संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

संत गोरा कुंभार माहिती | Sant Gora Kumbhar Information In Marathi

'sant goroba information in marathi'
'sant goroba information in marathi'


       तेचि संत तेचि संत |  ज्यांचा  हेत  विठ्ठली ||

     नेणती काही टाणेटोणे || नामस्मरणा  वाचूनी  ||

    

        'sant goroba information in marathi' संताचा महिमा सांगायचा झाला तर या निळोबारायांच्या  वरील अभंगाप्रमाणे  सांगावा लागेल कारण संत जन्म घेतात ते जगाच्या कल्याणकरीता दुसरा कोणताच स्वार्थ त्यांच्या अंगी नसतो.

    

संत गोरोबांचा जन्म - Birth of Goroba 

    संत संप्रदायातील ज्येष्ठ संत असं ज्यांच वर्णन केलं जातं. संत गोरा कुंभार हे संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत असून वयाने मोठे होते. त्यामुळे आजही त्यांच्या नावाचा उल्लेख 'गोरोबा काका'  म्हणून केला जातो.याच महान गोरोबा काकांचा जन्म हा इ.स. १२६७ च्या कालखंडातील असावा असं सांगितलं जातं, पण अजून त्यांची खरी जन्म तारीख कुणाला माहिती नाही. त्यांचं मूळ जन्मगाव हे उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातील "तेरढोकी" हे आहे. या गावातील एका सर्वसाधारण 'कुंभार' कुटुंबात त्यांचा जन्म झाला, हे कुंटुंब शिव उपासक तसेच पांडुरंगाचे भक्त होते. 'तेर' हे गाव पंढरपूर पासून कमी अंतरावर आहे.

हे सुध्दा अवश्य वाचा 👇

           संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनचरित्र 


संत गोरोबांची कौटुंबिक माहिती - Family Information of Sant Goroba Kaka 

     गोरोबा काकांचे कुटुंब हे पारमार्थिक होते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव तर आईचे नाव रुक्मिणी बाई होते. माधवरावांना गोरोबा काकांना धरून आठ अपत्य झाली पण दुर्दैवाने ती मृत्यू पावली.

   या बद्दल सुद्धा एक आख्यायिका आहे ती अशी की, माधवरावांच संतती दुःख पाहून भगवान पांडुरंग परमात्म्याने एका गृहस्थाचे रूप घेतले आणि माधवरावांची विचारपूस करू लागले, तेंव्हा त्यांना कळलं की यांची संतती फार काळ जिवंत राहत नाही. तेंव्हा देवांनी विचारलं की तुझ्या मुलांना अजवर कुठे पुरल आहे , तेंव्हा त्यांनी ती जागा दाखवून दिली.असं म्हणतात की देवांनी माधवरावांची आठही मुले जिवंत केली आणि त्यातली सात मुले स्वर्गाकडे मार्गस्थ झाली. त्यातल्या एका मुलाला देवाने स्वतः थांबवून गोरीतून बाहेर काढल म्हणून त्यांचं नाव 'गोरोबा' असं ठेवलं. गोरोबाला माधवराव आणि त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन केलं, तोच मुलगा म्हणजे संत "गोरा कुंभार".


संत गोरोबांच्या जीवनातील काही प्रसंग - Some events in the life of Sant Goroba

   संत गोरा कुंभार यांना त्या काळी प्रत्येक जण ' गोरोबा काका ' या नावाने हाक मारायचे. गोरोबा काका हे जातीने कुंभार असल्याने त्यांचा व्यवसाय देखील तोच होता. गोरोबा काकांची दोन लग्न झाली असही सांगितल जात. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव 'संती' तर दुसऱ्या बायकोचं नाव 'रामी' असं होत. संती आणि रामी ह्या दोघी सख्या बहिणी होत्या. संत गोरोबा काकांचं लग्न जेंव्हा संतीशी झालं, तेंव्हा काही दिवसा नंतर त्यांना एक मुलगा झाला.

