महाराष्ट्र शाहीर मराठी चित्रपट | Maharastra Shahir Marathi Movie
![]() |
'Maharashtra Shahir' |
मागच्या वर्षी पासून चर्चेत असणारा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharastra Shahir) या चित्रपटाचं ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं असून या ट्रेलरला महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. (Trailer Of Maharashtra Shahir) या आधी याच चित्रपटाचं टिझर देखील प्रदर्शित केलं गेलं होत.'Maharashtra Shahir'
'महाराष्ट्र शाहिर' 'Maharashtra Shahir' हा मराठी चित्रपट शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लोकप्रिय ' शाहीर साबळे ' (Shahir Sable) यांच्या जीवनावर असून या चित्रपटाचं दिग्दर्शन 'शाहिर साबळे' यांचे नातू प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ( Kedar Shinde) यांनी केलं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे केदार शिंदे यांची कन्या ' सना शिंदे ' ( Sana Shinde) देखिल या चित्रपटात काम करत इथूनच अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार आहे.'Maharashtra Shahir'
एक वर्षापासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आता काही दिवसांवर आला असून 'shahir Sable' यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. २८ एप्रिल २०२३ रोजी "महाराष्ट्र शाहिर" हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'अजय-अतुल' यांच्या मधुर संगीताने चित्रपट अधिक उठून दिसणार आहे, तसेच प्रसिद्ध कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात कलाकार कोण, चित्रपटाचं स्वरूप कसं असेल ? अशे अनेक प्रश्न प्रेक्षक मंडळींना पडले आहेत.'Maharashtra Shahir'
चित्रपट विषयक माहिती -'Maharashtra Shahir'
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक,कलाकार, तसेच नावाजलेले शाहिर पद्मश्री शाहिर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. केदार शिंदे दिग्दर्शीत व संजय छाब्रिया आणि बेला शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रमुख कलाकार अंकुश चौधरी आणि सना शिंदे हे असून या चित्रपटाला संगीतमय करण्याचं काम अजय- अतुल यांनी केलं आहे. इतर कलाकार अश्विनी महांगडे, अमित डोलावत, दुष्यंत वाघ, अतुल काळे, शुभांगी सदावर्ते, मृण्मयी देशपांडे, निर्मिती सावंत इ.'Maharashtra Shahir'
चित्रपटातील प्रसिद्ध गाणी-'Maharashtra Shahir'
१.गाऊ नको किसना (Gau Nako Kisna)
२. बहरला हा मधुमास (Baharla Ha Madhumas)
या चित्रपटात आदरणीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, साने गुरुजी अशा अनेक दिग्गज मंडळींची भूमिका पाहायला मिळणार आहे. अनेक प्रकारातील लोक संगीत, जुणी गाणी, या सर्वाचा संगम यातून दिसणार आहे. या अप्रतिम चित्रपटाची कथा 'प्रतिमा कुलकर्णी' यांनी लिहिली आहे.'Maharashtra Shahir'
शाहिर साबळे - 'Maharashtra Shahir'
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे गीत गाऊन महाराष्ट्राची एक वेगळी ओळख ज्यांनी निर्माण केली. असे सर्व महाराष्ट्रातील लाखो जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे 'Maharashtra Shahir' कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजे 'शाहिर साबळे' यांचा जन्म दी. ३ सप्टेंबर १९२३ ला सातारा जिल्ह्यातील परसणी या गावी झाला. शाहिर साबळे यांचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक शाहिर म्हणून मोठे योगदान लाभले. 'Maharashtra Shahir' कवी, गीतकार, गायक, लेखक, नाटककार, प्रसिद्ध ढोलकी वादक अशा अनेक कलेने ते नटलेले होते.
बालपणी घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून आईने त्यांना अमळनेर ला आजीकडे पाठवले. तिथे गेल्यावर आपला आवाज चांगला आहे हे त्यांना उमजल. त्यांचं गाणं एकूण अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. ते तेंव्हा तिसऱ्या वर्गात शिकत होते. काही दिवसांनी हे आजीला कळल्यावर तिने परत त्यांना गावाकडे पाठवले त्यामुळे त्यांना सातव्या वर्गाची परीक्षा देता आली नाही.'Maharashtra Shahir'
अमळनेर ला असताना लहानपणी त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. साने गुरुजींच्या मदतीने त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत भाग घेत, अनेक सामाजिक कार्य केली. यातूनच पूढे त्यांना राष्ट्रभक्ती ची गोडी लागली. त्यांनी देशाच्या अनेक चळवळीत आपला सहभाग नोंदवला. सामाजिक क्षेत्रातील अनेक चळवळीचं नेतृत्व देखील त्यांनी प्रचंड धाडसाने केले. 'Maharashtra Shahir'
समाजाची दूरावस्था, इथल वास्तव याचा अभ्यास करून यावर आधारित प्रबोधनात्मक नाटके, पोवाडे देखील त्यांनी लिहिली.
इ. स.१९४२ ला मुंबई येथील मिलमध्ये ते नोकरीला लागले, पण त्यातही त्यांचं मन फार काळ लागलं नाही. त्यांच्या कलात्मक कार्यासाठी त्यांना पुढे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले. त्यांनी आपल्या लेखणीतून खूप सार मराठी साहित्य लिहलं, अनेक गीतरचना केल्या. 'Maharashtra Shahir'
आताही दरवर्षी "भारतीय जनता पक्षाच्या" वतीने 'शाहिर साबळे स्मृती गौरव' पुरस्कार दिला जातो. शाहिर साबळे यांच्या जीवन चारित्रा बद्दल भरपूर काही सांगता येईल परंतू ते मी सांगण्यापेक्षा ' महाराष्ट्र शाहिर ' या चित्रपटातून आपल्याला त्यांची जीवनगाथा पाहायला मिळणार आहे. 'Maharashtra Shahir'
'Maharashtra Shahir' या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी दिग्दर्शकाला तब्बल तीन वर्ष लागली असून हा चित्रपट अप्रतिम असणार आहे. हा चित्रपट नव्या पिढीने अवरजून पाहायला हवा. लोकशाहीर साबळे यांच्या काळातील त्यांनी रचलीली मराठमोळी गाणी, त्या काळातील लोक संस्कृती , विचार हे समाजाला कळन अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे " महाराष्ट्र शाहिर ' हा मराठी चित्रपट सर्वांनी पहावां.'Maharashtra Shahir' 🙏
0 Comments