख्यायिका आहे.
इथूनच ६ किमी दूर असणाऱ्या भंडाऱ्या माळावर तुकोबाराय नियमित जायचे.त्यांना तिथे निवांत वेळ मिळायचा त्यामुळे तिथे त्यांना लिहायला सुचत असे, त्यांच्या बहुतांश अभंगाच्या रचना या भंडाऱ्या डोंगरावरील असाव्या.या डोंगरावर आजही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. महाराजांचे निसर्गातील पशू पक्षांवर तसेच झाडा झुडपावर खूप प्रेम होत ते व्यक्त करताना ते त्यांच्या एका अभंगात लिहितात.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
तुकोबारायांनी या अनमोल शब्दांच्या आधारावर प्रचंड मोठी विद्वता मिळवली होती. त्यांनी नेहमी शब्दांचा गौरव केला. इथल्या लोकांची स्थिती जेंव्हा त्यांच्या लक्षात आली. तेंव्हा त्यांना अत्यंत वाईट वाटलं. म्हणून त्यांनी गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं. अगदी तिथल्या विरोधकांना तोंड देत तो त्रास सहन करत लोकांच्या हिताचा विचार केला. इथला समाज हा अज्ञानाच्या अंधकरात डूबत चाललेला पाहून त्यांना इथल्या लोकांची दया आली असावी. ते एका अभंगात लिहितात..
बुडते हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणोनिया।।
हा कळवला फक्त दयानिधी संतनाच येऊ शकतो अन्य कुणालाही नाही, याच लोकांच्या जीवनात सुधारणा व्हाव्या म्हणून त्यांनी स्वलिखित "गाथा" जन्माला घातली . त्या गाथेमुळेच आज आपल्याला हे सुंदर "गाथा" मंदिर पाहायला मिळत.'gatha mandir dehu' हा लेख आवडला तर नक्की शेअर करा 🙏
![]() |
'gatha mandir dehu' |
• अभंग क्र. ७४८ भक्त ऐसे जाणा जे देहि उदास ( चिंतन) 👈
राम कृष्ण हरी 🙏🚩
0 Comments