    असं सांगितलं जातं की एकदा त्यांची पत्नी पाण्याला जात असताना तिने आपल्या मुलावर लक्ष्य द्या असं गोरोबांना बजावून सांगितल तरही ते विठ्ठल नामात एवढे दंग होऊन चिखल तुडवत होते की, आपलं मूल आपल्या पायाखाली तुडवल जाईल याचं देखील त्यांना भान उरल नाही, आणि त्यांनी आपल्या रांगत्या बाळाला पायाखाली तुडवून त्याचा जीव घेतला. तरीही त्या बाळाचा आवाज त्यांच्या कानी पडला नाही एवढे ते हरिनामात तल्लीन झाले होते, नंतर पुढे काही दिवसांनी याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी आपले हात कापून घेतले असही सांगितल जातं. 

      काही दिवसानंतर आषाढी एकादशी ला गोरोबा काका आपल्या पत्नी सोबत पंढरपूरला गेले असता, तिथे पांडुरंगाचे दर्शन घेणार एवढ्यात त्यांच्या कानी संत नामदेवांचा आवाज आला, नंतर त्यांना कळलं की प्रत्यक्ष नामदेव वाळवंटात कीर्तन करत आहेत. गोरोबा काका सुद्धा कीर्तन ऐकताना सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत होते. काही क्षणापूर्ते आपल्यालाही हात आहेत असं म्हणून गोरोबांनी टाळ्या वाजवणे चालू केले की लगेच त्यांना पहिल्यासारखे हात फुटले. त्यांच्या पत्नीला देखील हे सर्व पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांनी देखील विठोबाला साकडं घातलं अन् म्हणाल्या देवा तू आम्हाला सगळ दिलंस फक्त एकदा आमचं मुल आम्हाला परत कर. ही प्रार्थना एकताच त्यांचा काही दिवसांपूर्वी मृत पावलेला मुलगा वाळवंटातून पळत आला. आणि गोरोबा काकांचे अन् संती आईचे दर्शन घेतले.

  अशा पद्धतीने अनेक चमत्कार सुद्धा त्या काळी पांडुरंग परमात्म्याने आपल्या भक्तांच्या सुखाकरिता केले.

 संत तुकोबाराय देखील आपल्या अभंगात लिहितात..

          कबिराच्या मागे  विणू लागी शेले |
              मूल उठविले कुंभाराचे || 


संत  गोरोबांचे कार्य   - Work of Goroba 

       पुढे अनेक सामाजिक कार्य गोरोबा काकांनी केली.आपला व्यवसाय करत - करत जगाला संप्रदायाचे महत्व त्यांनी पटवून दिले, इतर राज्यात देखील त्यांच्या नावाचा उल्लेख आढळतो. त्यांनी अनेक अभंग रचना केल्या, त्यातील जवळपास 20 निवडक अभंग आजही संत साहित्यात उपलब्ध आहेत. 

आपल्या अभंगातून संत नामदेव महाराजांची ओळख जगासमोर समोर आणण्याचं कामही गोरोबा काकांनी त्या काळात केलं. आपलं उभ आयुष्य लोकांना भक्तीमार्ग शिकवण्यात त्यांनी घालवलं, खरतर अशा प्रकारचा त्याग फक्त संतचं करू शकतात.


संत गोरोबांचा मृत्यू -   Death of Goroba 

       अशा या महान संत गोरोबा काकांनी शके १२३९ म्हणजे २० एप्रिल १३१७ रोजी आपल्या आयुष्याची कारकीर्द संपवत, पूर्वीचा उस्मानाबाद तर आताच्या "धाराशिव" जिल्ह्यातील 'तेरढोकी ' या गावी समाधी घेतली. ती आजही आपल्या भाविकांना पाहायला मिळते. गोरोबा काकांच्या जीवन चरित्रावर लीहण्याजोग बरच साहित्य आहे. त्यातील काही माहिती लिहण्याचा हा थोकडा प्रयत्न केला आहे.

            

'sant gora kumbhar information in m
'Sant Goroba Kaka Samadhi'


 हि माहिती आवडली तर नक्की शेअर करा.🙏


राम कृष्ण हरी 🙏🚩


अजून काही महत्वपूर्ण लेख - 👇

           1. महाराणा प्रताप यांचं जीवनचरित्र

          2. राजमाता अहिल्याबाई होळकर जीवनचरित्र 

          3. सप्तश्रृंगी देवी संपुर्ण माहिती

          4. जेजुरी गडाची संपूर्ण माहिती 

          5. गाथा मंदिर देहू संपूर्ण माहिती 


FAQ

     1) संत गोरा कुंभार यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

            'तेरढोकी ' ( धाराशिव)




     




      

Post a Comment

0 Comments