महादेवाचं मंदिर हेमाडपंथी का असतं ? आताच्या काळात पुरातन मंदिराची होणारी पडझड.. हेमाडपंथी महादेव मंदिर माहिती| Hemadpanthi Mahadev Temple Information in Marathi

महादेवाचं मंदिर हेमाडपंथी का असतं ? आताच्या काळात पुरातन मंदिराची होणारी पडझड.. हेमाडपंथी महादेव मंदिर माहिती |Hemadpanthi Mahadev Temple Information in Marathi 

'hemadpanthi mahadev mandir'
"औंढा नागनाथ मंदिर"

हेमाडपंथी मंदिराची माहिती - Hemadpanthi Temple Information in Marathi

संपूर्ण भारतात अगदी जून्या काळापासून मंदिर बांधण्याच्या अनेक स्थापत्य - शैली उपलब्ध होत्या. त्या सर्व स्थापत्य शैलीपैकी 'hemadpanthi mahadev mandir' एक असणारी हेमाडपंथी शैली आजही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. हि स्थापत्य शैली पुरातन काळातील असून अत्यंत भक्कम आणि मजबूत आहे. या हेमाडपंथी बांधणीचा इतिहास पाहायला गेलं तर इ.स. 1259 ते 1274 ला जेंव्हा देवगिरी येथे यादवकालीन राजे महाराजे होते. तेंव्हा त्याचं काळात "हेमांद्री" नावाचा प्रधान होता. त्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक इमारती तसेच मंदिर बांधली. ती बांधणी अत्यंत टिकावू तसेच दर्जेदार असल्याने "हेमांद्री" प्रधानाच्या नावावरून "हेमाडपंथी" हे नाव अस्तित्वात आलं.

• महादेवाची मंदिर हेमाडपंथी चं का आहेत ?

'hemadpanthi mahadev mandir'
"आमच्या गावातील महादेवाचं पुरातन मंदिर "


हेमाडपंथी बांधणीचे काम टिकाऊ असून ते दिर्घ काळ पडत नाही. 'hemadpanthi mahadev mandir' त्याची रचना करताना तेंव्हां कुठलही केमिकल न वापरता मोठ्या टोकदार दगडांच्या मध्ये खाचा पाडून त्याचे कोने काढले जायचे. अगदी दगडांची मांडणी सुव्यवस्थित असायची त्यामुळे कदाचित महादेवाची मंदिर त्या काळात "हेमाडपंथी" पद्धतीने बांधली गेली असावी. कारण या हेमाडपंथी मंदिराचा पाया भक्कम करुन पाषाणाची रचना देखील विचार करायला लावणारी आहे. एखाद उदाहरण द्यायचं झालं तर.. पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं "औंढा नागनाथ" मंदिर याच हेमाडपंथी स्वरूपाचं आहे.


भगवान शिव शंकरा बद्दल थोडक्यात जाणून घेऊया..


विश्वाचे मालक असा ज्यांचा अनेक पुराणात उल्लेख केला जातो ते भगवान शिव म्हणजे अखंड हिंदू समाजाचं आराध्य दैवत. 'hemadpanthi mahadev mandir' संत तुकाराम महाराज देखील आपल्या अभंगात महादेवाचं वर्णन करताना लिहितात..

                          तुम्ही विश्वनाथ|

                        दीन रंक मी अनाथ|

    भगवान शंकराची अनेक नावं प्रचलित आहेत. जगविख्यात असणारे शिव भक्ताला सहजगत्या पावतात त्यामुळे त्यांना "भोळा शंकर"असही म्हंटल जात. त्यांचं नाम स्मरण केल्याने मानवी जीवनातील अनेक संकट दूर होतात.

'hemadpanthi mahadev mandir'

संत एकनाथ महाराज देखील आपल्या अभंगात म्हणतात..

                      वाचे वद ता शिव नाम | 

                    त्यासी न बाधे क्रोध काम|

• पुरातन मंदिरांची होणारी पडझड 

     जवळपास बहुतांश गावामध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात ,पण हल्ली अनेक गावोगावी असणाऱ्या पुरातन महादेव मंदिराची पडझड होताना दिसत आहे. 'hemadpanthi mahadev mandir'  काही दिवसापासून शिवपुराण कथा श्रवण करून अनेक लोकांचा महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा ओघ अत्यंत वाढला आहे, कधीच मंदिराच तोंड न पाहणारे देखील आपली ईच्छा पुर्ण व्हावी म्हणून महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करत आहेत, तसेच अनेक महिला मंडळी "पशुपती व्रत" करताना दिसत आहेत. हे सगळ ठीक आहे परंतु याच पुरातन मंदिराची दुरावस्था पाहून याचा जीर्णोद्धार करणे देखील गरजेच आहे याचा विचार कुणाच्या मनात येतो का ? हा प्रश्न प्रत्येक शिवभक्त मंडळी समोर उभा राहायला हवा?

उदाहरणार्थ  👇

                परभणी जिल्हयातील "धारासुर" येथिल जगप्रसिद्ध असलेलं चालुक्य काळातील पुरातन असं   गोदावरी किनाऱ्यावर वसलेलं "गुप्तेश्वर" महादेवाचे मंदीर .

'hemadpanthi mahadev mandir'
जगप्रसिद्ध असणारं गुप्तेश्र्वर मंदिर 

     हा लेख लिहायचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी मी आमच्या परभणी जिल्ह्यातील "गोदावरी" नदी किनारी वसलेले "धारासुर" येथे  गुप्तेश्वराच्या जगप्रसिद्ध पुरातन मंदिरात दर्शनाला गेलो असता, मंदिराची आता झालेली अवस्था पाहून अत्यंत दुःख वाटल. खरतर हे मंदिर फार प्राचीन आहे. याबद्दल असं सांगितलं जातं की हे पुरातन मंदिर १२ व्या शतकातील चालुक्य घराण्याच्या काळात बांधल गेलं असुन, मंदिरातील पाषाणावर कोरलेली अद्भुत शिल्पकला मंत्रमुग्ध करणारी आहे.परंतु सध्याच्या परिस्थितीत काही नैसर्गिक आपत्तीमुळे  हे मंदिर एका बाजूने झुकले असून खूप सारी पडझड देखील झाली आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. वेळीच याकडे लक्ष्य नाही दिलं तर मंदीराची आणखी पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शिव प्रेमींनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठीं प्रयत्न करावे तसेच आपल्या महाराष्ट्राचं वैभव असणारे गड, किल्ले याची काळजी घेऊन, यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करावा. 

      " अनोखा प्रवास डॉट कॉम "   या ब्लॉग साईट च्या माध्यमातून विविध विषयावरील लेख मराठी भाषेत लिहन्याचा प्रयत्न आम्ही गेली काही दिवसांपासून करत आहोत. साईट च्या मुखपृष्ठावर अन्य काही लेख  आपल्याला पाहायला मिळतील ते नक्की वाचा आणि आवडले तर आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद 🙏🚩

हर हर महादेव 🚩

हे लेख सुद्धा अवश्य वाचावे 👇





Post a Comment

0 Comments