अक्षय तृतीया मराठी माहिती | Akshaya tritiya

 अक्षय तृतीया मराठी माहिती | Akshaya tritiya 

             

'akshaya tritiya information in marathi'
'akshaya tritiya information in marathi'


    हिंदू धर्मातील दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडे तीन मुहूर्त हे अत्यंत महत्वाचे असतात ते खालीप्रमाणे 👇   

   चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू वर्षाचा प्रारंभ होत असतो, त्यामुळे हा वर्षाचा पहिला मुहूर्त शुभ मानला जातो.

   वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच 'अक्षय तृतीया' 'akshaya tritiya information in marathi' हा दिवस पण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे कधीच नाश न पावणारे म्हणून या दिवशी सोन्याची दागिणे खरिदी केली जातात.

   आश्विन शुक्ल दशमी हा मुहूर्त सुद्धा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असून यालाच विजया दशमी म्हणजे ' दसरा ' म्हंटल जात. या दिवशी सुद्धा अनेक शुभ कामे केली जातात. हे सर्व तीन मुहूर्त आहेत पण यातही एक अर्धा मुहूर्त म्हणजे कार्तिक शुध्द प्रतिपदा या दिवशी पाडवा असतो. शास्त्रानुसार हा मुहूर्त सुद्धा अत्यंत शुभ गणला जातो याही दिवशी अनेक कामाचा शुभारंभ केला जातो.'akshaya tritiya information in marathi'


साडे तीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया -'akshaya tritiya information in marathi'

       अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या 'अक्षय तृतीया' या दिवसाला हिंदू पांचागमध्ये महत्वाचं स्थान आहे. वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. या दिवशी अनेक शुभ कार्यास आरंभ केला जातो, तसेच काही दानशूर व्यक्ती अनेक वस्तू या दिवशी दान करतात, तर काही लोक या दिवशी सोन्याची दागिणे अशा मौल्यवान वस्तू खरेदी करतात.'akshaya tritiya information in marathi'

     'अक्षय तृतीया' यात अक्षय म्हणजे कधीच क्षय न होणारं, म्हणजे नाश न पावणार अजून पुढे सांगायच झालं तर कधीच संपुष्टात न येणारं असं अनन्यसाधारण महत्त्व या सणाचं आहे.


  अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ गोष्टी घडल्या असं सांगितल जात त्यातील काही गोष्टी खाली दिल्याप्रमाणे..👇

            

'akshaya tritiya information in marathi'
'parshuram jayanti '


 १) भगवान परशुरामाचा प्रगट दीन म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो, यांचं शुभ मुहूर्तावर परशुरामाचा जन्म झाला असं सांगितलं जातं. 

२) स्वर्गाहून ' गंगा ' या पृथ्वीवर आली, तो सुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस, त्यामुळे या दिवशी जो गंगेत स्नान करतो त्याची सर्व पापे दूर होतात अशी हिंदू संस्कृतीची धारणा आहे.

३) चार धामा पैकी एक असणाऱ्या उतराखंड मधील भगवान बद्रीनाथ मंदिरांचा दरवाजा देखील अक्षय तृतीयेला भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येतो. नंतर हाच दरवाजा भाऊबीजेच्या दिवशी परत बंद केला जातो.

४) या दिवशी भगवान परशुरामाची  जयंती, नर - नारायणाची जयंती, संत बसवेश्वर जयंती, अन्नपूर्णा देवीची जयंती, ई. जयंत्या साजऱ्या केल्या जातात.

५) 'अक्षय तृतीया' याच  शुभ मुहूर्तावर श्री . व्यास ऋषींनी  "महाभारत"  हा दिव्य ग्रंथ लिहायला प्रारंभ केला होता.'akshaya tritiya'

६) याच दिवशी भगवान कृष्णाने युधष्ठिराला उपदेश केला की अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीच वाया जात नाही. या तिथीस देव व पितर यांच्या प्रती केलेलं कार्य अविनाशी असते.

७) याच दिवशी भगवान कृष्णाची आणि सुदाम्याची भेट झाली असं देखील सांगितल जातं.'akshaya tritiya'

८) जैन धर्मात देखील या दिवसाला खूप महत्व आहे, भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्या काळात सहा महिने कठोर तप केले. सहा महिने ते उपाशी होते एकदा अन्न ग्रहण करावं अस त्यांना वाटल्यावर ते निघाले परंतु लोकांना अन्न दानाची योग्य विधी माहिती नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सहा महिने म्हणजे एक वर्ष  उपवास केला. काही दिवसांनी ते हस्तीनापुर येथे आले असता तिथल्या राजाने त्यांना उसाचा रस दिला. तोही अक्षय तृतीयेला.'akshaya tritiya information in marathi'


९) अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग चालू झालं, असं सांगितलं जातं. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ' कल्पादी '  तसेच त्रेता युगाचा प्रारंभ म्हणजे ' युगादी ' हीच तिथी अक्षय तृतीयेला येते.'akshaya tritiya'

 विधी विषयक - 'akshaya tritiya information in marathi'

      अक्षय तृतीयेला अनेक शुभ कमासोबत पूजा, व्रत, वैकल्य, जप, नामस्मरण ई. केलं जातं. हा दिवस पूर्वजांचं स्मरण करण्याचा दिवस असही मानलं जातं. या दिवशी अन्न दान केल्याने पितरांचा संतोष होतो असही म्हणतात. या दिवशी केलेली पूजा, व्रत यातून मिळणार देवाची कृपा ही अक्षय तृतीयेला केल्यामुळे नियमित राहते ती कधीच क्षय होत नाही.

 'akshaya tritiya'  या दिवशी गंगेत स्नान करणे, नवीन वस्त्र व सोन्याची दागिणे खरेदी करणे,मोठे आर्थिक व्यवहार करणे, आदी शुभ कामेही केली जातात.

  भारतातील अनेक ठिकाणी देखील 'अक्षय तृतीया' हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्र, ओरिसा, दक्षिण भारत, राजस्थान, पश्चिम बंगाल या सर्व राज्यात या सणाला खूप महत्व आहे.

       

'akshaya tritiya information in marathi'
'Jagannath Puri Rath Yatra'

    ओरिसा येथे सर्व शेतकरी मिळून हा सण मोठ्या थाटात साजरा करतात. जगन्नाथ पुरी येथील प्रसिद्ध ' रथ यात्रा ' देखील याच शुभ मुहूर्तावर निघाली होती असं सांगितलं जातं. 

दक्षिण भारतात देखील महाविष्णू आणि लक्ष्मीचं पूजन याच दिवशी करतात. राजस्थान मध्ये अक्षय तृतीयेला तीज असं म्हणतात. 

    महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला अनेक नावाने ओळखले जाते, खानदेशात 'अखाजी' तर मराठवाड्यात 'अखीदी'. खानदेशात या सणाला दिवाळी एवढंच महत्व दिलं जातं. तिथल्या अनेक कार्यात याच दिवसापासून सुरवात  केली जाते.


 अक्षय तृतीया निमित सर्वांना शुभेच्छा 🙏


Post a Comment

0 Comments