संत तुकाराम महाराज गाथा|अभंग क्र.१ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी| Sant Tukaram Maharaj Abhang Gatha

संत तुकाराम महाराज गाथा|अभंग क्र.१ - समचरण दृष्टी विटेवरी साजिरी|Sant Tukaram Maharaj Abhang Gatha

'Sant Tukaram Maharaj Gatha'
  'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'


 

   'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'  संत तुकाराम महाराज लिखित "गाथा" म्हणजे खरतर ज्ञानाचा प्रचंड मोठा सागर असं म्हणायला काही हरकत नाही.

  त्या काळात समाजातील अज्ञान, अनिष्ट रूढी परंपरा, वर्ण भेद, उच-नीच, धर्म सत्तेकडून धार्मिक शोषण, अनेक कर्मकांडे, परकीय सत्ता या सारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन, यात बद्दल व्हावा ही भावना उराशी जपतं सर्व संत मंडळींच्या विचारांची "भागवत धर्माची" पताका त्यांनी हातात घेतली. संत तुकोबारायांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्ह्यावं यासाठी स्वतःचा जीव ओतून दिला. तसेच आपल्या "विद्रोही" लेखनातून जगाला ज्ञान देणारी "गाथा" लिहली.


गाथेतील सुरवातीचा अभंग हा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचं  वर्णन करणारा असून त्यात संत तुकाराम महाराज लिहितात..


अभंग क्र १

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥२॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥




अभंगाचा सरळ अर्थ -

      संत तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करताना लिहितात अगदी सारख्या स्वरूपाची पाऊले ठेऊन तुम्ही विटेवर उभे राहिला आहात.'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'तुमची सर्वांप्रती असणारी दृष्टी सम आहे, अशा तुमच्या सुंदर मनमोहक रुपावर माझी दृष्टी सदैव राहो.


अजून कसल्याही प्रकारच्या मायिक पदार्थाची मला आवश्यकता नाही आणि त्यात माझी कसलही आशा राहू देऊ नका.


उच्च पदावर माझं मन गुंतू देऊ नका, ब्रम्हादिक पदे जरी उच्च असले तरी त्याठिकाणी दुःखच -  दुःख आहे, त्यामुळे त्यात माझं मन जडू देऊ नका.


शेवटी ते लिहितात की हे पांडुरंगा जे कर्म, धर्म आहेत, यातील वर्म आता आम्हाला कळलं आहे कारण बाकी सर्व काही नाशवंत आहे. 'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha' 



निरूपण -

   संत तुकाराम महाराज आपल्या अनेक अभंगात विठ्ठल - रुक्मिणी यांचं वर्णन करतात. तस पाहिलं गेलं तर सर्व संत परंपराच भगवान पांडुरंग परमात्म्यावर अवलंबून आहे. या अभंगात देखील देवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना महाराज  लिहितात..'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥


जसे तुझे विटेवर पावले समान आहेत, तशीच तुझी भक्तावरील दृष्टीही समान आहे. म्हणून तुझ्या या रूपावर माझी दृष्टी नियमित रूपाने राहुदेत. दुसर मला काहीही नको कारण न मागताच मला सर्व काही मिळालं आहे, तू दानशूर आहेस हे संपूर्ण भक्तांना माहिती आहे.

यावर सांगायचं झाला तर तुकोबारायचं पुढे गाथेत लिहितात..




विटेवरी ज्याची पाऊले समान । तोचि येक  दानशूर दाता ॥

  म्हणून मला मायावी असं काही नको, हे सांगताना ते अभंगांतील  दुसऱ्या चरणात लिहितात..


आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥२॥


   मायारूपी पदार्थाचा ते स्पष्ट अव्हेर करताना दिसतात, हे पदार्थ नाश पावणारे असून लवकर नष्ट होणारे आहेत. याची सावली देखील माझ्या मनावर पडू देऊ नको. तसेच या सर्व मायावी पदार्थात माझं मन किंवा माझी ईच्छा यात राहू देऊ नको.'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'


देवाला अशी विनंती करताना पुढे महाराज म्हणतात..




ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी ।
तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥३॥

    जे काही उच्च पद आहेत त्याचा मोह मला अजिबात नसून, त्यात पडण्याची ईच्छा सुद्धा नाही, त्यासाठी तिकडे माझं मन जाऊ देऊ नको. कारण जी काही ब्रम्हादिक पदे आहेत ते अत्यंत उच्च असून त्यात सर्वत्र दुःख भरलेले आहे.'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'


 
अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज लिहितात..

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥४॥


   अभंगाच्या अखेरीस महाराज लिहितात जे कर्म,धर्म आहेत, त्यातलं वर्म आता आम्हाला कळलं आहे, त्यामुळे नाशिवंत असणाऱ्या सर्व गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष्य केलं आहे.

'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'



   खरतर संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील प्रत्येक अभंग म्हणजे अत्यंत उच्चकोटीचा पण तरीसुद्धा हा अर्थरुपी सोडवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, या अभंगाचा असाचं अर्थ होतो, असा माझा अजिबात कयास नाही.

"Sant Tukaram Maharaj Abhang Gatha"



आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका 🙏



                      'Gatha Mandir Dehu'

                     
'Sant Tukaram Maharaj Abhang Gatha'


    
राम कृष्ण हरी 🙏🚩











Post a Comment

0 Comments