क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती Phule Jayanti
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म दि. ११ एप्रिल १८२७ या साली झाला. त्यामुळे संपुर्ण भारतात त्यांची जयंती '११ एप्रिल' या दिवशी साजरी केली जाते.'Phule Jayanti'
वंचित, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी त्या काळात न्याय मिळवून देऊन, शिक्षणाची गंगा सामान्य लोकांपर्यत नेण्याचं प्रचंड मोठं काम केलं.
त्या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जायचं , स्त्री म्हणजे दुबळी असा इथल्या लोकांचा गैरसमज त्यांनी मोडीत काढून मुलींसाठी पुणे येथे पहिली शाळा सुरू केली. त्यांनी आपल्या पत्नीला शिकवून शिक्षिका बनवलं. त्यामुळे आज मुलींच्या शिक्षणाचं सर्व श्रेय फुले परिवाराला जातं.'Phule Jayanti'
'Phule Jayanti'
हि पोस्ट लिहण्याच कारण म्हणजे आज दिनांक १० एप्रिल २०२३ या रोजी यावर्षी ११ एप्रिल २०२३ हा 'फुले जयंती' चा दिवस राजस्थान येथील विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM) यांनी सार्वजनिक सुट्टीचा दिवस घोषित केला असून या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
राजस्थान सरकारने अधिकृत केलेल्या आदेशात असं सांगितलं आहे, महिला व बालविकास मंत्री ममता भूपेश, राष्ट्रीय फुले ब्रिगेड तसेच अनेक सामाजिक संस्था यांची सार्वजनिक सुट्टी चे मागणीपत्र त्यांच्याकडे आली होती. त्यामुळे हा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.'Phule Jayanti'
खरतर हा निर्णय म्हणजे फुले यांच्या कार्याचा खरा गौरव म्हणावा लागेल. कारण त्यांचं कर्तुत्व म्हणजे अभाळा एवढं मोठं म्हंटल तरी कमी पडेल. प्रत्येक राज्याच्या सरकारने हा निर्णय घ्यायला हवा.'Phule Jayanti'
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शिक्षण क्षेत्राच दैवत म्हणावं लागेल, त्यांची जयंती देखील प्रत्येक ठिकाणी साजरी होणं ही काळजी गरज आहे. ज्यांनी बहुजन समाजातील अज्ञान लोकांना शिक्षणाच खर महत्व पटवून दिलं. ते पटवून देताना ते लिहितात..
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
शिक्षण किती महत्वाचं आहे हे इथल्या समाजाला कळायला हवं, याकरिता त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्यांच्यावर होणारा ब्रिटिशांचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. "शेतकऱ्याचा आसूड" या पुस्तका प्रमाणे त्यांची अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत.'Phule Jayanti'
त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची लाभलेली साथ अत्यंत महत्वाची ठरली, त्या काळातील अनेक अनिष्ट रूढी, परंपरा यांना फाटा देत, अंगावर दगड,शेन झेलून इथल्या अडाणी मातीत दोघांनी मिळून ज्ञानाचं बीज रोवल. त्यामुळे आज अभिमानानं निडर होऊन मुलगी शिकू शकते याचं संपूर्ण श्रेय फुले कुटुंबाला जातं.'Phule Jayanti'
'Phule Jayanti'
एवढंच नाहीतर स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून जगातील पहिली "शिव जयंती" ज्यांनी साजरी केली ते क्रांतीसुर्य महात्मा फुले.
छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा व बहुजनांचा राजा म्हणत गुरू स्थानी ठेऊन त्यांना " कुळवाडी भूषण" ही उपाधी दिली. तसेच शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे देखील महात्मा फुलेच होते.'Mahatma Jyotiba Phule Jayanti'
त्यांच्यावर लिहायला गेलं तर आभाळा एवढं मोठं त्यांचं कार्य असल्यामुळे माझ्या सारख्या सामान्य माणसाची लेखणी खुजी पडेल,त्यामुळे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून इथेच थांबतो.'Mahatma Jyotiba Phule Jayanti'
![]() |
'Mahatma Jyotiba Phule Jayanti' |
जय ज्योती | जय क्रांती 🙏🚩
0 Comments